उताण्या घागरीतले प्रश्न

By admin | Published: August 20, 2015 03:16 PM2015-08-20T15:16:01+5:302015-08-20T15:16:01+5:30

गोविंदा पथकातल्या मुलांच्या हितासाठी सगळेच वाद घालताहेत; पण या मुलांना गोविंदात काय सिद्ध करायचं असतं, हे कुठं कुणाला कळतं?

The question in the lower house | उताण्या घागरीतले प्रश्न

उताण्या घागरीतले प्रश्न

Next
>
- स्नेहा मोरे
 
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं! गोविंदाकडे एक खेळ म्हणून पाहिलं जावं, त्याला ‘खेळा’च्या सुविधा मिळाव्यात असा त्यामागचा मानस!
मात्र त्यामुळे तरुण गोविंदा सुखावले का?
जे स्वत:च्या खांद्याचा पहाड करत थरावर थर लावतात, त्या गोविंदांना यातून काय मिळेल?
खरंतर दहीहंडीतील वाढत्या थरांच्या उंचीला आणि त्यातील अल्पवयीन मुलांच्या सहभागाला अनेक नागरिकांसह सामाजिक संस्थांचा विरोध आहे. 
हे गोविंदा पैशासाठी आपला जीव धोक्यात घालतात असा आक्षेपही आहे. 
आणि त्यावरून राजकीय पक्षांनी तापवलेलं राजकारणही आहे.
मात्र ज्यांच्या जिवासाठी आणि हितासाठी हा सारा वाद ऐन पावसात भडकला आहे,
त्या गोविंदांना या वादाविषयी काय वाटतं?
ते का गोविंदा पथकात जातात?
घरची गरिबी, कष्ट आणि जीवतोड मेहनत
या सा:यातून त्यांना काय मिळतं?
की निव्वळ थरथराटातून त्यांची घागर उताणीच राहते?
मुंबईतल्या गोविंदा पथकांच्या सरावात सहभागी होत केलेला हा एक ग्राउण्ड रिपोर्ट.. पण गोविंदांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी, यासंदर्भातला वाद नेमका काय आहे, हे सांगणा:या या दोन बाजू. आणि आतल्या पानात, गोविंदातल्या पोरांशी गप्पा..
 
 
विरोध कशाला?
 
मला तुमची काळजी का वाटावी?
दहीहंडीत फक्त पाच थरांर्पयतच परवानगी असावी आणि अल्पवयीन मुलांना त्यात सहभागी करू नये, या मागणीसाठी चेंबूरच्या स्वाती पाटील यांनी हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. तेव्हापासून दहीहंडी हा उत्सव वादाच्या भोव:यात अडकला आहे. याचिकेला एक वर्ष उलटूनही अजूनही या उत्सवाबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 
याबाबत प्रत्येक निकषावर अभ्यास करून याचिकाकत्र्या राज्य शासनाला आव्हान देत आहेत. शिवाय, अखेरीस गोविंदांच्या सुरक्षेपोटी पाटील यांनी सर्व पथकांना लेखी निवेदनही देण्याचा निश्चय केला आहे. ‘मला तुमची काळजी का वाटावी?’ या मथळ्याखाली त्यांनी पथकांना एक निवेदन केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘प्रत्येक जीव हा अनमोल आहे, त्यामुळे थरांच्या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी होताना आपल्या आई-वडिलांचा विचार करा!’
या आवाहनात त्यांनी पथकांना सांगितलंय की, या उत्सवाचं बाजारीकरण होतंय आणि तुमच्यातील स्पर्धा वाढविण्यामागे आयोजक कारणीभूत आहेत. दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजक गोविंदांच्या सुरक्षेची कोणतीच जबाबदारी घेत नाहीत. 
या दहीहंडीच्या ‘इव्हेंटीकरणा’ला उत्सवाचे रूप देण्यासाठी गोविंदा पथकांच्या सहकार्याची गरज असून, गंभीर दुखापत झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या गोविंदाच्या आई-वडिलांच्या जागी स्वत:ला उभे करा आणि विचार करा, असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.  एकंदर उत्सवाला विरोध नाही असं त्या स्पष्ट सांगतात. केवळ यातील स्पर्धेला आळा घाला, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 
 
हित कुणाचं?
 
हंडीतल्या ‘लोण्या’चे राजकारण!
ठाण्याच्या संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड यांनी उंचच उंच थराची मागणी लावून धरली आहे. उत्सवावरच आक्रमण होत असल्याचं एक वातावरण तयार केलं जात आहे. युक्तिवाद असाही आहे की, अनेक साहसी खेळांत खेळाडूंना प्राण गमवावे लागतात मग ते खेळ कुणी बंद करतं का?
त्यासाठी मग मोर्चेबांधणी, लढाया सुरू आहेत.
गोविंदा पथकांनाही त्यात सामील करून घेतलं जात आहे.
**
गोविंदांचं राजकारण एकीकडे, तर दुसरीकडे त्याला आलेलं इव्हेण्टी स्वरूप.
त्यातून फिरणारा पैसा, होणारी उलाढाल, बडे बडे प्रायोजक, टीव्हीवर लाइव्ह दिसणारे  कार्यक्रम आणि होणारी पथकांसह सा:यांचीच कमाई.
या आर्थिक हितसंबंधांमुळेही हंडय़ांची वाढती उंची, लहान मुलांचा सहभाग, त्यात होणारे अपघात हे विषय डोळ्याआड केले जात आहेत का, असा प्रश्न आहेच!
***
मुंबईतला गोविंदा ठाण्यात जास्त मोठा झाला.
आता तो तिथूनही बाहेर पडत नाशिक-नागपूर-पुण्याच्या दिशेनं जात आहे.
प्रश्न तिथेही तेच आहेत, कारण गोविंदांचा इव्हेण्ट तिथंही होतोच आहे!

Web Title: The question in the lower house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.