सकारात्मक दृष्टीची प्रांजल
By admin | Published: June 3, 2016 12:39 PM2016-06-03T12:39:00+5:302016-06-03T12:39:00+5:30
तिनं दिल्लीत जेएनयूमध्ये एम.ए., एम.फिल. केलं, पीएच.डी. केलं. आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षाही उत्तीर्ण केली. यासा:या प्रवासात डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून तिचं काही अडलं का?
Next
>आपला दृष्टिकोन, जिद्द आणि कठोर परिश्रमच आपलं यशअपयश ठरवतात हे सांगणा:या प्रांजल पाटीलशी विशेष गप्पा.
यूपीएससीच्या निकालाबद्दल दरवर्षी सर्वानाच उत्सुकता असते. देशातील सर्वात कठीण समजल्या जाणा:या या परीक्षेत यश मिळविणा:या विद्याथ्र्याचं सर्वानाच कौतुक असते पण काही जणांचे यश हे कौतुकाच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी प्रेरणा बनतं. यूपीएससीच्या अलीकडेच लागलेल्या निकालात 773 वा क्रमांक मिळविणा:या प्रांजल पाटीलचं यशही असंच आहे.
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी अपघातामुळे आपली दृष्टी गमवावी लागलेल्या प्रांजलने पहिल्याचं प्रयत्नात यूपीएससीमध्ये हे यश मिळवलं आहे. सध्या जेएनयूमधून पीएचडी करणा:या प्रांजलचं यश हे केवळ ही परीक्षा पास होण्यापुरतं मर्यादित नाही, तर आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करून सकारात्मक दृष्टिकोनानं परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेला सामोरं जाण्यात आहे. स्पर्धा परीक्षेतल्या यशाबरोबरच प्रांजलचा एकूण शैक्षणिक प्रवासही कौतुकास्पद आहे.
कल्याणजवळच्या उल्हासनगरची असलेल्या प्रांजलने तिनं दहावीर्पयतचं शिक्षण दादरच्या कमला मेहता अंध प्रशालेमधून पूर्ण केलं. अकरावी-बारावी उल्हासनगरमधल्याच ‘सीएचएम’ कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर पदवीसाठी तिनं सेंट ङोव्हिअर्स कॉलेजला प्रवेश घेतला. राज्यशास्त्रमधून बीए करणारी प्रांजल कॉलेजची टॉपर होती. पदवी घेतल्यानंतर प्रांजलच्या शैक्षणिक आयुष्यातला पुढचा टप्पा होता. दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. अर्थात जेएनयू. ‘ह्यूृमॅनिटिज’ मधल्या अभ्यासक्रमांसाठी देशातलं अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणा:या ‘जेएनयू’मधून तिनं राज्यशास्त्रतच एम.ए.केलं, त्यानंतर एम.फिल.ही केलं. सध्या ती ‘इंटरनॅशनल रिलेशन्स’ या विभागात ‘वेस्ट एशियन स्टडिज’ंमधून पीएचडी करते आहे. आता या सगळ्या अभ्यासामध्ये यूपीएससीचा विचार नेमका केव्हा आणि कसा आला, हा प्रश्न पडणं स्वाभाविक होतं.
‘ग्रॅज्युएशन करत असतानाच मी यूपीएससीबद्दल ऐकलं होतं. प्रांजल सांगत होती. ‘त्यानंतर या परीक्षेबद्दल मी माहिती मिळवत गेले. त्यानंतर जाणवलं की या सेवांच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही करता येऊ शकतं. त्यामुळे यूपीएससी द्यायचं हे तेव्हापासूनच मनात होतं. पण पोस्ट ग्रॅज्युएशन, एम.फिल, पीएचडी असं सगळंच एकत्र करणं कठीण होतं. त्यामुळे यूपीएससीची तयारी लांबणीवर पडली.
पीएचडीचं पहिलं वर्ष आणि यूपीएससीची तयारी असं दोन्ही एकदमच सुरू होतं. मी दोन्हीचा मेळ घालायचा खूप प्रयत्न करायचे, पण कधीकधी खूप टेन्शन यायचं आणि मग दोन्हींपैकी काहीच व्हायचं नाही.’ प्रांजल आपली कशी तारांबळ व्हायची, हे सांगत होती. पण मैत्रिणींनी जेव्हा तू केवळ टेन्शनमुळे काहीच करू शकत नाहीयेस हे लक्षात आणून दिलं, तेव्हा मात्र तिनं आपल्या अभ्यासाचं नीट नियोजन करायला सुरुवात केली.
एकदा हे नियोजन झाल्यावर तूसुद्धा यूपीएससीची तयारी करणा:या इतर मुलांप्रमाणोच बारा ते चौदा तास अभ्यास केलास का, असं विचारल्यावर प्रांजलने खूप प्रामाणिकपणो ‘नाही’ असं उत्तर दिलं.
ती म्हणाली, ‘सुरुवातीला मी तसा प्रयत्न करून पाहिला पण तासांच्या हिशेबात अभ्यास करणं माझा पिंड नाही, हे मला जाणवलं. मग मी रोज कोणते विषय, त्यातले कोणते भाग पूर्ण करायचे ते ठरवायचे आणि त्यानुसार अभ्यास करायचे.’
