राईट टू पी?

By admin | Published: August 20, 2015 02:49 PM2015-08-20T14:49:05+5:302015-08-20T14:49:05+5:30

हा शब्दही जिथं पोहचत नाही, त्या भागातल्या मुलींचं काय?

Right to drink? | राईट टू पी?

राईट टू पी?

Next
>‘शिष्ट-अशिष्ट’मधे वॉशरूम एटिकेट्समधे वाचलं! त्यावरून मी माझा अनुभव लिहितेय!
मी मुंबईत होते. कार्पोरेट जॉब. तिथे हे वॉशरूम एटिकेट्स सारे पाळायचे. तिथं वाटायचं आपल्याला जमलं नाही तर हे लोक आपल्याला हसतील!
फार भीतीही वाटायची. मुळात आम्ही ‘टॉयलेट’ म्हणणार, वॉशरूम असा शब्दही तिकडे गेल्यावरच कळला!
तीन वर्षे मुंबईत जॉब करून मी जळगावात आले.
इथं नोकरी तशी चांगली होती. पगारही चांगला. आणि काही घरगुतीही अडचणींची सोय म्हणून हा पर्याय निवडला.
पण धक्का असा की, ऑफिसमधे वॉशरूमच नाही. दुपारी लंचटाइममधे इमारतीच्या कॉमन बाथरूममधे जावं लागे. तिथेही गर्दीच. त्यात तिथे काही टवाळ उभे. त्यांनी त्रास नाही दिला काही, पण ते बघायचे चेह:यांकडे!
कितीदा ऑफिस प्रशासनाला सांगितलं तर ते त्याची गंभीर दखल घ्यायचेच नाहीत.
शेवटी मी ती नोकरीच सोडली.
मला प्रश्न फक्त एवढाच पडलाय की, आपल्याकडे कार्यालयातही लोकांच्या या अत्यंत महत्त्वाच्या गरजांचा विचार का होत नाही?
विकास म्हणजे फक्त चकाचक ऑफिस आणि इंग्रजीत बोलणं एवढंच नसतं ना? राईट टू पी सारख्या चळवळीही आमच्यापासून खूप लांब आहेत.
- अनुश्री, जळगाव

Web Title: Right to drink?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.