.असंच काहीतरी!

By admin | Published: November 20, 2014 06:26 PM2014-11-20T18:26:58+5:302014-11-20T18:26:58+5:30

डीअर फ्रेण्डस. हा किस्सा तुम्हाला आवर्जुन सांगायलाच पाहिजे. गेल्या शुक्रवारी दुपारची गोष्ट. एका तरुण दोस्ताचा फोन आला, ऑक्सिजन आवडलं वगैरे सांगून म्हणाला, एक छोटीशी मदत कराल का? तुम्हाला माहितीये का कुणी जगप्रसिद्ध व्यक्ती ज्यांची भाषणं, मोटिव्हेशनल वगैरे भारी असतात, ती भाषणं आणि त्या व्यक्तीविषयी तुम्ही काही छापलं असेल तर मला पाठवून द्या.?

Or something! | .असंच काहीतरी!

.असंच काहीतरी!

Next
>डीअर फ्रेण्डस. हा किस्सा तुम्हाला आवर्जुन सांगायलाच पाहिजे.
गेल्या शुक्रवारी दुपारची गोष्ट.
एका तरुण दोस्ताचा फोन आला, ऑक्सिजन आवडलं वगैरे सांगून म्हणाला, एक छोटीशी मदत कराल का? तुम्हाला माहितीये का कुणी जगप्रसिद्ध व्यक्ती ज्यांची भाषणं, मोटिव्हेशनल वगैरे भारी असतात, ती भाषणं आणि त्या व्यक्तीविषयी तुम्ही काही छापलं असेल तर मला पाठवून द्या.?
आम्ही म्हटलं असंच ‘काहीतरी’ का पाठवा? तो म्हणाला, ‘मला प्रोजेक्ट करायचाय, तुमच्याकडे असेलच रेडी, द्या पाठवून, कोण पाहतंय. सबमिशन झाल्याशी काम!’
‘असंच काहीतरी’?
हे असे करतो आपण प्रोजेक्ट?  
आणि त्याबद्दल आपल्याला काहीही म्हणजे जनाची-मनाची काहीच वाटू नये?
कुठून येतं हे निर्ढावलेपण? 
की नुसताच आळस?
का होतंय आपलं असं?
आपलं वाचन कमी पडतंय की, अभ्यास?
ंमाहितीचा मारा होतंय वगैरे किती बोललं जातं, पण जगात अवतीभोवती जे घडतंय ते समजून घेऊन, चहुबाजूनं माहिती घेऊन ती माहिती वापरणं किंवा त्यावर आपलं मत तयार करणं, हे सारं का करत नाही?
मिळाली माहिती की कर कॉपी-पेस्ट, मार शेरे असंच हल्ली सरकसकट अनेकजण करतात का? आणि का करतात? हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत स्वत:ला? थोडा विचार करायला पाहिजे आणि अभ्यासही !
तशाच गुंतागुतीचा ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ लव्ह’चा एक गंभीर प्रश्न आणि त्याबाबतचं आंदोलन हा विषय आज तुम्ही या अंकात वाचणार आहात.
वाचा, विचार करा.
आणि मग ठरवा की, नक्की बरं-वाईट काय चाललंय अवतीभोवती?
मुख्य म्हणजे का चाललंय?
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com
 

Web Title: Or something!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.