पलाझो फुलं आणि निळं काजळ
By admin | Published: July 23, 2015 06:23 PM2015-07-23T18:23:24+5:302015-07-23T18:23:24+5:30
आपला जुनाट रद्दी लूक बदलायचा आणि यंदाच्या वर्षी कॉलेजात एकदम स्टायलिशच बनून जायचं,
Next
- सायली कडू
(सायली लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहेत.)
आपला जुनाट रद्दी लूक बदलायचा
आणि यंदाच्या वर्षी कॉलेजात एकदम स्टायलिशच बनून जायचं,
असं ठरवणा:यांच्या जगात
जे सध्या सुपरस्टायलिश आहे,
त्याचीच ही एक झलक.
कॉलेज सुरू होताना सगळ्यात महत्त्वाचं असतं शॉपिंग.
अनेकजण तर आधीपासूनच ठरवून ठेवतात की, यंदा आपला ‘लूक’ बदलायचाच.
ह्यावर्षीसारखा ‘अवतार’ पुढच्या वर्षी नाहीच ठेवायचा. एकदम स्मार्ट-ट्रेण्डी राहायचं, एकदम मस्त दिसायचं. आपण स्वत:ला कसं प्रेङोण्ट करतो, हे महत्त्वाचं असतंच. असं अनेकजण स्वत:ला बजावतातच या दिवसांत.
आणि मग लागतात, आपला अवतार बदलायच्या तयारीला! पूर्वीच्या काळात असा काही विचार करताना, अगदी फॅशन्स स्वीकारतानाही अनेकजण आधी आपल्या रंगाचा विचार करत. आता तरुणांनी ते बुरसटलं बुजलेपणही झुगारून दिलंय.
पूर्वी सावळ्या मुली गडद रंगांचे कपडे घालण्यास कचरायच्या. जरा गोरटेल्या असलेल्या सेमी गडद कपडे घालण्यास प्राधान्य द्यायच्या. लाल, काळा, पांढरा, गुलाबी, हिरवा हे रंग म्हणजे तर पिठ्ठं गो:यांचीच मक्तेदारी.
आता मात्र हे असलं काही कुणी मानत नाही. बिंधास्त जे वाटलं ते घालतात, मस्त कॅरी करतात. त्याच मूडमधून कॉलेज सुरू होताना एकदम इन असलेल्या या काही गोष्टी.
तुम्ही बदलणारच असाल तुमचा अवतार,
तर या काही गोष्टी तुमच्या लिस्टमधे आहेत ना, चेक करा!!
डंगरी
पाऊस असो नसो, सध्या तमाम मुलामुलींचे फेवरिट्स आहेत या डंगरी. शॉर्ट, थ्री-फोर्थ आणि फुल अशा तीन प्रकारात त्या मिळतात. डेनिमच्या डंगरीवर कोणत्याही कलरचे टी-शर्ट मस्त वाटतात. त्यामुळे झटपट तयार होऊन सकाळी कॉलेज गाठायचं असल्यास हा एक उत्तम पर्याय वाटतो अनेकांना. पुन्हा भारी दिसतो ते वेगळंच!
बम्र्युडा
तरुणांचा सर्वात आवडता आणि लोकप्रिय फॅशन स्टेटमेंट म्हणजे बम्यरुडा. ती यंदाही इन आहे. बम्यरुडा-टीशर्ट आणि पायात स्पोर्ट्स शूज एकदम कॅज्युअल दिसणारा पेहराव घालून कॉलेजला जाणारे अनेक कॉलेजियन्स दिसतात. हे बम्यरुडा सैल आणि मोकळे असल्यानं अनेकांना त्यात जास्त कम्फर्टेबल वाटतं. यामध्ये वेगवेगळी डिझाइन्सही दिसून येतायत. खूप लोकप्रिय असलेल्या सुपरहिरोंची चित्रंही काही बम्यरुडांवर पाहायला मिळतात.
फ्लोरल प्रिंट्स
सध्या फ्लोरल प्रिंटची चलती आहे. कपडे, स्कार्फ, चप्पल्स, बॅग्ज अशा सगळ्याच गोष्टींवर या प्रिंट्स दिसतात. पाना-फुलांच्या या नक्षी टॉप, पँट, चप्पल, बॅग, तर कधी छत्रीवरही मस्त दिसतात. कपडे घेताना तर बिंधास्त या फ्लोरल प्रिण्ट्स घेतल्या जातात, नवा ट्रेण्ड म्हणून!
पलाझो
लूज फिटिंगची पलाझो पॅण्ट मुलींच्या आवडीचा विषय आहे. प्लेन टी-शर्टवर प्रिंटेड पलाझो पॅण्ट म्हणजे सॉलिड ऑप्शन, तर कधी या उलट कॉम्बिनेशनही झकास वाटतं. गळ्यात कलरफुल मण्यांची माळ, हातात कडे किंवा ब्रेसलेट असा मस्त लूक त्यातून कमवता येतो.
हेअरबॅँड
केसांना मोकळे सोडल्यावर एक वेगळाच लूक येतो. मात्र नुसतेच केस मोकळे ठेवण्यापेक्षा जीन्स-टॉपवर किवा कुर्तीवरही हेअरबॅँड लावणो सोयीचे मानतात. या हेअरबॅँडमध्ये लाल, काळा, गुलाबी, सफेद, सोनेरी, चंदेरी या कॉमन कलर्ससोबत आता निऑन पिंक, निऑन ग्रीन, निऑन यलो, निऑन ब्ल्यू या हेअरबॅँडची डिमांड जास्त आहे. अशा चमकदार रंगांच्या हेअरबॅँडमुळे काळ्या किंवा रंगवलेल्या केसांनाही वेगळाच लूक येतो. काही हेअरबॅँडना फुलांची प्रिंट दिलेली असते, तर काहींवर हार्टशेप दिलेले असतात. काही हेअरबॅँड्सचा लूक जास्त गर्ली त्यावर फुलंही लावलेले दिसतात.
