तीन वर्षे पुरुषोत्तम करंडक जिंकणार्या नगरकर संघाच्या यशाचं रहस्य काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 07:26 AM2019-09-26T07:26:00+5:302019-09-26T07:30:07+5:30
डोंगरावर जाऊन गुराख्यांशी बोलण्याचा सराव करणारे, म्हशीशी गप्पा मारणारे, नगरकडचीच मराठी बोलणारे तरुण कलाकार त्यांच्या ‘तयारीत’ असं काय होतं, की त्यांनी तिसर्यांदा अहमदनगरला पुरुषोत्तम करंडक जिंकून दिला?
- साहेबराव नरसाळे
नगरजवळचा डोंगऱ डोंगरावर 15 ते 20 तरुण़ त्यांच्या पुढय़ात म्हैस़ म्हशीला एक तरुण कुरवाळतो़ तिच्या पाठीवर थाप टाकतो़ म्हशीला ओंजारतो-गोंजारतो़ स्वतर्च्या तोंडावर म्हशीचं शेपूट फिरवून घेतो़ म्हशीच्या कातडीचा हाताला चिकटलेला वास घेतो़ तिची सडं पिळतो आणि म्हणतो - ‘माझी लाली लई झ्याक हाय़़’
- हरवत चाललेल्या नात्यांची गोष्ट शोधायला शिकविणारी ही ‘लाली’़ या एकांकिकेची कथा डोंगर, नदी, मळे, शेत, विहिरीच्या बगलांनी जन्माला येत़े पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या आधी ही कथा त्या डोंगरावर घडत असत़े तरुणांचा जथ्था रोज त्या डोंगरावर जातो़ म्हशीला घेऊन डोंगर, नदी, शेतशिवारात एकांकिकेची तालीम करतो़ आजूबाजूचे आवाज टिपतो़ खाचखळग्यांमध्ये कलंडलं की कळतं काय होतं ते. झाडांच्या पानांची सळसळ, म्हशीचं ओरडणं आणि त्या म्हशीचा लळा आपल्यात भिनवतो़
का?
तर आपलं नाटक आपल्यातच जेव्हा चांगलं भिनलं, तेव्हाच ते रंगमंचावर चांगलं उतरलं, असा दिग्दर्शकाचा विचाऱ कृष्णा वाळके हा ‘लाली’ या एकांकिकेचा लेखक, दिग्दर्शक़ पुरुषोत्तम जिंकण्यासाठी त्यानं, त्याच्या टीमनं कशी मेहनत घेतली, हे तो सांगत होता़
‘लाली’नं पुरुषोत्तम करंडक जिंकला आणि नगरकरांच्या नावे सलग तिसर्यांदा पुरुषोत्तम जिंकण्याचा इतिहास रचला़ हा इतिहास आजवर पुणेकरांनी अनेकदा लिहिला़ पण नगरकरांना जिथं प्रवेशही मिळत नव्हता, त्याच प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम एकांकिकेचा करंडक नगरची मुलं तीन वर्षापासून डोक्यावर मिरवायला लागलीत़ 2017 साली ‘माइक’, 2018 मध्ये ‘पीसीओ’ आणि 2019 मध्ये ‘लाली़’ पुरुषोत्तममध्ये हॅट्ट्रिक करणार्या एकांकिकांची ही नावं़ यातील ‘माइक’ व ‘लाली’ या न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या तरुणाईने गाजवल्या, तर पेमराज सारडा कॉलेजमधील अमोल साळवेच्या ‘पीसीओ’ एकांकिकेने पुण्यात डंका वाजवला़ ‘माइक’ व ‘लाली’ या दोन्ही एकांकिकेचा दिग्दर्शक एकच कृष्णा वाळके ़ तो गावपण अंगावर पांघरून शहरात शिकायला गेलेला. कोणत्याही गोष्टीतून शिकत राहण्याचा त्याचा स्वभाव़ ‘माइक’ एकांकिका करतानाही त्यानं तेच केलं होतं, जे लालीच्या वेळेस केलं. सर्व कलाकारांना त्यानं नगरमधल्या गणेश मंडळांच्या मंडप उभारणीच्या कामाच्या ठिकाणी पाठवलं़ मंडप कसा उभारतात, कामगारांचे संवाद कसे असतात, हालचाली कशा करतात, त्यांच्यातील चपळाई, अशा विविध बाबींचं निरीक्षण करून पुन्हा संध्याकाळी सराव करायचा़ दिवसभर जे पाहिलं, ते संध्याकाळी करून दाखवायचं़ त्यातून ‘माइक’ तयार झाली़ ‘माइक’ ही एकांकिका संदीप दंडवतेनं लिहिली़ पुढे कृष्णा लिहिता झाला़ त्यानं तीन एकांकिका लिहिल्या़ त्यांचे राज्यभर प्रयोग केल़े अनेक पारितोषिकं पटकावली़ ‘लाली’ एकांकिका ही त्यानंच लिहिली़ लालीचं कथानक म्हशीभोवती फिरून माणसांच्या नात्यावर भाष्य करतं़ हरवत चालेल्या नात्यांचा शोध घ्यायला शिकवतं़ विषय एकदम सोप्पा़ मात्र, कृष्णा वाळकेनं ही एकांकिका लिहिताना त्यात गावातली निरागसता टाकली, ग्रामीण बाज ओतून तिला जिवंत केलं़
