रणवीर सिंग सारखा कॉन्फिडन्स आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:57 PM2018-10-19T17:57:55+5:302018-10-19T17:58:01+5:30
असेल तर तो घालतोय तसे ट्रेण्डी कपडे घाला, किती दिवस ते काळे-पांढरेच शर्ट घालणार?
- श्रुती साठे
रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या स्टाइल स्टेटमेण्टसाठी ओळखला जातो. बरेच लोक त्याला नाकं मुरडताना दिसतात. पण काही असो, तो त्याला हवा तसा जगतो. बेफिक्र. अजिबातच जगाची तमा न बाळगणारा हा हिरो स्टेटमेण्ट पिसेस घालून बिनधास्त आणि कॉन्फिडण्ट असतो. ते त्याला चांगलं दिसतं की नाही हा प्रश्न इथं अगदीच गौण आहे; पण त्याला जे हवं तेच तो करतो हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे.
रणवीर नुकताच एका टीव्ही शोसाठी प्रिंटेड शर्ट आणि जॅकेटमध्ये दिसला. वरसाचे हा जागतिक दर्जाचा ब्रँड त्याच्या बोल्ड स्टाइल्ससाठी प्रसिद्ध आहे. वरसाचे फॉल विंटर कलेक्शनमधील हा पीस वाइल्ड अॅनिमल स्टोरीने प्रभावित दिसतो. रणवीरने त्याबरोबर सोन्याच्या चेन्स, ब्लॅक ट्राउसर आणि ब्लॅक शूजही घातले होते.
एकंदरीतच हल्ली कॉलेज तरु ण नेहमीचे प्लेन कपडे बाजूला ठेऊन प्रिंटेड, एम्ब्रॉयडरी केलेले शर्ट वापरताना दिसतात. बहुतेक करून पुरुषांची पारंपरिक पोशाखात नवीन स्टाइल ट्राय करायची तयारी आता दिसू लागली आहे. मग तो हाय-लो कुर्ता असेल किंवा फ्लोरल प्रिंटेड फेटा असेल. शेवटी त्यांनासुद्धा ‘व्हाय शुड गल्र्स हॅव ऑल द फन?’ असं वाटत असेलच की. बरोबर ना?
रोजच्या पांढर्या, ग्रे, काळा शर्ट, टी-शर्ट आणि टिपिकल चिनो, ट्राउजरचा कंटाळा आला असेल तर आता तरुणांनीही रणवीरसारखं धाडस करून बघालयला हवं. पण लक्षात ठेवा, हे असे आउट ऑफ द वे स्टाइल करताना जोरदार कॉन्फिडन्स हवा!