पेपर टाकण्यापासून प्रकाशक होण्यापर्यंत, अर्थपूर्ण जगण्याच्या शोधाचा प्रवास कसा झाला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:39 PM2020-06-18T13:39:03+5:302020-06-18T13:47:29+5:30
मी ट्रेनमध्ये भेळ विकणारा, बिस्किटं-सिगारेटी विकून पोट भरणारा, घरोघरी पेपर टाकणारा दहावी नापास मुलगा. आयुष्यात वाचन आलं आणि आपण नक्की कशासाठी जगतो, अर्थपूर्ण जगणं कशाला म्हणतात हे शोधत मी निघालो.
-शरद अष्टेकर, निर्माण 4
नाशिक जिल्ह्यामध्ये घोटी नावाचं एक गाव आहे, मी तिथला.
दहावीर्पयत शिक्षण तिथंच झालं. दहावीच्या परीक्षेत हिंदीच्या पेपरला कॉपी करताना पकडला गेलो. शाळेने निकाल दिलाच नाही म्हणून दहावीला नापास झालो असं समजून कामाला लागलो.
माङो वडील ट्रेनमध्ये भेळ, काकडी, गोळ्या बिस्किटं विकायचे. नापास झाल्यामुळे दुसरं कुठलंच काम नव्हतं म्हणून मीही वडिलांना मदत करायला सुरुवात केली. त्यांनतर काही काळ ट्रेनमध्येच भेळ, काकडी, गोळ्या बिस्किटांसह गुटखा, सिगारेटही विकले.
त्यासोबत हीरोहोंडा शोरूममध्ये गाडय़ा धुण्याच्या कामापासून कपडे विकणं, भाज्या विकणं, एसटीडी, राइस मिलमध्ये नोकरी केली. एका पतसंस्थेत अल्पबचत प्रतिनिधी म्हणून कामं करायला लागलो. तेव्हाच पेपरही टाकायला सुरुवात केली. त्या कामाने मला ‘वाचायला’ शिकवलं.
आठवडय़ाभराच्या सगळ्या पेपरच्या पुरवण्या वाचायला मिळायच्या. त्यावेळी लोकमतची ‘मैत्र’(आताची ऑक्सिजन) ही विशेष आवडती पुरवणी होती. दरम्यान, गावातल्या वाचनालयाचा सभासद झालो. पुस्तकंही वाचायला लागलो. पुस्तकांचे परिचय वाचून वाचून पुस्तकंही विकत घ्यायला सुरु वात झाली.
कोसला, बलुतं, बनगरवाडी, चक्र , कोवळी उन्हे, ऋतुचक्र बरंच वाचून काढलं. सुरु वातीला मला फिक्शन/नॉनफिक्शन काही कळतं नव्हतं, घेतलं की वाचलं.
त्याच दरम्यान नाशिकला 2क्क्5 साली साहित्य संमेलन भरले. मी दिवसभर पुस्तकं पाहत भारावल्यासारखा फिरत होतो. साहित्य संमेलनातून डायरी ऑफ अन् फ्रॅँक, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग यासह बरीच पुस्तकंघेतली.
मला हे सगळं वाचताना परत शिकावंस वाटायला लागलं. दहावीची परीक्षा द्यायला मी परत शाळेत गेलो. पुढे दोन वर्ष परीक्षा देतच होतो. शेवटी 2क्क्7ला एकदाचा दहावी पास झालो. मग बारावीही पास झालो. त्यांनतर पदवीसाठी कॉमर्सला अॅडमिशन घेतलं आाणि बाय चॉइस कॉलेज ड्रॉप आउट राहिलो. हेही बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्सबद्दल वाचून झालं असेल.
यासगळ्यात वाचन सुरूच होतं.
आपण काही व्यवसाय करावा असं वाटायला लागलं. एका मित्रमुळं मार्केटिंगचं काम केलं. सांगलीत जाऊन; पण तेही सोडलं.
2010 मे महिन्यात मी मैत्रिणीला भेटायला चंद्रपूरला गेलो होतो. आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं. मैत्र पुरवणीमुळं सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय- राणी बंग, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्याविषयी खूप वाचायला मिळालं होतं.
मग मी आठ दिवस सर्च, हेमलकसा, आनंदवन असं फिरलो. त्यात चंद्रपूर व गडचिरोली हे दोन शहरं पहायला मिळाली. मैत्रिणीला भेट देण्यासाठी मी चंद्रपूरमध्ये काही चांगली पुस्तकं शोधत होतो. पण भरपूर फिरूनही मला ती पुस्तकं कुठेच मिळाली नाही. या दोन्ही शहरांत पुस्तकांचं दुकान नव्हतं.
दरम्यान मला सुचलं की, आपण पुस्तकं विकायला सुरुवात करायची. चांगलं वाचन माणसाला उन्नत बनवतं हे मला माङया अनुभवातून समजलं होतं.
