तसलं तर काही पाहत नाही? -पबजीच्या क्रेझवर तरुणांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:23 PM2020-09-10T17:23:31+5:302020-09-10T17:27:41+5:30

पबजी खेळत होतो; पण तसलं म्हणजे पोर्न तर पाहत नव्हतो असं तरुण मुलं का सांगतात?

pubg craze & restless youth | तसलं तर काही पाहत नाही? -पबजीच्या क्रेझवर तरुणांचा सवाल

तसलं तर काही पाहत नाही? -पबजीच्या क्रेझवर तरुणांचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देएक गेम काय बॅन झाला. जगण्याचं रिकामपणही असं जगजाहीर झालं. 

- प्रगती जाधव-पाटील, 

लॉकडाऊनच्या सहा महिन्यांत पबजीने आम्हा मित्रांमध्ये अनोखं नातं रूढ केलं.. वर्षानुवर्षे ज्यांच्यासोबत शिक्षण घेतलं त्यांच्याबरोबर टय़ूनिंग जुळलं ते या खेळामुळेच.. पबजी हा स्ट्रॅटजी गेम आहे. त्याचं व्यसन नाही लागतं. मात्र स्ट्रेस रिलीज करण्याचा आम्हा सर्वाचा उत्तम पर्याय होता.. 
-तो सांगत असतो. पबजीवर बंदी आल्यानंतर या खेळाचे शौकीन असणारी तरुणाई अक्षरशर्‍ दुर्‍खात बुडाली होती. या गेमवर उदरनिर्वाह असणारे स्ट्रिमर तर अक्षरशर्‍ उद्ध्वस्त होऊन समाजमाध्यमांद्वारे आपली हतबलता व्यक्त करत आहेत. काहींनी तर कुटुंबीयांशी बंड करून हा खेळ खेळण्यासाठी घर सोडलं होतं.
 पाश्र्वभूमीवर सातारा तालुक्यातील करंजे गावचा सुमित काळभोर, पबजी तोही खेळायचा. लॉकडाऊन काळात सकाळी 9 र्पयत उठून आवरून 11 ते 1 या वेळेत तो वॉर्मअप मॅच खेळायचा. दुपारी 2 ते सायंकाळी 6 असं चार तास मुख्य गेम खेळली जायची. त्यानंतर डोळ्यांना विश्रांती आणि मोबाइल चाजिर्गच्या निमित्ताने गेम बंद ठेवली जायची. सायंकाळी सातनंतर लॅपटॉपवर सोशल मीडियाद्वारे ‘स्ट्रिमर ट्रीक्स’ बघण्यात तास दीडतास सहज जायचा. घराल्यांबरोबर रात्रीचं जेवण झालं की दहा ते अकरा वॉर्मअप गेम व्हायची. साडेअकरा नंतर पुढं किमान चार तास स्ट्रॅटजी करून ही गेम पहाटेर्पयत असं अनेकांचं रूटीन होतं.


आता मात्र अनेकांनी रात्री लवकर झोपणं स्वीकारलं आहे किंवा नव्या खेळांचा शोधही सुरू केला आहे. त्यात अनेक स्ट्रिमरची क्रेझ असते ती वेगळीच. बॉलिवूडच्या तार्‍यांपेक्षाही अधिक फॅन फॉलोईंग स्ट्रिमर मुलांची असते हे तरुणाईच्या विश्वातलं वास्तव आहे. 
सध्या स्ट्रिमर कॉल ऑफ डय़ूटी (सीओडी), ह्युमन फॉल फ्लॅट नावाचे नवे गेमही तरुणांच्या हाती दिसू लागलेत. ‘फौजी’ गेमची चर्चाही सुरू झाली आहे.
त्यात एक वाक्य अनेकजण ऐकवतात.  ‘तसलं’ बघण्यापेक्षा पब्जी बरं!
लॉकडाऊनच्या काळात होस्टेलमधून घरी आलेल्या अनेक मुलांना एकटं वाटत होतं. म्हणून त्यांनी या गेमचा आधार घेतला. सोशल मीडियावर वाट्टेल ते बघण्यापेक्षा ही गेम खेळणं कधीही सरस असा युक्तिवाद या तरुणाईचा आहे. विशेष म्हणजे जगभरात अनेक वयोगटांमध्ये पॉर्न व्हिडिओ बघण्याचे प्रमाण अधिक आहे. आपण तसलं तर काही पाहत नव्हतो ना, असंही अनेकजण सांगतात.
एक गेम काय बॅन झाला.
जगण्याचं रिकामपणही असं जगजाहीर झालं. 

(प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे)
 

Web Title: pubg craze & restless youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.