Pride month: एकीकडे सोशल मीडियात दिमाखात मिरवले जाणारे सप्तरंगी झेंडे, दुसरीकडे दहशत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:26 PM2020-06-25T17:26:32+5:302020-06-25T17:28:20+5:30

जून महिना एलजीबीटी समुदाय प्राइड मंथ म्हणून साजरा करतो, पण या समुदायातील तारुण्याचे प्रश्न आजही बिकट आहेत.

pride parade- pride month & struggle for accepting sexuality. | Pride month: एकीकडे सोशल मीडियात दिमाखात मिरवले जाणारे सप्तरंगी झेंडे, दुसरीकडे दहशत.

Pride month: एकीकडे सोशल मीडियात दिमाखात मिरवले जाणारे सप्तरंगी झेंडे, दुसरीकडे दहशत.

Next
ठळक मुद्दे हे वास्तव कधी बदलणार?

- सूरज राऊत

कोण असतात बरं हे प्राइड परेड काढणारे लोक ? हा आहे आमचा समलिंगी, उभयलिंगी आणि तृतीयपंथी समुदाय. म्हणजेच एलजीबीटी.  लेस्बियन, गे, बायसेक्श्युअल, ट्रान्सजेण्डर असा समुदाय. जो गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्य समाजप्रवाहात येण्याची स्वप्न उराशी बाळगतोय. स्वत:च्या लैंगिकतेविषयी कुठलाही संकोच न बाळगता रस्त्यावर आपल्यासारख्या समूहासोबत चालणं आणि आपलं  अस्तित्व उघडपणो मांडणं, स्वत:च्या हक्कांच्या लढाईचा प्रवास अगदी आनंदाने जगासमोर मांडणं म्हणजेच प्राइड परेड. त्यात हा जूनचा महिना आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो. जूनचा महिना प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो. 
या महिन्याचं असं काय वैशिष्टय़ आहे आमच्यासाठी? असं काय घडलं होतं या महिन्यात? या मागचा इतिहास हा मोठा रोचक आहे.
28 जून 1969 मध्ये न्यू यॉर्कजवळील ग्रीनीच नामक छोटय़ा गावात घडलेली ही घटना. हा हिंसाचार स्नो वॉल नामक गे बार मध्ये घडला. रात्नी 1 वाजून 2क् मिनिटांनी. त्या बारवर साध्या वेशातील पोलिसांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय धाड टाकली. त्यांनी तेथील ग्राहकांना बाहेर यायला सांगून एका ओळीत उभं केलं, स्त्नी वेशातील पुरुषांची त्यांनी बाथरूममध्ये जाऊन तपासणी केली. त्यांचाकडे ओळखपत्नाची मागणी केली असता त्यांनी ओळखपत्न दाखवण्यास नकार दिला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. हा गोंधळ सुरू असताना बारमधले काही ग्राहक पोलिसांच्या नजरेतून सुटून बाहेर पडले. त्यांनी बरीच गर्दी जमा केली. लवकरच या गर्दीने उत्स्फूर्त घोषणाबाजी सुरू केली. त्यातील काही जणांनी गे पॉवर अशा घोषणा दिल्या तर काहीजणांनी वी शाल ओव्हरकम हे तत्कालीन वर्णद्वेषा विरोधाच्या चळवळीचं द्योतक बनलेलं गाणं उत्स्फूर्तपणो गायला सुरुवात केली. हाच तो क्षण जेव्हा आज ज्याला आपण गे राइट्स मुव्हमेण्ट म्हणून ओळखतो त्या चळवळीचं स्फुलिंग चेतवलं गेलं. या घटनेच्या स्मरणार्थ न्यू यॉर्कमध्ये पहिली प्राइड परेड 28 जून 1970 मध्ये झाली. अशा रीतीने प्राइड परेड ही संकल्पनेने जन्म घेतला.
अमेरिकेत एवढी स्थित्यंतरं येत असताना  भारतात मात्न पहिली परेड व्हायला तब्बल 30 वर्षे लागली. केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील पहिली प्राइड परेड 2 जुलै 1999 मध्ये कोलकातामध्ये निघाली. 
आजवर आपली लैंगिक ओळख लपवत, घुसमटत असलेल्या अनेकांना या प्राइड परेडमधून जगासमोर आपली ओळख स्वीकारण्याचं बळ मिळालं. 
या प्राइडचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भिन्न लैंगिकतांबाबत जनजागृती निर्माण करणं.


कोलकाता परेडने जुन्या  कायद्याविरोधातील लढाईचे रणशिंग फुंकलं. भारतातील अनेक शहरांमध्ये अशा प्राइड परेड आयोजित करण्यात आल्या. तब्बल वीस वर्षाच्या झुंजीनंतर 6 सप्टेंबर 2018 रोजी या कालबाह्य कायद्यात सुधारणा करण्यात आली. 
मी काही कायदा वा समाजशास्त्नाचा विद्यार्थी नाही. एलजीबीटी चळवळीशी मी व्यक्तिश: निगडित असण्याचं हे तिसरं वर्ष. पण या तीन वर्षात मला नेहमी हेच जाणवत आलंय की अमेरिकेतील एका छोटय़ा गावात सुरू झालेली ही नागरी हक्काची लढाई आजमितीला भारतात मात्न निव्वळ प्राइड आणि पार्टी या अत्यंत मर्यादित स्वरूपात मूठभर उच्चभ्रू शहरी भागांमध्येच अडकून पडलेली दिसते. मी स्वत: मराठवाडय़ातील छोटय़ाश्या शहरातून पुण्यात आलो. सर्वदूर भागात यासंदर्भात जनजागृती व्हायला हवी. केवळ एक एलीट क्लास मुव्हमेण्ट अशी ओळख उरलेली ही एलजीबीटी चळवळ डी क्लास होऊन एक मास चळवळ बनावी, असं मला मनापासून वाटतं. 
आजही भारतातल्या गावोगावी आणि शहरांमध्येदेखील आपल्या भिन्न लैंगिक जाणिवा आणि अस्मितांबाबत अनभिज्ञ एक खूप मोठा समूह धुमसत, घुसमटत आपली ओळख लपवून जगत आहे.
 एकीकडे दिमाखात मिरवले जाणारे सप्तरंगी झेंडे, सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर झळकत असताना दुसरीकडे मात्न आपल्या लैंगिकतेविषयी उघडपणो बोलल्यास राहत्या घरादाराला मुकावे लागेल या दहशतीच्या सावटाखाली अनेकजण जगत आहेत. कलम 377 मध्ये सुधारणा केली असली तरीही भारतीय मानसिकतेमध्ये ब:याच सुधारणांची नितांत गरज आहे.
लैंगिक ओळखीसह विनासंकोच जगण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना मिळणं ही खरी गरज आहे.

 


.

Web Title: pride parade- pride month & struggle for accepting sexuality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.