समुद्रावर स्वार व्हा!
By admin | Published: August 16, 2016 02:43 PM2016-08-16T14:43:20+5:302016-08-16T14:43:20+5:30
जग कितीही वेगाने बदलत असले तरी, सागरासंदर्भातल्या करिअरच्या पर्यायांना कोणतीही बाधा येणार नाही.
Next
style="text-align: justify;"> - कॅप्टन पुनीत मल्होत्रा
जग कितीही वेगाने बदलत असले तरी, सागरासंदर्भातल्या करिअरच्या पर्यायांना कोणतीही बाधा येणार नाही. मर्चंट नेव्हीतले करिअर सागराच्या लाटांप्रमाणे उसऴत पुढेच जात राहणार आहे. प्रशिक्षणाच्या वेळेपासूनच उत्तम कमावण्याची संधी देणाऱ्या काही थोड्याच करिअरपैकी एक म्हणजे मर्चंट नेव्ही.
लाटांवर उसळत जग पादाक्रांत करण्याची संधी यात मिळते. शिवाय समुद्र म्हणजे सततचे साहसाचे आयुष्य जगण्याजी मजाही यात अनुभवायला मिळते. मर्चंट नेव्ही म्हणजे सागरीमार्गे होणाऱ्या व्यापारी मालवाहतुकीशी संबंधित करिअर. या मालवाहतुकीचे माध्यम म्हणजे जहाज. जहाजावर विविध प्रकारची कामे करणाऱ्या माणसांची गरज असते. या सागरी व्यापाराच्या व्यवसायातल्या माणसांचा आयुष्यातला अधिकाधिक वेळ समुद्रातच जातो. यातलेच एक करिअर म्हणजे शीप मॅनेजमेंट अर्थात जहाज व्यवस्थापन.
जहाजावरच्या सर्व प्रकारच्या कामांचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया म्हणजे जहाज व्यवस्थापन. हे जहाज व्यवस्थापनाचे काम काही खासगी कंपन्याही अन्य कंपन्यांसाठी करतात. एका कंपनीकडे तर किनारपट्टीवरचा 1700 कर्मचाऱ्यांचा ताफा, समुद्रावरचे 24 हजारांचे मनुष्यबळ आणि 700 जहाजांचे व्यवस्थापनाचे काम आहे. हे मर्चंट नेव्हीतल्या करिअरमुळे तुम्हाला एक साहसी आयुष्य, परदेश प्रवास आणि नेहमीच्या पठडीतल्या नोकरीपेक्षा काही वेगऴे काम करायला मिळते. अन्य कोणत्याही नोकरी वा करिअरमध्ये ही संधी नसते. शिवाय यात तुम्हाला नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगळी तांत्रिक कौशल्ये आत्मसात करता येतात. नेतृत्वगुण अंगी बाणवता येतात. आयुष्य पुर्णत्वाने जगता येते.
जगभरात सध्याच्या घडीला साधारणपणे 50 हजार व्यापारी जहाजे आहेत, जी सर्व प्रकारच्या मालाचा व्यापार करतात. किनारपट्टीवरचे आणि सागरातले असे दोन्ही प्रकारचे करिअरचे पर्याय तुम्हाला निवडीसाठी खुले असतात. डेक इंजिनिअर किंवा इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर म्हणून तुम्हाला व्यापारी जहाजांवरील कामांची देखरेख ठेवता येते. नॅव्हीगेशनपासून इंजिन रुम मेन्टेनन्स (इंजिन असलेल्या खोलीची देखभाल-दुरुस्ती) ते केटरिंग (स्वयंपाक) पर्यंत, हॉस्पिटॅलिटी आणि अन्य जहाजावरील सेवांपर्यंत सर्व प्रकारच्या कौशल्यांना या करिअरमध्ये वाव मिळतो. शीप मॅनेजमेंटमधल्या किनारपट्टीवरच्या नोकर्यांमध्ये मेरिटाईम लॉ, जहाजांचे सर्वेक्षण किंवा भविष्यातले सागरी मनुष्यबऴ घडवण्याचे, त्यांच्या प्रशिक्षणाचे काम आदि कामांचा समावेश आहे.
आजच्या घडीला भारतात सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. बंदरांच्या विकासाचा देशाच्या विकासात मोलाचा हातभार असतो, असे अलिकडेच एका परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. दुर्दैवाने, आपल्या देशातले सागरी क्षेत्र जागतिक पातळीवर पिछाडीवर आहे. पण त्याचा विकास करण्याचे काम सरकारने प्राधान्याने हाती घेतले आहे.
या सागरी क्षेत्रात एकेकाळी पुरुषांचे वर्चस्व होते, पण आता महिलाही या क्षेत्रात मागे नाहीत. गेल्या दशकभरापासून मर्चंट नेव्हीतले करिअर मुलींनीही खुणावू लागले आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातले महिलांचे प्रमाण वाढत आहे. एका भारतीय महिलेला मर्चंट नेव्हीतल्या तिच्या कामगिरीसाठी शैार्य पदकही मिळाले आहे.लाटांवर स्वार होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मर्चंट नेव्हीतले आयुष्य आव्हानात्मक आणि खूप काही मिऴवून देणारे आहे, हे नक्की.