इथे फार गर्दी आहे, परदेशी जाईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 07:19 AM2020-01-02T07:19:00+5:302020-01-02T07:20:03+5:30
‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020 ! विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.
- आश्लेषा पंडित
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
स्टडी अब्रॉड हा विषय आत्ता माझ्या आयुष्यात सर्वात भारी आहे ! भारतात एमबीएची एंट्रन्स एक्झाम अतिशय अवघड आहे आणि त्यात फक्त परीक्षेतली गुणवत्ता तपासली जाते. परदेशी एंट्रन्स एक्झाममध्ये मात्र कामाचा अनुभव आणि अभ्यासक्र माच्या व्यतिरिक्त केलेल्या अॅक्टिव्हिटीज हे सर्व बघितलं जातं. अर्थात मला परदेशी जायला जास्त आवडेल.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
खूप गोष्टी करायच्या आहेत; पण वेळ कमी पडतोय!
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
नाही. मी एकटी नाही.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? र्
पर्याय दुसरा, पालकांची पिढी जास्त गंडलेली आहे.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
दिलासा.
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
हो. मार्केटिंग, लॅँग्वेज एज्युकेशन, ट्रेनिंग, बर्ड वॉचिंग. हे सगळं करायचं ठरलंय.
7. संधी मिळाली तर भारत सोडून परदेशात जाईन/संधी मिळाली तर परदेशात शिकायला-नोकरी करायला जाईन; पण भारतात परत येईन ! - यातला कुठला ऑप्शन मी घेईन? का?
बाहेर शिकायला जाईन. भारतात फार लोकं आहेत, आता वैताग आलाय या गर्दीचा. तरी लोक जागरुक नाहीत. दोन-दोन पोरांना जन्म देत आहेत !