वेगळ्या लैंगिक ओळखीसह जगणार्‍या तारुण्याची घुसमट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:30 AM2019-08-08T07:30:00+5:302019-08-08T07:30:02+5:30

वेगळी लैंगिक ओळख घेऊन जगणारे तरुण मित्रमैत्रिणी भेटले, ते सांगत होते कळकळून की आम्ही आजारी नाही, आमच्यात दोष नाही. हे नैसर्गिक आहे; पण तरीही समाज आम्हाला स्वीकारत नाही. मात्र तरीही आता त्यांनी समाजासमोर खुलेपणानं यायचं ठरवलं आहे.

A roar of youth living with a different gender identity! | वेगळ्या लैंगिक ओळखीसह जगणार्‍या तारुण्याची घुसमट!

वेगळ्या लैंगिक ओळखीसह जगणार्‍या तारुण्याची घुसमट!

Next
ठळक मुद्देत्या ओळखीसह जगताना...

- स्नेहा मोरे 

क्विअर समुदायाविषयी एका विषयावर अभ्यास सुरूच होता. त्याचदरम्यान हमसफर संस्थेच्या लिखो फेलोशिप आणि वर्कशॉपबद्दल समजलं. मी लगेचच अर्ज केला. काही दिवसांनी माझी निवड झाल्याचा ई-मेल आला. आपल्याला आता निश्चितच काहीतरी वेगळं शिकायला मिळेल असं वाटलं. ‘लिखो’चा हा उपक्र म दिल्लीत होत असल्याने दिल्ली गाठली. हॉटेलमध्ये एका रूममध्ये दोनजणी अशा पद्धतीने राहायची सोय होती. सोबत रूम पार्टनर म्हणून केरळची 22/23 वर्षाची तरु णी होती. 
देशातल्या वेगवेगळ्या राज्यातील छोटय़ा छोटय़ा गावांतून काही जण आले होते. यात 22 ते 50 वयोगटातल्या सहभागींचा यात समावेश होता. काही वेळातच सर्वाची ओळख झाली आणि गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पांमधून एक वेगळं जग भेटलं, त्या वेगळ्या जगात आणि समुदायात  प्रत्येकाची वेगळी कहाणी होती. पत्नकारितेचा कोणताच बॅकग्राउण्ड नसूनही या सर्व जणांना इथे यावंसं का वाटत असेल? लिहितं व्हावं, व्यक्त व्हावं यासाठी ही माणसं इतकी धडपड का करत असतील? असे एक ना अनेक प्रश्नांनी मनात गराडा घातला होता. उत्तर शोधण्यासाठी ही माणसं वाचायला सुरुवात केली.
25 जुलैला सकाळी सत्न सुरू झालं, आणि मग त्यादिवशी एक वेगळं जग ज्याचा केवळ वरवरच माहितीय, त्याची मुशाफिरी करायला सुरुवात झाली. यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा संघर्ष ऐकला आणि मग आपलं दुर्‍ख, ताण अगदी थेंबाएवढं आहे याची जाण पहिल्याच दिवशी झाली. प्रत्येकाने कार्यशाळेकडून काय अपेक्षित असल्याचं विचारलं. मग प्रत्येकाच्या उत्तरात एक समान धागा होता तो असा की, प्रत्येकाला आपलं जगणं समोर मांडायचं होतं, आपल्यासारख्या इतरांना नव्याने जगण्याची उमेद द्यायची होती. प्रत्येकाच्या डोळ्यांत समाजाच्या विरोधातला रोष दिसत होता, यातील बर्‍याच जणांना आपल्या कुटुंबीयांनी नाकारलं होतं, त्यामुळे मग ‘त्यांच्या’ भावविश्वाशी कनेक्ट होणार्‍या जगाचा होत सगळेजण या व्यासपीठांतर्गत एकत्न आले
अजूनही काही लोकांना वाटतं, की गे-लेस्बियन लोक देशात असतीलच कितीसे? पाच? दहा? वीस? चाळीस? नाही. भारतीय लोकसंख्येपैकी 13 टक्के लोक ‘एलजीबीटीक्यू’मध्ये येतात, असं युनायटेड नेशन्सच्या सव्र्हेमध्ये दिसून आलंय. नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका बातमीनुसार भारतात जवळ जवळ 30 ते 40 लाख गे आणि बायसेक्शुअल पुरुष आहेत. ही एखाद-दुसर्‍या माणसाची गोष्ट नाही. भीतीच्या अंधारात घाबरून लपलेल्या लाखोंची गोष्ट आहे.  तरी लोकांमध्ये याबद्दल प्रचंड अज्ञान आहे. 
एलबीजीटीक्यू (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर) पौगंडावस्थेत समलैंगिकत्वाची जाणीव झाल्यावर निर्माण होणारे प्रश्न, समाजाने नाकारल्यावर होणारी असुरक्षिततेची जाणीव, घरातून स्वीकार न होणं, उतारवयातील जोडप्यांची व्यथा, समलैंगिकत्व स्वीकारल्यानंतरदेखील आडव्या येणार्‍या सामाजिक भेदाभेदाच्या भिंती, मुलं दत्तक घेण्यातल्या अडचणी, जनसामान्यांकडून काही शब्दांना आणि पयार्याने त्यामागच्या भावनांना थेट वाळीतच टाकले जाते. समलैंगिकता या शब्दाबद्दल काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे. कायद्याने नाकारलेल्या या समुदायावर चर्चा होताना अनेकवेळा केवळ त्यातील लैंगिकतेवरच भर दिला जातो. पण लैंगिकतेच्या पलीकडे जात या समुदायाच्या भावभावनांवर फारशी चर्चा होत नाही. एलजीबीटीक्यू समुदायातील नागरिकांना देण्यात आलेलं स्वातंत्र्याचं आश्वासन केवळ प्रतीकात्मक समावेशकतेसारखं असणं योग्य नाही, हे आपण समजून घ्यायला हवं.


