एक गुलाबी बंड!

By admin | Published: April 16, 2015 04:54 PM2015-04-16T16:54:00+5:302015-04-16T16:54:00+5:30

तरुण फॅशन जगात सध्या एक ट्रेण्ड आहे! म्हणजे तिकडे अमेरिकेत तरी तरुण जगात याच ट्रेण्डची चर्चा आहे! त्याचं नाव आहे ‘थिंक पिंक’! तसे थिंक पिंक या फ्रेजचे अनेक संदर्भ आहेत. पण त्याचा इथं संदर्भ नाही, इथं एक साधीसरळ हौस आहे. गुलाबी रंगाच्या वस्तू वापरण्याची!

A pink rebellion! | एक गुलाबी बंड!

एक गुलाबी बंड!

Next

 थिंक पिंक-गुलाबी रंगाचे कपडे वापरण्याचं आहे डेअरिंग?

 
 
तरुण फॅशन जगात सध्या एक ट्रेण्ड आहे!
म्हणजे तिकडे अमेरिकेत तरी तरुण जगात याच ट्रेण्डची चर्चा आहे!
त्याचं नाव आहे ‘थिंक पिंक’!
तसे थिंक पिंक या फ्रेजचे अनेक संदर्भ आहेत.
पण त्याचा इथं संदर्भ नाही, इथं एक साधीसरळ हौस आहे.
गुलाबी रंगाच्या वस्तू वापरण्याची!
होतं काय की, गुलाबी रंगावर शिक्का बसलाय, रोमॅण्टिक असल्याचा! त्यामुळे येताजाता, रोजच्या वापरात कुणी सतत गुलाबी रंग वापरायला लागलं की, बाकीच्यांच्या नजरा लगेच बदलतात.
त्यातही मुलींनी गुलाबी रंग वापरला तर एकवेळ चालून जातं,पण मुलांनी वापरणं, म्हणजे पुरुषांनी गुलाबी रंग वापरणं?
अनेकांना ङोपतच नाही!
आता मात्र अनेक मुलामुलींनी हे जुनाट स्टिरीओटायपिंग मोडीत काढायचं ठरवलं आहे!
आणि त्याचंच नाव आहे, थिंक पिंक!
आता या समरमधे ( म्हणजे उन्हाळ्यात) न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ¨पंकच्या अनेकानेक शेड्स दिसण्याची शक्यता आहे.
कारण एक नवीन ट्रेण्ड ज्याचं नावच आहे, थिंक पिंक! लोकं नाही म्हणतात म्हणून पिंक वापरायचं नाही हे कुणी ठरवलं असं या ट्रेण्डचं म्हणणं! आहे आपलं वय आणि स्वभाव आणि वृत्तीही रंगीन, तर वापरू ना पिंक, त्यात काय असा हा अॅटिटय़ूड! म्हणून यंदाच्या समरमधे  शर्ट्स, पॅण्ट्स, जॅकेट्स, पर्सेस, सनग्लासेस, बूट हे सारं पिंकच्या छटात वापरण्याचा अनेकांचा इरादा आहे.
म्हणूनच सध्या या थिंक पिंक ट्रेण्डने सध्या सोशल मीडीयासह तिकडच्या तरुणांमधे चांगलाच धूमाकुळ घातला आहे! आणि थिंक पिंक हा एक नवीन ट्रेण्ड सध्या फॅशनेबल होतो आहे!
प्रचलित रंगाच्या विरोधात हे एकप्रकारचं बंडचं.गुलाबी बंड!

Web Title: A pink rebellion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.