वाट्टेल तिथं गाडी लावताय?
By Admin | Published: July 9, 2015 06:55 PM2015-07-09T18:55:03+5:302015-07-09T18:55:03+5:30
अत्यंत साधी गोष्ट असते. एकदम बेसिक. ऑफिसचं पार्किग.
- मृण्मयी सावंत
अत्यंत साधी गोष्ट असते. एकदम बेसिक. ऑफिसचं पार्किग.
तुम्ही भुर्रकùùन जाता, कशीबशी गाडी लावता, कुठंही टू व्हीलर उभी करता. उशीर इतका झालेला असतो की सरळ साईड स्टॅण्डलाच गाडी लावता. मेन स्टॅण्डला पण नाही. बघतपण नाही की आपण कशी गाडी लावलीये? कुणाच्या गाडीच्या मागे? त्या लोकांना गाडी काढता येईल का?
अनेक ठिकाणी अलॉटेड पार्किग असतं. मॅनेजर ते एमडीर्पयतच्या लोकांसाठीचं कार पार्किग वेगळं असतं. आपण नवीन गाडी घेतली म्हणजे लगेच त्याच जागेत नेऊन गाडी लावू नये. आपण स्वत:ला त्यांच्या बरोबरीचे समजायला लागलो किंवा तेच समजायला लागलो असा त्याचा अर्थ होऊ शकतो.
हे सारं जेव्हा तुम्ही करता, तेव्हा त्यावरून लोकं तुमची परीक्षा करतात.
तुमची वृत्ती जोखतात आणि तुम्ही किती बेदरकार आणि बेजबाबदार आहात हेच तुम्ही त्यातून जगाला ओरडून सांगता.
त्यामुळे ऑफिसमधे गाडी पार्क करणं, हीदेखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
बेसिक मॅनर्सची.
आपल्याला कुठं कोण पाहतंय, असं समजू नका.
तुमची परीक्षा रोज सुरू असते. हरघडी. हर मिनिट!!