****
..आणि घरच्यांनी मनोरुग्णालयात दाखल केले

अवघ्या 22-23  वर्षाची केरळची तरुणी. फायनान्स सेक्टरमध्ये चांगल्या पदावर काम करतेय. परंतु, पौगंडावस्थेत असतानाच तिला ‘लेस्बियन’ असल्याची वेगळी ओळख गवसली, अन् तिथून स्वतर्‍शी झगडा सुरू झाला. आपण वेगळे आहोत, सर्वसामान्य नाही. काहीतरी, कुठेतरी चुकतंय मात्न दोष द्यायचा कुणाला अशा असंख्य प्रश्नांनी मला छळलं. तणावाची खोली रात्नंदिवस वाढत होती; पण मग अचानक एक दिवस क्विअर समुदायाच्या एका कार्यक्रमाला गेले. तिथून एक नवं जग खुणावत होतं, ते शोधायला सुरुवात केली. पण जसजसं माझं वावरणं बदललं तसंतसं समाजाने झिडकारणं वाढलं. यातच कुटुंबाकडून रोष पत्करावा लागला. एकेदिवशी याच रोषाने आई-बाबांनी थेट मला मनोरु ग्णालयात दाखल केले. तिथल्या डॉक्टरांनीही ‘आजार झालाय, काही दिवसांत औषधांनी ती ‘नॉर्मल’ होईल’, असं सांगितलं. पण माझा डॉक्टरांवर विश्वास नव्हता ना कुटुंबावर होता. त्यामुळे समुदायाविषयी अधिकाधिक वाचणं, समजून घेणं, स्वतर्‍च्या भावविश्वाशी कनेक्ट होणं हाच प्रपंच सुरू होता. अन अखेर स्वतर्‍ला गवसले. मग घर-दारं सोडलं आता माझ्या वेगळ्या जगासाठी काहीतरी करायचं, खूप सोसलेलं शब्दात उतरवायचं. जेणेकरून माझा संघर्ष इतरांच्या ‘कमिंग आउट’साठी प्रेरणा देणारा ठरायला हवा.


..घरच्यांनी स्वीकारलं; पण समाजाने नाकारलं

मध्य प्रदेशच्या जबलपूरचा बाविशीतला तरुण. ऐन तारुण्याच्या उंबरठय़ावर त्याला उभयलिंगी असल्याची जाणीव झाली आणि  मग स्वतर्‍शीच संघर्ष सुरू झाला. घरी कसं सांगायचं? कॉलेजला जायचं की नाही? स्वतर्‍ला आरशात पाहायच की नाही? ..इतक्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून स्वतर्‍ला स्वीकारण्यासाठी झगडावं लागलं.  या टप्प्यावर नैराश्य आलं आणि नैराश्यातून व्यक्त होण्याचं धाडसं मग हळूहळू व्यक्त होत गेलो मग कुटुंबानेही समजून घेतलं. स्वीकारलं. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आईबाबांनी मदत केली. माझ्या कवितेचं एक पुस्तक आलं आहे. मग समुदायाविषयी खूप लिखाण - वाचन सुरू केलं, माणसांना भेटायला सुरुवात केली आणि त्यातून आपणही सामान्यच असल्याचं उमगत गेलो. कुटुंबाने स्वीकारल्याचा वेगळा आनंद आहे. कारण माझ्या समुदायातील अनेकांचा संघर्ष माझ्याहून खूप वेदनादायी असल्याची पूर्ण जाणीव आहे. पण समाज अजूनही आम्हाला झिडकारतोय याची सल कायम आहे. लिखाणाच्या माध्यमातून स्वतर्‍ला अभिव्यक्त करण्याला दिशा मिळाली आणि त्या निमित्ताने झिडकारलेल्या समाजाच्या परिघातच माझ्यासारखंच नवं कुटुंब भेटलं याचं समाधान आहे. गेल्या वर्षी 377 कलम रद्द झालं; पण ते बर्‍याच अंशी कागदावर राहील, मुख्य प्रवाहात आम्ही येण्यासाठी अजून बराच संघर्ष बाकीय, शेवटपर्यंत आमचा लढा सुरू राहील. 

Web Title: A roar of youth living with a different gender identity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.