न धुतलेल्या जीन्सचे प्रश्न

By admin | Published: July 9, 2015 07:19 PM2015-07-09T19:19:34+5:302015-07-09T19:19:34+5:30

फॅशनच्या नावाखाली हवामानाचा आणि ऋतूंचा विचार न करता जीन्स वापरणं हे धोकादायकच

Question of washed jeans | न धुतलेल्या जीन्सचे प्रश्न

न धुतलेल्या जीन्सचे प्रश्न

Next
>- प्राची खाडे
 
फॅशनच्या नावाखाली हवामानाचा आणि ऋतूंचा विचार न करता जीन्स वापरणं हे धोकादायकच
 
आपला देश उष्ण हवामानाचा देश आहे.
या देशात उकाडाच इतका की, घाम येणारच! तुम्ही भले सदासर्वकाळ एसीत राहा, पण प्रवास करताना, बाहेर पडताना तरी उकाडा जाणवणारच! त्यातून घाम येणारच!
आणि जे लोक एसीत नसतात त्यांना तर घाम येणं, घामानं चिकचिक होणं, कपडय़ांना वास, ते ओलसर होणं हे सारं घडतंच!
आणि मग हे सारं जर घडत असेल तर आपल्या कपडय़ांनाही थोडा मोकळा श्वास घेता यायला हवा. ब्रिदिंग स्पेस मिळायला हवी. कपडेच कशाला, आपले शूज, आपण वापरत असलेले दागिने, इतर गोष्टी या सा:याच संदर्भात हा विचार करायला हवा.
मात्र होतं काय की, हवामान आणि आपली गरज याचा विचार न करता अनेकजण फक्त फॅशनचाच विचार करतात. 
जीन्स फॅशनेबल आहे ना मग सतत जीन्सच वापरायची असा एक पक्का समज आपल्याकडे मुलामुलींचा असतो.
त्यात आता युरोपात लेअरिंगचा ट्रेण्ड, कपडय़ांवर कपडे घालायची फॅशन. मग ती फॅशन लगेच आपल्याकडेही काहीजण उचलतात. पण हे करताना समजूनच घेत नाही की, तिकडे थंडी असते म्हणून तिकडे कपडय़ांवर कपडे घातले तर ते चालतात. आपल्याकडे इतक्या उन्हाळ्यात लेअरिंगची फॅशन आणि जीन्स घातली तर उकडून बटाटाच होणार नाही तर काय?
त्यामुळे कुठलीही गोष्ट फॅशन म्हणून वापरताना आपण फॅशनचे बळी ठरणार नाही ना, याचा विचार करायला हवा.
आणि त्याचबरोबर एक साधा नियमही लक्षात ठेवायला हवा की, आपल्याकडचं वातावरण, ऋतुमान, त्यात ऋतूत वापरता येणारे रंग आणि त्यानुरूप फॅब्रिक म्हणजेच कपडा, आपल्या समाजात वावरण्याचे संकेत, हे सारं विचारात घेऊन खरंतर आपल्या कपडय़ांची निवड करायला हवी.
मात्र तसं होत नाही. सगळे जीन्स वापरतात म्हणून मग बाकीचेही वापरतात. 
मुलंमुली एकाच उत्साहात जीन्स नावाची फॅशन जवळ करतात.
मात्र जीन्स घालताना काही चुका हमखास केल्या जातात.
त्या आपल्याही नकळत सवयीनं होतात. तेवढय़ा तरी किमान टाळायला हव्यात.
 
जीन्स खरेदी करताना काय चुकतं?
1) जीन्स ही एक गुंतवणूक आहे हे लक्षात घ्या. एकदा जीन्स घेतली की लगेच दुसरी जीन्स आपण घेत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा जीन्स घ्यायची तेव्हा ती ब्रॅण्डेडच घ्या. ती भले महाग असेल, थोडी आऊट ऑफ बजेट असेल पण जीन्स घ्यायची तर ब्रॅण्डेड आणि चांगल्या दर्जाचीच घ्यायला हवी.
त्याची कारणं दोन.
एकतर ब्रॅण्डेड जीन्सचं फिटिंग चांगलं असतं.
दुसरं म्हणजे कापडाचा दर्जा. चांगली जीन्स कधीही धुतल्यावर आटत नाही. कापड चांगलं असतं. त्यामुळे घाम आल्यामुळे होणारे प्रश्न कमी होऊ शकतात.
2) कायम आपल्या मापाचीच जीन्स घ्या. अनेकजणी आपण बारीक होऊ या आशेनं एक साईज छोटी जीन्स घेतात. ती घट्ट होते आणि ती घालून वावरणंही अवघड होतं. वाईट दिसतं ते वेगळंच.
3) आपण जी जीन्स घेऊ ती कुठलाही बेल्ट न लावता आपल्याला कंबरेत उत्तम फीट बसली पाहिजे हा नियम कायम लक्षात ठेवायचा.
 
जीन्स वापरताना हमखास काय चुका होतात?
1) सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायजिन सांभाळायला हवं. स्वच्छता सांभाळायलाच हवी. अनेकजण जीन्स धूतच नाहीत.
2) सगळीकडे म्हणजे कॉलेज, क्लास, जीम, भाजीबाजार सगळीकडे एकच जीन्स वापरतात. त्यातून इन्फेक्शन्स होऊ शकतात.
3) नियम एकच, जीन्स धुवा. वारंवार धुवा. जर जीन्स न धुताच वापरली तर त्यातून अनेक आजार होऊ शकतात.
 
 
जीन्स वापरताना होणा:या 5 चुका
 
1) महिनामहिना जीन्स न धुणं.
2) दुस:याची जीन्स बिंधास्त वापरणं.
3) घट्ट-अती टाइट जीन्स वापरणं.
4) पावसाळ्यात-उन्हाळ्यातही जीन्स वापरणं, त्यातून घामाचा त्रस, गच्च ओल्या जीन्सचा त्रस सहन करणं.
5) जीन्स म्हणजेच ट्रेण्डी फॅशन असा गैरसमज बाळगत तो जोपासणं.

Web Title: Question of washed jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.