चष्मेवाला मायक्रोस्कोप
By admin | Published: January 7, 2016 09:40 PM2016-01-07T21:40:56+5:302016-01-07T21:40:56+5:30
नागालॅण्डमधे राहणारी ही मुलगी. आपल्या अवतीभोवती सुविधांचा अभाव पाहत होतीच. मात्र ती इंटरनेटवर खूप सायन्स फिक्शन पाहते.
Next
>- हदाशा रोंगमेई
इयत्ता दहावी, दिमापूर, नागालॅण्ड
नागालॅण्डमधे राहणारी ही मुलगी. आपल्या अवतीभोवती सुविधांचा अभाव पाहत होतीच. मात्र ती इंटरनेटवर खूप सायन्स फिक्शन पाहते. त्यातून तिला या चष्म्याची कल्पना सुचली. चष्म्यात मायक्रोस्कोप असेल तर डॉक्टर दातांची, घशाची तपासणी करू शकतील. बारीक काम करणं, दागिने घडवणं, अगदी तांदूळ निवडणंही सोपं होईल अशी तिची कल्पना.
हदाशा म्हणते, ‘माङो वडील आर्मीत आहेत, आणि आई माझी प्रेरणा. त्या दोघांमुळे मला कळतंय की, माणसांची जगण्याची लढाई थोडी सोपी करायला हवी!’