people management - माणसं जोडण्याची कला आहे तुमच्याकडे? मग तुमचं करिअर सुसाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 07:40 AM2020-01-16T07:40:00+5:302020-01-16T07:40:02+5:30

पीपल मॅनेजमेंट म्हणजे लोकांचं व्यवस्थापन. माणसांना आवरणं नव्हे सावरणं. आपल्या बॉसने आपल्याशी जसं वागावं असं वाटतं, तसं हाताखालच्या माणसांशी वागणं. सोपी नसेल; पण अवघडही नाही ही गोष्ट.

people management - an art of managing and connecting people- Must professional skill. | people management - माणसं जोडण्याची कला आहे तुमच्याकडे? मग तुमचं करिअर सुसाट!

people management - माणसं जोडण्याची कला आहे तुमच्याकडे? मग तुमचं करिअर सुसाट!

googlenewsNext
ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर


‘मॅनेजमेंट’ या शब्दातच ‘मॅन’ आहे. म्हणजेच व्यवस्थापकाचं मुख्य काम माणसांना सांभाळून घेणं हेच असतं. कुठल्याही ठिकाणी काम करणारा व्यवस्थापक असो, त्याला आपल्या सहकार्‍यांचं व्यवस्थापन करावंच लागतं. कुठल्याही कंपनीचं बलस्थान हे तिच्यामध्ये काम करणारे कर्मचारी हे असतं. त्यांची कामगिरी आणि त्यांचा दृष्टिकोन हा कंपनीच्या यशापयशाला कारणीभूत ठरत असतो. अनेकदा ‘लोक कंपनी सोडत नाहीत, तर ते आपल्या व्यवस्थापकाला सोडतात’ असं म्हटलं जातं. हे बरोबरच आहे. लोक आपल्या वरिष्ठांना किंवा सहकार्‍यांना वैतागून नोकरी सोडण्याची उदाहरणं अनेकदा सापडतात. म्हणूनच लोकांचं व्यवस्थापन हे उद्याच्या जगातलं एक महत्त्वाचं कौशल्य असणार आहे.
योग्य लोकांना निवडणं आणि त्यांच्याकडून शक्य तितकं चांगलं काम करून घेणं हे व्यवस्थापकाचं कौशल्य असतं. साहजिकच यात योग्य कर्मचार्‍यांची निवड, व्यवस्थापन, दैनंदिन कामकाजामध्ये त्यांना योग्य दिशा पुरवणं, गरज पडल्यावर स्वतर्‍ त्यात सहभागी होणं, त्यांना आश्वस्त वाटेल अशा प्रकारचं भक्कम नेतृत्व देणं हे सगळे मुद्दे त्यात समाविष्ट होतात. अनेक लिखित आणि अलिखित कामं त्यामध्ये येतात. उदाहरणार्थ कर्मचार्‍यांची पगारवाढ, त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन, त्यांची सुरक्षा, त्यांना प्रेरित करत राहाणं, त्यांच्याशी सतत संवाद साधणं, इतर विभागांबरोबर सौहार्दाचे संबंध ठेवणं अशा असंख्य गोष्टी त्यात येतात. जणूकाही सगळ्या कामाची ‘होल अ‍ॅण्ड सोल’ जबाबदारी अशा व्यवस्थापकावर असते.
लोकांचं व्यवस्थापन सगळ्यांनाच जमतं असं नाही. मुळात त्यासाठी लोकांबरोबर काम करण्याचा स्वभाव असावा लागतो. एकटय़ानं काम करणं, आपल्या कामामध्ये इतर कुणाची लुडबूड सहन न होणं अशा गोष्टी त्याला मारक ठरू शकतात. असं असलं तरी प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा कामाच्या ठिकाणी एका पातळीनंतर प्रत्येक माणसाला थोडय़ा ना थोडय़ा प्रमाणात लोकांचं व्यवस्थापन हे करावंच लागतं. किमान भारतामध्ये तरी याला पर्याय नाही. म्हणूनच ‘हा माझा प्रांत नाही’ असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एकटय़ानं काम करून जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होण्याकडे कूच करणार्‍या वॉरन बफेनंसुद्धा आपलं संवादकौशल्य वाढवण्यासाठी डेल कार्नेगी या प्रसिद्ध संवादतज्ज्ञाचा वर्ग लावला होता! खरं म्हणजे थोडय़ा प्रयत्नांनी हे अवघड वाटणारं काम सोपं होऊ शकतं. इतरांचं म्हणणं ऐकून घेणं, स्वतर्‍चा ‘ईगो’ अधूनमधून बाजूला ठेवणं, आपल्या सहकार्‍यांवर विश्वास टाकून त्यांचा विश्वास संपादित करणं, नम्रपणे बोलणं, शांतपणा राखणं, स्वतर्‍च्या कामातून इतरांसमोर आदर्श ठेवणं अशा साध्या गोष्टी करणारा माणूससुद्धा उत्कृष्ट व्यवस्थापक बनू शकतो. वेळ पडली तर त्यासाठी एखादा छोटासा अभ्यासक्र म करायलाही हरकत नसते; त्यासाठी एमबीए केलं पाहिजे असं अजिबातच नाही. या सगळ्याचं एकदम सोपं सार म्हणजे र्‍ आपल्याला आपल्या साहेबानं कसं वागवावं असं वाटतं, तसं आपण ज्यांचे साहेब असू त्यांना वागवलं तरी पुरे!

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?
1. माणसांचे व्यवस्थापन करताना प्रभावी प्रशिक्षण खूप गरजेचं असतं. हे प्रशिक्षण केवळ मौखिक न राहता प्रत्यक्ष कृती करून दाखवलं तर अधिक परिणामकारक होतं.
2. प्रशिक्षणासोबतच कामाचं मॉनिटरिंग, परीक्षण करावं लागतं. असं केलं नाही तर योग्य प्रशिक्षण देऊनही कामाचा विचका होऊ शकतो.
3. माणसांचं व्यवस्थापन म्हणजे त्यांच्याकडून योग्य काम करून घेणं. प्रेरणा, प्रशिक्षण आणि  परीक्षण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी दुसर्‍याशी नातं जोडणं, मनात विश्वास निर्माण करणं,  स्वतर्‍ शिकण्याची तयारी दाखवणं, एखादी चूक झाली तरी तिची जबाबदारी स्वतर्‍कडे घेऊन ती चूक दुरुस्त करायला मदत करणं हे सारं या व्यवस्थापनासाठी गरजेचं ठरतं.
4. प्रतिकूल परिस्थितीला शांतपणे सामोरं जात, भांडणं टाळत माणसांना सोबत घेणं हे कौशल्य अनुभवानं आणि शांतपणे शिकता येतं.

Web Title: people management - an art of managing and connecting people- Must professional skill.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.