हटके की-चेन
कॉलेजात जाताना घराची किल्ली किंवा बाइकची चावी सोबत असतेच. आपली की-चेन सगळ्यात वेगळी दिसायला नको मग? यासाठीच हटके कीचेन वापरणं अनेकांना फार महत्त्वाचं वाटतं. यामध्ये मिनी पर्स कीचेन, बॅग कीचेन, मीरर कीचेन, शर्ट/जॅकेट कीचेन, लिपिस्टककेस कीचेन अशा अनेक कीचेन अनेकांकडे दिसतात.
रिबिन
रिबिन जुनाट वाटण्याचा काळ आता गेला. या रिबिनीचे हेअरबँडसह हेअरक्लिप्स, रिबिन, बो क्लिप, रंगीत डिझायनर रिबिनी, हेअर एक्सटेन्शन ब्रीड्सच्या रिबिनी, दोरीच्या आकारातल्या किंवा प्रिंटेड रिबिनी, त्यावर असलेले पोल्का डॉट्स, व्हिंटेज प्रिंट भाव खाऊन जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारे या रिबिन वापरून हायफंडू हेअरस्टाईल करता येऊ शकते.
आय मेकअप
केवळ मॉडेल्स किंवा हिरॉईनच नाही, तर हल्ली कॉलेजात जाणा:या तरु णीही आय मेकअप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. डोळ्यांचे सौंदर्य अधिकच खुलवण्यासाठी आय लायनर, आय श्ॉडोज, मस्करा अनेकजणी लावतात. यातही काळ्या रंगाचे आय लायनर लावण्याची परंपरा पुसट होत हिरवा, निळा, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगांचे लायनर लावून कलरफुल होणं जास्त स्मार्ट समजलं जातंय.
नेकलेस
टीशर्ट असो वा टॉप-कुर्ती वा शर्ट सध्या गळ्यात फॅशनेबल माळ घालण्याची पद्धत सुरू आहे. ही लाकडी किंवा प्लॅस्टिकच्या बिड्सची माळ शॉर्ट किंवा लॉँग दोन्ही पद्धतीत झक्कास दिसते. मेटल बेस देऊन त्यावर रंगीत मण्यांची ही साखळी एकदम क्रेझचा विषय आहे.
ब्रेसलेट्स
ब्रेसलेट्स किंवा भरपूर बांगडय़ा हातात घालण्याचा ट्रेण्ड आहे. रंगीबेरंगी कडी जीन्स, स्कर्ट, पंजाबी ड्रेस किंवा कुर्ता-लेगिंजवरसुद्धा मस्त वाटतात. निऑन अंगठय़ांचीही चलती आहे. मोठी एक किंवा दोन अंगठय़ा घातल्या की हाताची शोभा आणखीनच वाढते.
मोजडय़ा
जीन्स असो वा पंजाबी ड्रेस, सध्या सगळ्याच प्रकारच्या कपडय़ांवर मोजडी घालण्याचा ट्रेण्ड आहे. काळ्या वेलवेटच्या कपडय़ावर रंगीबेरंगी दो:यांची बारीक एम्ब्रॉयडरी असलेल्या या मोजडय़ा आता जास्त भाव खात आहेत. विशेष म्हणजे, ही एम्ब्रॉयडरी हाताने केली असल्याने याचा हटके लूक दिसून येतो. यात फ्लॅट हिल आणि त्यापेक्षा थोडी जास्त हिल असलेल्या मोजडय़ाही मिळत असल्याने सगळ्याच ड्रेसवर त्या उठून दिसतात.
मोबाइल कव्हर
सर्वाच्या गळ्यातील ताईत असलेला मोबाइल आकर्षक दिसायलाच हवा. मग काय यावरही वेगवेगळी आवरणो चढायला वेळ कुठे लागतोय. या मोबाइल कव्हर्समध्ये विविध प्राणी, पक्षी, देवी-देवता, राजकीय पक्षांचे चिन्ह, प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे, फुला-पानांच्या डिझाइन, निसर्गचित्रं रंगवलेली असतात. काहींवर डायमंड्स, मोतीदेखील लावलेली कव्हर पाहायला मिळतात. शिवाय एकच रंग वापरून तयार केलेल्या शेड्सचीही मागणी अधिक आहे.
घडय़ाळ
घडय़ाळ आता केवळ वेळ दाखवण्यापुरता मर्यादित न राहता एक ट्रेण्डी वस्तू झाली आहे. यातच रंगीत डिझाइनची आणि मोठे डायल, लहान डायल किंवा प्रिंटेड डिझाइनचे डायल असे वैविध्यपूर्ण, आकर्षक घडय़ाळं वापरण्याकडे ब:याच जणांचा कल दिसून येतो.
फ्रिंज हँडबॅग्ज
फ्रिंज हँडबॅग्ज म्हणजे कपडय़ाची किंवा लेदरची हँडबॅग जिला झालर असते. अशा फ्रिंज हँडबॅग्जमध्ये शोल्डर हँडबॅग्ज, होबो हँडबॅग्ज, स्लिंग बॅग, टोट हँडबॅग्ज असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अशा बॅग्ज कॉलेजसोबतच पार्टीजलाही वापरण्याकडे तरुणींचा ओढा आहे.