हर फोटो कुछ कहते है?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:11 PM2018-09-20T17:11:50+5:302018-09-20T17:29:57+5:30
आपण किती सहज काढतो फोटो; पण ते फोटो नेहमी सत्यच मांडतात की, वास्तव वेगळंही असतं?
छायाचित्र कोणाला आवडत नाहीत? आपल्या स्वतर्च्या, जवळच्या माणसांच्या आयुष्यातल्या, कधीही विसरू नये अशा क्षणांचं असं हे चित्र ण.
छायाचित्र म्हणजे एक नोंद, आपल्या सुख-दुर्खाची नोंद. चांगल्या-वाईट घटनांची नोंद. आपल्याला आपल्या पुढच्या पिढय़ांनी लक्षात ठेवावं म्हणून जमा केलेला ठेवा. ऐवजच. या तपशिलांनी एक गोष्ट बनते. हे तपशील बदलले की गोष्ट बदलणार. मग आपण आपल्याला हवी तशी गोष्ट तयार करणार. छायाचित्नही कदाचित, काही प्रमाणात तेच करतात. इतिहास घडवायची मदत. आपण सहज म्हणून छायाचित्र टिपतो; पण ते छायाचित्र टिपताना आपला नेमकं काय टिपायचं, कसं टिपायचं याची योजना, आणि आपल्याला हा चित्नातून काय दाखवायचं आहे, याची संकल्पना खूप महत्त्वाची असते.
छायाचित्र ण या प्रक्रि येला जवळ जवळ 200 वर्षाचा इतिहास आहे. या 200 वर्षात छायाचित्र णाचं तंत्नज्ञान बदलत गेलं, त्याचे विषय आणि त्याचा हेतूही बदलत गेला. जगात, सर्वात प्रथम काढलं गेलेलं छायाचित्र कोणतं यावर कदाचित एकमत नसेल; पण नॅशनल जिओग्राफीकच्या मते 1826 साली फ्रेंच शास्त्नज्ञ जोसेफ निप्स यानं जे छायाचित्र काढलं ते जगातलं सर्वात पहिलं छायाचित्र.
छायाचित्र ही केवळ एक प्रतिमा नसते. त्यामागे एक विचार, एक बायस क्रि एट होतो. छायाचित्र कार प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षण टिपताना तो क्षण कसा सुंदर दिसू शकेल यावर विचार करता असतो. म्हणजेच, कदाचित प्रेक्षकाच्या मनात सौंदर्याची व्याख्या त्याच्या छायाचित्र मधून पोहचवत असतो. तो क्षण प्रेक्षकांना बघण्यासाठी साठवून ठेवत असतो.
एकूणच छायाचित्नण केवळ एक तांत्रिक गोष्ट राहत नाही. आणि याच विचारानं काही लेखक छायाचित्र णाच्या प्रक्रि येवर विचार करत आहेत.
1971 साली सुझन सोन्ताग या लेखिकेने न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स या नियतकालिकात एक लेखमाला प्रकाशित केली. यामध्ये तिने छायाचित्नणाला अतिशय वेगळ्या पद्धतीनी बघण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या ‘ऑन फोटोग्राफी’ या पुस्तकामध्ये ती छायाचित्र ण ही कला म्हणून त्याकडे सौंदर्याच्या दृष्टीने तर पाहतेच; पण त्याच बरोबर छायाचित्नणाच्या क्रि येमध्ये काही नैतिक प्रश्न आहेत का, याबद्दलही विचार मांडते. तिच्या पुस्तकामध्ये सुझन छायाचित्रना केवळ एका चित्र च्या पलीकडे नेऊन ठेवते. आणि आपल्याला एकूणच छायाचित्नांबद्दल विचार करायला प्रभावित करते. थोडक्यात, मांडायचं झालं तर तिच्या मते छायाचित्न कधीच संपूर्ण चित्न दाखवत नाहीत; त्यामुळे छायाचित्नांवर अवलंबून राहिलं तर आपल्याला कधीच पूर्ण सत्य कळत नाही, कळतं ते तोकडं, सोयीचं सत्य (!?). त्यामुळे छायाचित्रकडे बघताना कायम सत्य, किंवा वास्तवाचा आग्रह सोडून पाहिलं तर प्रेक्षकांचा भ्रमनिरास होणार नाही असं ती म्हणते.
याच विषयावरचं सबॅस्टिको सालगं गाडो याचं ‘द सायलेण्ट ड्रामा ऑफ फोटोग्राफी’ हे भाषणही ऐकायला विसरू नका.
ते या लिंकवर पाहता येईल..
https://www.ted.com/talks/sebastiao_salgado_the_silent_drama_of_photography?language=en