रेडी फॉर कॉलेज?

By Admin | Published: July 26, 2016 03:38 PM2016-07-26T15:38:42+5:302016-07-26T15:47:44+5:30

दहावी पास झाल्याचा आनंद साजरा केल्यानंतर विद्यार्थी मंडळीपुढे नवे आव्हान उभे राहते ते ‘मिशन कॉलेज अ‍ॅडमिशन

Ready for college? | रेडी फॉर कॉलेज?

रेडी फॉर कॉलेज?

googlenewsNext
>- रोहित नाईक
दहावी पास झाल्याचा आनंद साजरा केल्यानंतर विद्यार्थी मंडळीपुढे नवे आव्हान उभे राहते ते ‘मिशन कॉलेज अ‍ॅडमिशन.’ शाळेत झालेल्या फेअरवेल पार्टीमध्ये ठरवलेल्या प्रमाणे काहींनी एकत्रितपणे एकाच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतले असतील. तर काहीजण वेगळे झाले असणार. एकूणच सध्या नुकताच दहावी पास झालेले विद्यार्थी ‘शालेय विद्यार्थी’चा शिक्का पुसून ‘कॉलेजकुमार’ म्हणून मिरवण्यास सज्ज झालेत. अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी वेगवेगळ्या कॉलेजची माहिती मिळवताना सर्वांच्याच चेहºयावर वेगळेच कुतुहल पाहायला मिळत आहे.
आवडीचे कॉलेज मिळेल की नाही, आपले कॉलेज कसे असेल, तिथे भेटणारे इतर विद्यार्थी कसे असतील, आपण त्यांच्यासोबत जुळवून घेऊ शकू ना.., एकट्याने प्रवास जमेल का? अशा अनेक प्रश्नांसह सर्वात महत्त्वाचा प्रश्न भेडसावत असतो तो म्हणजे ‘संपुर्ण इंग्लिशमधून होणारा अभ्यास आपल्याला झेपेल का?’ यासाठी काहींनी दररोज इंग्लिश पेपर वाचायलाही सुरुवात केली आहे. (पण नक्की पेपर वाचतात की केवळ फोटो पाहतात हे त्यांनाच माहित!) त्याचप्रमाणे काहींनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आपली उत्सुकताही शेअर केली आहे. तसेच काही फास्ट फॉरवर्ड लोकांनी आपल्या ओळखीच्या सिनिअर्सकडून महत्त्वाचे टीप्स घेण्यास सुरुवात केली आहे. आखिर इज्जत का सवाल है बॉस.....
विशेष म्हणजे कॉलेजविश्वाच्या उंबरठ्यावर असलेली ही मंडळी सर्वात जास्त एक्सायटेड आहेत ते कपड्यांबाबत. युनिफॉर्मच्या तावडीतून सुटल्याने आता डेÑस कोड नसणार म्हणजे आपल्या पाहिजे तशी स्टाईल करुन कॉलेजला जायच, गॉगल, जीन्स, टीशर्ट, जॅकेट अशा कितीतरी फॅशनेबल वेअरची लीस्ट तयार झालीच असणार. त्यामुळेच शॉपिंगसाठीही ही मंडळी बाहेर पडली आहे.
आता काय, कॉलेजमध्ये नवीन ग्रुप, नवे फ्रेंड्स.. असे प्लानिंग जरी असले, तरी शाळेतल्या सवंगड्यांना विसरायचे नाही, असे म्हणत अनेकजण इमोशनलही होत आहेत. तर अनेकांना आपले ‘भिडू लोग’ आपल्याच कॉलेजमध्ये भेटणार असल्याने वेगळाच आनंद आहे. आधीच ग्रुपने राहणार असल्याने आपलीच ‘हवा’ कशी राहणार याचेही प्लानिंग सुरु असतील. एकूणंच संपुर्ण कॉलेज लाईफ कशी एन्जॉय करायची याचे प्लानिंग सध्या आपल्या आजूबाजूला सुरु आहेत. 
शिवाय आत, कुणी कॉमर्सला, कुणी आटर््सला तर कुणी सायन्सला जाणार.. म्हणजे दहा वर्ष एकत्र राहिलेली मंडळी कॉलेजच्या निमित्ताने वेगवेगळ्या मार्गाने पुढे जाणार... मात्र असे असले तरी शाळेत झालेल्या फेअरवेल पार्टीमध्ये सर्वांनी एकमेकांना शब्दांच्या बंधनात अडकवलेच असेल की, किमान महिन्यातून एकदा आपण या - या दिवशी आपल्या अड्ड्यावर भेटायचं.
बघुया भेटतात की नाही ते... असो. 
पण सध्या असेच फोटो आणि स्टेट्स फेसबुक आणि व्हॉट्सअपवरुन फिरत आहेत.
खरंच कॉलेजचा पहिला दिवस हा अवर्णनिय आणि कधीही न विसरता येणारा असतो... काय मंडळी, तुमचा कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? 

Web Title: Ready for college?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.