काही दिवसांत थोडे पैसे जमवले, थोडी बचत होती तेवढे पैसे घेऊन मी दादरला गेलो समकालीनच्या ऑफिसमध्ये. तिथून काही पुस्तकं खरेदी केले. त्याच्याजवळच राजहंस प्रकाशनचे ऑफिस होते तिथून काही आवडीचे लेखकांचे पुस्तक विकत घेतली.
घरी आल्यावर घरच्यांना सांगितलं मला नागपूरला जॉब लागला आणि 1 जुलै 2क्1क्ला मी घर सोडलं. चंद्रपूरला आलो.
मी दुस:या दिवसापासून पिशवीमध्ये पुस्तक घेऊन गावात फिरायला सुरु वात केली; पण पुस्तक कुठे विकायचे, कोणाला विकायचे काहीच माहिती नव्हतं. मी दिवसभर शहरभर भटकत राहिलो असं सलग चार-पाच दिवस झाले. मग एके दिवशी एका कॉलेजमध्ये अर्थशास्नच्या एका प्राध्यापकांनी माङयाकडून अच्युत गोडबोले यांचं अर्थात हे पुस्तक विकत घेतले. मग मला कळलं की, पुस्तकं कुठे आणि कोणाला विकता येतील मग मी शाळा-कॉलेजेसमध्ये फिरायला सुरु वात केली. नवीन पुस्तकांच्या ऑर्डर यायला सुरुवात झाली.
अशा प्रकारे हा पुस्तक विक्र ीचा व्यवसाय सुरू झाला.
मग मी निर्माण या प्रक्रियेतही सहभागी झालो.
त्याच दरम्यान चंद्रपूरला साहित्य संमेलन झालं तिथून माङया व्यवसायाला अजूनच चांगलं बळ मिळालं. मग मी लहान-मोठे पुस्तक प्रदर्शनं भरवायला लागलो. चंद्रपूरपासून मग वेगळ्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये प्रदर्शन भरवायला सुरु वात केली.
2012च्या डिसेंबरमध्ये मी आणि माधुरीने लग्न केलं. तिथून पुढे मी पूर्व विदर्भामध्ये मोठय़ा प्रमाणात प्रदर्शन भरवायला सुरु वात केली.
अमृतबरोबर नेहमीच पुस्तकांची चर्चा व्हायची. आता प्रकाशित केलेल्या रिचर्ड फाइनमन या नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाचा शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाइनमन किंवा जराड डायमंड या लेखकाच्या व्हाय इज सेक्स फन या पुस्तकांबद्दल मला पहिल्यांदा अमृतकडूनच कळाले होते.
2015मध्ये मी नागपूरला प्रदर्शन लावलं होतं. त्यात मला पहिल्यांदा सेपियन्स या पुस्तकाची ऑर्डर आली. पुस्तक एका ग्राहकाला देण्यासाठी मी मागवलं होतं, तो येईपर्यंत ते पुस्तक मी वाचलं आणि ते मला इतकं आवडलं की मी माङयासाठी प्रत मागवली.
मी त्या पुस्तकाचा आणि त्या लेखकाचा आयुष्यभरासाठी फॅन होऊन गेलो युवाल नोआ हरारी.
पुढे त्यांना दोनदा भेटताही आलं. त्यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशनही केलं.
प्रकाशनाच्या व्यवसायातही आता जम बसवतो आहे. युवाल नोआ हरारी यांच्या टीमसोबत संपर्क करून त्यांच्या दुस:या पुस्तकांचे हक्क मिळवले.
आता ती पुस्तकं मराठीत प्रकाशित केली.
नऊ वर्षे झाली हा प्रवास सुरूआहे.
मी एक साधा ट्रेनमध्ये भेळ विकणारा, घरोघरी पेपर टाकणारा दहावी नापास मुलगा ते आता प्रकाशक असा प्रवास करून इथवर आलो.
अर्थपूर्ण जगण्याचा हा प्रवास असा सापडत गेला आहे.
18 ते 28 या वयोगटातील तरुण.
हे वयच असं की, या वयात जगण्याविषयी,
करिअरविषयी, समाजाविषयी,
नातेसंबंधांसह स्वत:विषयीही अनेक प्रश्न पडतात.
एकूण आयुष्याबद्दल खूप प्रश्न पडतात.
माङया आयुष्याचा उद्देश काय?
हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न.
अर्थपूर्ण जगण्याचा शोध तरुणांना घेता यावा,
असा प्रयत्न ‘निर्माण’ प्रक्रिया करत आहेत.
निर्माणच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती आणि प्रवेश अर्ज
http://nirman.mkcl.org/
या संकेतस्थळावर मिळू शकेल..