बोलणा-याच्या कुळथाला भाव
By admin | Published: July 2, 2015 03:13 PM2015-07-02T15:13:51+5:302015-07-02T15:13:51+5:30
न बोलणा-याचे गहूही विकले जात नाही, हे व्यवहारज्ञान सांगणारं हे जुनंच स्किल, ज्याला आता प्रेझेण्टेशन म्हणतात. नुस्त्या ढोर मेहनतीला काही अर्थ नाही, तुमचं काम इतरांना ‘दिसलं’ पाहिजे!
Next
>समिंदरा हर्डिकर-सावंत
न बोलणा-याचे गहूही विकले जात नाही, हे व्यवहारज्ञान सांगणारं हे जुनंच स्किल, ज्याला आता प्रेझेण्टेशन म्हणतात. नुस्त्या ढोर मेहनतीला काही अर्थ नाही, तुमचं काम इतरांना ‘दिसलं’ पाहिजे!
----------
‘त्याला ना येत जात काही नाही, पण प्रेङोण्ट असं करतो स्वत:ला की, जसं काही हाच सगळं करतो! आणि आम्ही मात्र काम करकरून मरतो, पण कुणाला आमचं काम दिसतंही नाही!’
असा कलकलाट अनेकजण करतात. तुम्हीही करत असाल, पुढे पुढे करणारे, स्वत:चं काम दाखवून देणारे पुढे जातात आणि नुस्तं काम करणारे कुणाला दिसतही नाही ही आजकालच्या जगातली एक कॉमन तक्रार आहे!
पण या तक्रारीकडे निगेटिव्हलीच कशाला पहायला हवं?
नव्या काळात प्रेङोण्टेशन स्किल हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. त्याला मराठीत आपण सादरीकरण कौशल्य म्हणू! आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या व्यावसायिक युगामध्ये तुम्ही स्वत:ला आणि तुमच्याजवळ असलेल्या कौशल्याला कशा प्रकारे प्रेङोण्ट करता, हे फार महत्त्वाचं बनत चाललं आहे. गुणवत्ता असणं तर महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर गुणवत्तेला योग्य प्रकारे सादर करणं, आपलं काम लोकांना दिसू देणं, त्या कामाची चर्चा होऊ देणं आणि आपल्याला स्वत:लाही उत्तम प्रेङोण्ट करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
त्यामुळे उगीच या स्किलला कमी न लेखता, त्याकडे निगेटिव्हली आणि आकसापोटी न पाहता प्रभावी सादरीकरण नावाची ही कला शिकून घ्यायला हवी.
हल्ली ना प्रेङोण्टेशन म्हटलं की, एकच गोष्ट आठवते, पॉवर पॉईण्ट प्रेङोण्टेशन!
ते तर महत्त्वाचं आहेच. कम्प्युटरवर काम करून उत्तम पीपीटी करणं, ते उत्तम सादर करणं, आपला प्रोजेक्ट काय आहे, हे समोरच्याला प्रभावी पद्धतीनं सांगता येणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ते तंत्र शिकून त्यापद्धतीनं प्रेङोण्टेशन करणं ही नव्या काळात आवश्यक गोष्ट आहे. ती शिकून घ्यायलाच हवी. पण प्रेङोण्टेशन ही गोष्ट इथं संपत नाही, तर सुरू होते.
पीपटी हा त्यातला एक अत्यंत छोटा, सुरुवातीचा पण महत्त्वाचा टप्पा! ते झालं एक टेक्निकल स्किल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे विचार कशा प्रकारे मांडता, तुम्ही लोकांबरोबर कशा प्रकारे कम्युनिकेट करता, तुमची संवाद कला कशी आहे अशा अनेक गोष्टींवर तुम्ही काम करणं गरजेचं असतं.
तुमचं दिसणं, तुमचं वागणं, बोलणं, पीपीटी करणं, स्वत:ला इतरांसमोर सादर करणं, आणि त्यातून संवाद साधणं या सा:याचा या प्रेङोण्टेशन स्किल्समध्ये समावेश होतो.
ते शिकण्यासाठीची ही काही सूत्रं.
प्रेङोण्टेशन स्किल शिकण्यासाठी लागतं काय?
* तुम्ही किती आत्मविश्वासाने तुमच्या विषयासंदर्भात बोलता याने पहिलं इम्प्रेशन उत्तम तयार होतं. तयारी उत्तम करा, घाबरू नका. नुस्तं पीपीटी करतानाच नाही तर एरव्हीही आपल्या विषयासंदर्भात बोलताना स्वत:वर विश्वास ठेवा की, जमेल आपल्याला.
हा आत्मविश्वास असेल आणि तुम्ही स्वत:वर भरवसा ठेवणार असाल तर तुम्हाला अनेक गोष्टी सहज जमतील!
* तुमचा आवाज स्पष्ट व खणखणीत ठेवा, घाबरू नका. त-त-अ-अ करणं ही अत्यंत वाईट गोष्ट दिसते. त्यातून कळतं की, तुमची तयारी झालेली नाही. त्यामुळे स्पष्ट, खणखणीत बोला.
* तुमची बॉडीलॅँग्वेज तुमच्याविषयी बरेच काही सांगून जाते. तुमचे हावभाव, हातवारे, चेह:यावरचं हसू सर्व काही तुमच्या बोलण्याशी सुसंगत आहे का याकडे लक्ष द्या.
* तुमचा पोशाख, तुमची केशरचना हेसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या राहणीमानाकडे लक्ष द्या.
* नेहमीच मुद्याला धरून बोला. विषयांतर टाळा. उगीच गॉसीप, हवेत बाता मारणं, बडे दावे करणं टाळा!
* नेहमी वेळेची मर्यादा पाळा. वेळेवर पोहचणं, आपल्याला दिलेल्या वेळेत बोलणं, आणि इतरांच्या वेळेचा आदर करणं हे सारंही या कौशल्याचा भाग आहे.
* सगळ्यात महत्त्वाचं, इतरांचं ऐकून घ्यायला तयार रहा. अनेकदा तर बोला कमीच, जास्त ऐकून घ्या!