पाणवठय़ावरच शुद्धीकरण
By admin | Published: January 7, 2016 10:07 PM2016-01-07T22:07:47+5:302016-01-07T22:07:47+5:30
वॉटर प्युरिफायरच्या जाहिराती आपण रोज पाहतो, पण ज्यांना ते प्युरिफायर विकत घेणं परवडत नाही त्यांचं काय? त्यांनी अशुद्धच पाणी प्यायचं का?
Next
>सोरिंग लेपचा, सुभाष प्रोधान
इयत्ता सहावी, सिक्कीम
वॉटर प्युरिफायरच्या जाहिराती आपण रोज पाहतो, पण ज्यांना ते प्युरिफायर विकत घेणं परवडत नाही त्यांचं काय? त्यांनी अशुद्धच पाणी प्यायचं का? हा प्रश्न या सिक्कीमच्या दोन मुलांना पडला आणि त्याचं उत्तर त्यांनी शोधलं. त्यांची आयडिया अशी की, गावातल्या पाणवठय़ावरच सेण्ट्रलाईज्ड शुद्धीकरण यंत्रणा बसवा किंवा शुद्धीकरणासाठीच्या छोटय़ा तोटय़ा बनवून त्या नळाला लावा. नियमित स्वच्छ करा, बदला आणि पुन्हा लावा. असं केलं तर सगळ्यांना नळ सुरू केल्यावर स्वच्छ पाणी मिळेल. नाहीतर ज्यांच्याकडे पैसा ते स्वच्छ पाणी पिणार आणि ज्यांच्याकडे नाही ते अशुद्ध, असा भेदभाव कशाला?
सोरिंग म्हणतो, ‘आमच्या शाळेत नळ उघडला की गढूळ पाणी येतं. काही मुलं घरून पाणी आणतात. आणि आम्हाला वॉटरबॅगही मिळत नाही म्हणून मग आम्ही ते पाणी प्यायचं का? म्हणून मला वाटतं की, थेट पाणवठय़ावरच फिल्टर लावलेले उत्तम!’