सोशल मीडिया हाच व्हिलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:29 AM2020-01-02T06:29:00+5:302020-01-02T06:30:03+5:30

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध. 

oxygen special 2020-  Social media is the villain! | सोशल मीडिया हाच व्हिलन !

सोशल मीडिया हाच व्हिलन !

googlenewsNext
ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

- प्रांजल देहाडे

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?


- मैत्रीतला एक छोटासा गैरसमज, जो दूर झाला आणि आमची मैत्री अधिक घट्ट झाली. ही एक ताजी भारी घटना. 


2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

- मला माझ्या करिअरची नक्कीच चिंता वाटते आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर योग्य तो जॉब मिळायची पण. जॉब अपॉच्युनिटीजबद्दल आम्हा सगळ्यांनाच फार स्ट्रेस आहे. 


3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?


- मी मित्र-मैत्रिणीसोबत आनंदी आहे. सर्वांसोबत काहीतरी नवीन शिकायला मजा वाटते. जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मनातल्या गोष्टी सहज बोलता येतात त्यामुळे एकटेपण नाही जाणवत कधी. पण या सगळ्यापासून काही वेळ एकांत हवा, असं मात्र वाटतं.


4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? 


- टेक्नॉलॉजीच्या जगात आमची जनरेशन भावनांचं महत्त्व विसरून, नको त्या गोष्टीपण खूपच प्रॅक्टिकली घेते. आणि आमच्या भावना समजून घेणं आई-वडिलांच्या पिढीला झेपत नाही. ही जनरेशन गॅप भरताना दोन्ही बाजूंनी पावलं उचलली जायला हवी.


5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 


- आमच्या जनरेशनचं लव्ह-लाइफ कॉम्प्लिकेटेड आहे, कारण नेहमी सोशल मीडियावरून एकमेकांवर नजर ठेवायची वाईट सवय. यातूनच स्ट्रेस येतो.
म्हणूनच प्रत्यक्ष भेटी केव्हाही उत्तम.


6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
- हो, ठरलंय. मला केमिस्ट्रीमध्ये पीएच.डी. करायची आहे.


7. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?
अभिमान वाटावा अशा खूप गोष्टी आहेत, पण वेळ येते तेव्हा आपलं कर्तव्य निभावण्यात भारतीय नागरिक नेहमीच कमी पडतात, हात झटकतात; याचा मला प्रचंड राग येतो. चीड येते.

 

Web Title: oxygen special 2020-  Social media is the villain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.