पॉईण्टलेस
By admin | Published: March 10, 2017 12:56 PM2017-03-10T12:56:03+5:302017-03-10T12:56:03+5:30
आपण काय बोलतोय, याचं काही भान? आणि किती बोलतोय? -असं घरचे नाही तर सोशल मीडियातज्ज्ञच म्हणायला लागलेत, सोशल मीडियावर पडीक असणाऱ्या आणि तडतडून भांडणाऱ्यांना!
Next
>- निशांत महाजन
आपण काय बोलतोय, याचं काही भान?
आणि किती बोलतोय?
-असं घरचे नाही तर सोशल मीडियातज्ज्ञच म्हणायला लागलेत, सोशल मीडियावर पडीक असणाऱ्या आणि तडतडून भांडणाऱ्यांना!
त्यांना एक नवीन शब्द आलाय सध्या पॉइण्टलेस. थोडक्यात पीएल.
म्हणजे काय तर अशा चर्चा आणि असे संवाद की ज्यातून काहीच हाती लागत नाही. नुस्ती चर्चा. शब्दबंबाळ तोफगोळ्यांची नुस्ती फेकाफेक. पुढे शिवीगाळ. मग परस्परांच्या जातीपातींचा नुस्ता उद्धार. आणि त्यातून मग राग, संताप आणि त्यातून पुन्हा वैरभाव.
जन्माचे वैरी असावेत असे एकमेकांचे वैरी सोशल मीडियावर दिसतात.
भांडतात.
त्या सगळ्यांना एकाच संज्ञेत सध्या कोंबता येऊ शकतं त्याला म्हणतात पॉइण्टलेस.
म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण फार विद्वताप्रचुर चर्चा करतो. आपण फार तज्ज्ञ आहोत. जगात काय वाट्टेल ते घडो आपल्याला सर्व विषयांत मत आहेच.
पण खरं तर ही माणसं अनेकदा पॉइण्टलेस चर्चेत अडकलेली असतात.
आणि त्यातून पोकळ पोकळ बोलत राहतात...
या पॉइण्टलेस अर्थहीन चर्चांचा या माणसांच्या जगण्यावर, रोजच्या वर्तनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास आता सोशल मीडियातज्ज्ञ करू लागले आहेत.