प्रांजलने कोणताही क्लास लावला नव्हता पण तिने टेस्टसीरिज मात्र लावली होती. तिच्या अभ्यासाच्या पद्धतीला टेस्टसीरिज पूरकच ठरली कारण दर आठवडय़ाला टेस्ट दिल्यानंतर आपण नेमकं कशात कमी पडतोय, हे कळायचं आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवता यायची. प्रांजलच्या ग्रुपमध्येही कोणीच यूपीएससीची तयारी करणारं नव्हतं. त्यामुळे प्रांजलला आपल्या अभ्यासाची पद्धत आणि दिशा ठरवणं, स्वत:च्या चुका शोधून त्या दुरुस्त करणं या गोष्टी स्वत:च कराव्या लागायच्या. या ट्रायल अॅण्ड एरर मेथडचा काही बाबतीत फायदा झाल्याचंच प्रांजल सांगत होती.
याच सकारात्मक उज्रेनं तिने परीक्षाही दिली.
परीक्षेचे पाच दिवस तर मला खूप ‘मज्जा’ आली असं प्रांजल म्हणत होती. तिच्या रायटरलाही तिची ही ऊर्जा जाणवत होती. कारण दोन पेपरच्या मधल्या वेळेत ती तिला म्हणायची की आजूबाजूच्या इतर मुलांच्या तुलनेत तू मला खूप रिलॅक्स्ड आणि शांत वाटतीयेस. या सर्वामुळे प्रांजलचा आत्मविश्वास वाढत गेला आणि मुलाखतीचा टप्पाही यशस्वीपणो पार पाडून प्रांजलने यूपीएससीच्या अंतिम यादीत स्थान मिळवलं.
यश मिळाल्यानंतरच्या प्रतिक्रियेतून प्रांजलचा अॅटिटय़ूड अधोरेखित झाला. ती सांगते, ‘माङयासाठी केवळ निकालाचा दिवस महत्त्वाचा नव्हता. या संपूर्ण परीक्षेची अभ्यासाची प्रक्रियाच एक्सायटिंग होती. यश मिळालं किंवा नाही मिळालं तरी या परीक्षेमुळे तुमचा गोष्टींकडे बघण्याचा पर्सेक्टिव्हच बदलतो. तुम्ही तणावाचं नियंत्रण कसं करू शकता हेसुद्धा या परीक्षेतून आपसूकच तपासलं जातं,’ असं सांगत प्रांजलने जणू या परीक्षेची तयारी करणा:यांना या परीक्षेकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनच दिला आहे.
मी जेव्हा प्रांजलशी बोलत होते, तेव्हा तिची आनंदी वृत्ती, उत्साहच जाणवत होता. आपल्या शारीरिक कमतरतेचा कुठेही उल्लेख नाही, त्याचा न्यूनगंडही नाही. तिच्याकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवलं की स्वप्नं पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नसते, त्यासाठी गरजेची असते ती स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीची! या तीन गोष्टींच्या जोरावरच सर्व अडथळ्यांवर मात करत यश मिळवता येऊ शकतं हेच प्रांजलने दाखवून दिलं आहे.
-अमृता कदम
पुस्तकं आधी स्कॅन करायची,
मग वाचायची!
यूपीएससीच्या परीक्षेत वाचाव्या लागणा:या पुस्तकांची यादी पाहिली तरी छाती दडपायला होतं. ही पुस्तकं वाचायचं काम प्रांजलसाठी इतर मुलांच्या तुलनेत अधिक किचकट होतं. कारण त्यासाठी तिला एका सॉफ्टवेअरची मदत घ्यावी लागत होती. ही पुस्तके स्कॅन करायची आणि मग त्यातल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तो वाचायचा शिवाय यामध्येही एक तांत्रिक अडचणही होती. हाताने काढलेल्या नोट्स या सॉफ्टवेअवरमध्ये अॅक्सेप्टच होत नाहीत. त्यामुळे प्रांजलच्या अभ्यासातला काही वेळ हा या तांत्रिक गोष्टींमध्येच जायचा. ‘मला कधी कधी हे करतांना खूप कंटाळा यायचा. आपला वेळ, ऊर्जा या सर्वात खर्च होतेय असंही वाटायचं, पण मला मुळातच अभ्यास आवडतो, त्यातून एक ऊर्जा मिळते. त्यामुळेच मग तुलनेने या गोष्टी नगण्य वाटायच्या आणि मी अभ्यासाला लागायचे,’ असं प्रांजलनं सांगितलं तेव्हा तिच्या यशात या सकारात्मक वृत्तीचाही मोठा वाटा आहे, हे जाणवतंच!
परीक्षेची तयारी आणि पीएचडी सुरू असतांनाच नोव्हेंबर 2क्14 मध्ये प्रांजलचं लग्न झालं. तिचे पती कोमलसिंह पाटील यांचा भुसावळमध्ये केबलचा व्यवसाय आहे. आपल्या यशात पतीचा आणि कुटुंबीयांचाही वाटा असल्याचं प्रांजलने सांगितलं. लग्नानंतरचं पहिलंच वर्ष असलं तरी प्रांजल या काळात दोनदाच घरी गेली. घरच्यांनीही सणवार, कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं बंधन तिच्यावर लादलं नाही. हा पाठिंबा माङयासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं प्राजल आवजरून नमूद करते.
घरापासून लांब राहून परीक्षेची तयारी करणा:या मुलांच्या बाबतीत मित्र-मैत्रिणी हेच कुटुंब बनून जातं. प्रांजलच्या मैत्रिणींनी हीच जबाबदारी पार पाडली. तिची जवळची मैत्रीण अर्चना रोज लवकर उठून तिच्यासाठी डबा तयार करायची. पण अर्चनाला उशीर झाला तर गडबड नको म्हणून रोमा आणि सुधा या दोन मैत्रिणीही लवकर उठून बसत. बॅक अप प्लॅन तयार ठेवत. यासगळ्यांनी प्रत्येक टप्प्यावर प्रांजलची मदत केली.