पाऊस, ट्रेकिंग, इत्यादी..
By admin | Published: June 23, 2016 05:37 PM2016-06-23T17:37:17+5:302016-06-23T17:37:17+5:30
पावसाळा सुरू झाला असं म्हणावं इतपत पाऊस अजून झालेला नसला तरी पावसाळी पिकनिकचे प्लॅन्स सुरू झाले आहेतच..
Next
>- निशांत महाजन
पावसाळा सुरू झाला असं म्हणावं इतपत पाऊस अजून झालेला नसला तरी पावसाळी पिकनिकचे प्लॅन्स सुरू झाले आहेतच..
आमच्याही ग्रूपमध्ये यंदा कुठल्या ‘अननोन’ जागी जायचं याची चर्चा आहेच..
ते ही बाइकवर. बुंगाट!
मात्र मागच्या काही वर्षांचा आमचा अनुभव पाहता काही गोष्टी प्लॅन करतानाच लक्षात ठेवलेल्या बºया..
ट्रेकिंगला, फिरायला कुठं जायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, पण ही काही सूत्रं सोबत ठेवाच..
१) अननोन डेस्टिनेशना हट्ट सोडा. खूप सूनसान डोंगरावर मुक्काम सहसा टाळा.
२) सेल्फी तर पूर्ण बंद. फोटोसेशनही आटोक्यात ठेवा. ते ही सपाटीवर. टोकांवर नाहीच.
३) हातपाय घसरून कुणी पडलं तर सोबत औषध हवं आणि मदतीला येतील अशा टप्पयात माणसं हवी.
४) भर पावसात गाड्या चालवायच्या नाहीत.
५) रात्री तर अजिबात नाही.
६) जिथं जाऊ नये असं लिहून ठेवलंय सरकारनं तिथं अजिबात जाऊ नये!
७) दारु -अजिबात नाही. कधीच नाही.
८) स्वयंपाक शक्यतो नकोच. त्यातही रॉकेल सोबत न्यायचं नाही.
९) पावसात भिजायचं म्हणून रात्री बाहेर हुंदडायचं नाही.
१०) घरी आपले सर्व संपर्क नंबर देऊनच जायचं. घरी खोटं बोलून जायचं नाही.