लोकांना इम्प्रेस करण्यासाठी व्यक्त होऊ नका, तुम्ही उत्तमरीतीने एक्स्प्रेस व्हा, लोकं आपोआप इम्प्रेस होतात. आम्ही तेच केलं़ तीन महिने फक्त व्यक्त होण्याचा आम्ही सराव केला, असं कृष्णा सांगतो़
महाराष्ट्रात रंगभूमीवर काम करणार्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, आपण पुरुषोत्तम करंडक करावा आणि तो जिंकावा़ पुरुषोत्तम जिंकणार्या कलाकारांना कलेच्या प्रांतात एक वेगळा दर्जा असतो, केवढा मोठा लौकिक या स्पर्धेनं कमावला आह़े म्हणूनच अभिनयाचा कीडा वळवळणार्या प्रत्येक तरुणाईचं पुरुषोत्तम जिंकण्याचं स्वप्न असतं़ ते स्वपA या नगरकर मुलांच्या डोळ्यातही होतं. त्यांनी ते नुसतं पाहिलं नाही जून दाखवलं. 2018 मध्ये कृष्णाने ‘व्हायरल’ ही एकांकिका केली होती़ ती निखिल शिंदे याने लिहिली होती़ दिग्दर्शन कृष्णा वाळकेनं केलं होतं़ प्रयोग दज्रेदार झाला होता़ मात्र, नगरच्याच पेमराज सारडा कॉलेजच्या ‘पीसीओ’नं ‘व्हायरल’ला रोखलं आणि पुरुषोत्तमवर नाव कोरलं़ आता या वर्षी सलग तिसर्या वर्षी पुरुषोत्तममध्ये सहभागी होण्याचा निर्णय कृष्णाने घेतला़ टीम तयार होतीच़ कथा त्याचीच होती़ अगदी त्याच्या घरातली़ त्याचं गाव बीड जिल्ह्यातील लोणी सय्यदमीर (ता़ आष्टी)़ त्याच्या घरी म्हशी होत्या़ त्यांना चारण्यासाठी तो डोंगरावर घेऊन जायचा़ त्याच डोंगरावर या कथेने जन्म घेतला़ एकांकिका लिहून झाल्यानंतर पुरुषोत्तम करायचं ठरलं़ पुरुषोत्तम जिंकण्यासाठी सलग तीन महिने त्यांनी थेट डोंगरावर जाऊन सराव केला़
कृष्णा सांगतो- ‘लाली’ ही प्रायोगिक एकांकिका आहे. माझ्यासाठी व टीमसाठी ती एक कार्यशाळा होती. त्यामध्ये आम्ही खूप काही वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रय} केला. आम्ही डोंगरावर जाऊन प्रॅक्टिस केली. त्याचा फायदा आम्हाला खूप झाला. बोलीभाषा, लहेजा, दिग्दर्शन, लेखन पूर्ण नाटक हे माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती. पण ‘माइक’ व ‘व्हायरल’च्या जोरावर मी करू शकलो. टीमवर्कमुळे सलग तिसर्यांदा पुरुषोत्तम जिंकण्यात यशस्वी झालो. संपूर्ण एकांकिका बसविण्यासाठी न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ़ भास्कर झावरे, प्रा़ नवनाथ येठेकर, प्रा़ अनंत काळे यांनी मार्गदर्शन केल़े
सलग तीन वर्ष नगरकरांनी पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरलं़ ही सर्व मुलं मातीतून आलेली़ गावपण जपणारी़ अभिनय करतानाही कृत्रिम रंग लावण्यापेक्षा सच्चाई, निरागसता आणि गावठी बाज ओतून अभिनयाचे मळे ते फुलवू लागलेत आणि तेच सगळ्यांना भावतंय़ !
**************
पुरुषोत्तम करंडक विजेत्या
लाली एकांकिकेचा संघ व पारितोषिक
कृष्णा वाळके र् दिग्दर्शनासाठी गणपतराव बोडस करंडकाचा मानकरी
संकेत जगदाळे र् अभिनयासाठी योगीराज मोटे नैपुण्य पारितोषिक
रेणुका ठोकळे र् अभिनयासाठी काकाजी जोगळेकर उत्तेजनार्थ पारितोषिक
प्रकाश योजना र् अभिषेक रकटे
संगीत र् शुभम घोडके
रंगमंच व्यवस्था र् श्रेयस बल्लाळ, हृषिकेश हराळ, अथर्व धर्माधिकारी, तेजश्री वावरे, भाग्यश्री राऊत, हृषिकेश सकट, निखिल शिंदे, रेवन महानवर, ऋषभ कोंडावर, साईराज कोहोकडे, अंजली कोंडावर, पूजा मिसाळ, प्रणव रोकडे, विराज अवचित़े
(साहेबराव लोकमतच्या अ.नगर आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.)