कष्ट+संघर्ष+मेहनत+नशीब=स्टार्स

By admin | Published: January 21, 2016 09:10 PM2016-01-21T21:10:29+5:302016-01-21T21:10:29+5:30

क्या यार स्ट्रगल-स्ट्रगल. दो लाइन में बोलू. सरफरोश में 15 सेकंद का रोल था मेरा. फिर मुन्नाभाई में 2 मिनट का रोल मिल गया

Poor + struggle + hard work + destiny = stars | कष्ट+संघर्ष+मेहनत+नशीब=स्टार्स

कष्ट+संघर्ष+मेहनत+नशीब=स्टार्स

Next
>- नवाजुद्दीन सिद्दीकी
(लोकमत दीपोत्सव-2013)
 
 
क्या यार स्ट्रगल-स्ट्रगल.
दो लाइन में बोलू.
सरफरोश में 15 सेकंद का रोल था मेरा.
फिर मुन्नाभाई में 2 मिनट का रोल मिल गया.
अब सोचो, 15 सेकंद से 2 मिनट तक का फास्ला तय करने के लिए मुङो 3 साल लग गये, ये होता है स्ट्रगल.
पर अब उसका कितना ¨ढढोरा पिटना.
जो उठतो तो माङया स्ट्रगलचं कौतुक करत सुटतो. तेच तेच विचारतो. 
मगर जमाना वो भी था जब कोई कुछ भी पुछने को तय्यारही नहीं था. जमाना ये भी है, जब मेरे स्ट्रगल के भी चर्चे है..
खरं तर एकच, त्या तडफडकाळात माङया आईच्या एका वाक्यानं माङयातली भंजाळलेली तगमग कायम ठेवली. कधी कधी उदास होऊन मी घरी फोन करायचो. सांगायचो, काहीच घडत नाही. पैसे नाहीत. ती म्हणायची, बारा महिने में एक बार तो कचरे के ढेर की भी जगह बदलती है, तुम तो इन्सान हो; कैसे कुछ नहीं बदलता. बदलेगा. देख ले.!’
मला बरं वाटायचं. 
वाटायचं, ठीक है कचरा हुँ. लेकीन हुँ तो सही.!
आपण जिंदा ‘आहोत’ आणि आपल्यातही ‘काहीतरी’ आहे असं वाटायला लागलं की माणूस आपल्या वाटा आपले आपणच हुडकायला लागतो.
माझं तरी वेगळं काय झालं. 
कला कशाशी खातात माहिती नसलेला एक तरुण; ज्याच्या डोक्यातला नाटक करायचं हा किडा जगणं मुश्कील करत होता. 
एखादा उपाशी माणूस अन्न दिसल्यावर कसं खातो, तसे दिवस जगलोय मी एनएसडीत. तिथं काय नव्हतं. पुस्तकं, डॉक्युमेण्टरी, वल्र्ड सिनेमा, बाकी ढीगभर साहित्य.
किती घेऊ नी किती नको असं मला झालं होतं. ज्या गोष्टी असतात हेच माहिती नव्हतं, त्या मी पाहत आणि वाचत सुटलो होतो.
मस्त जगून घेतलं मी त्या काळात.
संपलं मग एनएसडीतलं शिक्षण.
पुढे.?
गरिबी फारच असह्य झाली तेव्हा विचार केला, चलो मुंबई. अगर भुकाही मरना है तो मुंबई जाके मरा जाए.
आलो मुंबईत. वाटलं होतं, आपण एनएसडीवाले. एनएसडी नाम बोलकेही काम मिल जाएगा.
भ्रमाचा भोपळा फुटला. कुणी उभं करायला तयार नाही. टीव्हीत भिका:याचा रोल करायचा तरी सहा फूट उंच, गोरे तगडे तरुण लागत त्याकाळी.
आणि मी असा. काळपट, जेमतेम उंच. अजिबात हिरो मटेरिअल नसलेला.
किती डोकं आपटलं, पण कुणी काम देईना. 
किती ठिकाणी फिरलो आणि किती धडका मारल्या तेव्हा मला पहिल्यांदा रोल मिळाला, तोही आमीर खानच्या सिनेमात. सरफरोश. 15 सेकंदाचं काम. मग पुढे 3 वर्षे पुन्हा तेच, कामाचा शोध. सतत नकारघंटा. मी तर रिजेक्शनप्रूफ झालो होतो.
3 वर्षानी मला मुन्नाभाई एमबीबीएस मधला 2 मिन्टाचा रोल मिळाला. प्लॅटफॉर्मवरचा तो चोर सगळ्यांच्या लक्षात राहिला.
त्याच काळात बॉलिवूडचा सिनेमा थोडा थोडा बदलायला लागला होता. नवीन तरुण डिरेक्टर्स यायला लागले होते. माङयासारखेच भारताच्या खेडोपाडय़ातली दुनिया पाहिलेले, जगलेले, भोगलेले.
त्यांना तसा सिनेमा करायचा होता. त्यांच्या सिनेमात फक्त सुंदर-ग्लॅमरस चेहरे नव्हते, त्यांना सामान्य माणसांसारखी दिसणारी माणसं पडद्यावर जिवंत करायची होती. माङयासारख्या माणसांना मग सिनेमात जागा व्हायला लागली.  लोकांना मी ‘दिसायला’ लागलो. मग कहानी-तलाश या सिनेमांनी कमर्शियली पण चालायला लागलो.
माङयासारख्या अतिसामान्य चेह:याचा माणूस ‘कुछ बन सकता है’ हे आजच्या बॉलिवूडचं ट्रथ आहे. आणि बॉलिवूडचंच कशाला, समाजाचंही हेच वास्तव आहे. सामान्य माणसातली आग, तगमग आणि काहीतरी मोठ्ठं करण्याची ऊर्मी हे आपल्या समाजाचं वर्तमान आहे. आणि म्हणून माङया स्ट्रगलमधे माणसं काहीतरी शोधत असावीत. 
मी स्ट्रगल करायचो, उपाशी राहायचो, नाश्ता-दुपारचं जेवणं आणि संध्याकाळचं जेवण म्हणूनही चहा-बिस्कीटच खायचो. त्याकाळातही मी स्वतला एकच गोष्ट सांगायचो, आजही तेच सांगतो.
अगर सफलता बडी चाहिए तो इम्तिहान बडा होगा, फस्ट्रेशनभी बडाही होगा.
 

Web Title: Poor + struggle + hard work + destiny = stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.