...रे भैय्या छुटे लगान!
By admin | Published: June 17, 2016 07:47 AM2016-06-17T07:47:33+5:302016-06-17T07:47:33+5:30
लगान सिनेमा रिलीज होऊन काल १५ वर्षे पूर्ण झाली.. एखादा सिनेमा येतो नी जातो, त्यात काय विशेष? पण काल ट्विटरवर अनेकांनी आमीरला शुभेच्छा देत लगानच्या आठवणी जागवल्या! सेलिब्रेट केलं ‘गोऱ्यां’विरुद्ध एक क्रिकेट मॅच जिंकणं.
लगान सिनेमा रिलीज होऊन काल १५ वर्षे पूर्ण झाली.. एखादा सिनेमा येतो नी जातो, त्यात काय विशेष? पण काल ट्विटरवर अनेकांनी आमीरला शुभेच्छा देत लगानच्या आठवणी जागवल्या!
सेलिब्रेट केलं ‘गोऱ्यां’विरुद्ध एक क्रिकेट मॅच जिंकणं.
आज तिशीत असलेल्या कुणालाही आपल्या कॉलेजच्या काळात थिएटरात फुल चिअर करत लगान पाहिल्याच्या आठवणींविषयी विचारा..
जोरदार कॉमेण्ट्रीच सुरू होते.
आणि आपणच जिंकल्याचा आनंद साजरा होतो..
रे भैय्या छुटे लगान म्हणत तीनगुना लगान मधून सुटका झाल्याचा आनंदच साजरा होतो..
का?
कारण त्याकाळचा तरुण तो/ती स्वत:ला त्या भूवनमध्ये शोधत राहतो. खमका, रिस्क घ्यायला तयार असलेला, सगळ्यांना सोबत घेऊन अशक्य ते शक्य करुन दाखवायला निघालेला आणि प्रस्थापित सत्तेच्या नजरेत नजर घालून पाहणारा..
भूवन म्हणतो ना, ‘गोरे पतलून पहनके इ खेल को क्रिकेट कहते है, और हम लंगोटी बांधके गिल्ली दंडा!’
त्यावेळी अनेकजण स्वत:ला सांगत असत मनातल्या मनात की, कपडेलत्ते, इंग्रजी अॅक्सेण्ट महत्वाचं नाही, तुला तुझं काम नीट करता येतंय ना ते महत्वाचं!’
म्हणून तर ‘हिंमत ना हारेंगे, सबको बतादेंगे, हम लोगोंका दर्जा है क्या..’ असं म्हणणारा कचराही आपल्याच मनातल्या भावना बोलत राहतो.
हे असे किती प्रसंग, किती कहाण्या भेटतात..
ज्या सिनेमापुरत्या नाही तर त्याकाळी तरुण होत असलेल्या आणि खेडीपाडी, छोटी शहरं सोडून मोठ्या शहरांची वाट धरलेल्या अनेकांच्या होत्या. प्रस्थापित दुनियेत स्वत:चा लगान चुकता करायला निघालेल्या अनेकांना वाटलं होतं की, हिंमत केली तर भूवनसारखी ही मॅच आपणही जिंकूच..
त्या जिंकण्याची प्रेरणा म्हणजे तो भूवन आणि त्याची टिम होती..
जी जिंकली..आणि ती सिनेमात काय जिंकणार आहेच..
पण तिनं जिंकायचं स्वप्न ज्यांना दाखवलं त्यांच्या स्वप्नांना काल सोळावं लागलं, आणि तरुण व्हायला निघालीत ती स्वप्न पुन्हा नव्यानं..
चिन्मय लेले