युद्ध टिपणारी लिंडसी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 04:52 PM2018-01-31T16:52:01+5:302018-02-01T15:48:38+5:30

युद्ध आणि शांतता. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

Photojournalist lynsey addario | युद्ध टिपणारी लिंडसी

युद्ध टिपणारी लिंडसी

Next

- प्रज्ञा शिदोरे
युद्ध आणि शांतता. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. युद्धाचे परिणाम, त्याचा अर्थ लावण्यासाठी, तो विध्वंस, युद्धानं बदललेली माणसं आपल्यासमोर आणण्यासाठी अनेक पत्रकार थेट फ्रण्टलाइनवर आपला जीव धोक्यात घालून ‘सत्य’ सांगण्यासाठी धडपड करत असतात. सध्याच्या जगातल्या सर्वोत्त्तम ५ फोटो जर्नलिस्टपैकी एक म्हणजे लिंडसी आडारीओ.

लिंडसी मूळची पत्रकार. २६ वर्षे वय होतं तेव्हापासून ती जगभरात ‘युद्धाची’ छायाचित्रे काढत फिरते आहे. ३ वर्षांपूर्वी तिनं तिचे सर्व अनुभव एका पुस्तक स्वरूपात लिहून काढले. या पुस्तकाचं नाव, ‘इट्स व्हॉट आय डू’, अ फोटोग्राफर्स लाइफ आॅफ लव्ह अ‍ॅण्ड वॉर.
ती म्हणते की, कॉनफ्लिक्ट कव्हर करणारे फोटोग्राफर्स हे अधाशी असतात. त्यांना जेवढं मिळालं आहे तेवढ्यात त्यांचं कधीच समाधान होत नाही. त्यामुळेच ते जगाला वास्तव दाखवू शकतात. हे वास्तव दाखवण्याच्या गडबडीत ते अनेकवेळा एक अदृश्य लक्ष्मणरेषा पार करतात आणि मग तिथल्या स्थानिकांचा रोष ओढवून घेतात. २०११ मध्ये लिबिया कव्हर करतानाही असंच काहीसं झालं असावं असं तिला वाटत. म्हणूनच तिला आणि तिच्या बरोबरच्या ४ पत्रकारांना लिबियात गद्दाफीच्या गुंडांनी पकडलं. त्यातला एक पत्रकार मारला गेला; पण लिंडसी काही दिवसांनी तावडीतून सुटली. या प्रसंगानंतर तिने हे पुस्तक लिहायला घेतलं.

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर लिंडसीच्या ब-याच मुलाखती झाल्या. अनेक ठिकाणी तिला भाषणांसाठीही बोलावलं गेलं. त्यातली अनेक भाषणं व मुलाखती आपल्याला यू ट्यूबवर ऐकता आणि पाहता येतात. यू ट्यूबवर हं१ ढँङ्म३ङ्मॅ१ंस्रँी१ छ८ल्ल२ी८ अििं१्रङ्म असा सर्च केलात तर तिच्या भाषणाच्या आणि मुलाखतीच्या लिंक्स पाहता येतात. बरंच काही आॅनलाइनही आहे, ते वाचताही येईल.

 pradnya.shidore@gmail.com

Web Title: Photojournalist lynsey addario

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.