रोमची पहिली महिला महापौर
By Admin | Published: June 23, 2016 05:32 PM2016-06-23T17:32:25+5:302016-06-23T17:32:25+5:30
इटलीची राजधानी रोममध्ये मागच्या रविवारी एक इतिहास घडला. इतिहास घडवला तो व्हर्जिनिया राज्जी या ३८ वर्षीय महिलेनं. राजकारणात ३८ म्हणजे अगदी तरुण वय
>- माधुरी पेठकर
इटलीची राजधानी रोममध्ये मागच्या रविवारी एक इतिहास घडला. इतिहास घडवला तो व्हर्जिनिया राज्जी या ३८ वर्षीय महिलेनं. राजकारणात ३८ म्हणजे अगदी तरुण वय. तर या तरूणीनं रविवारी रोम शहराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
रोमच्या २८०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उमेदवार महापौर झाली आहे. वकील असलेल्या व्हर्जिनियासाठी हा विजय म्हणजे एका नव्या युगाची सुरूवात आहे. स्त्री-पुरूष समानता हा विषय बोलायला कितीही चांगला असू देत पण रोम सारख्या युरोपिअन देशातल्या शहरातसुद्धा बाईचा पुरूषांच्या बरोबरीनं राजकारणात प्रवेश हे कालपर्यंत कल्पनेतलं स्वप्नचं होतं, ते व्हर्जिनियाच्या रूपानं साकार झालं आहे. व्हर्जिनियाच्या मते बदलाला सुरूवात झाली आहे. हा बदल खोलपर्यंत नक्कीच झिरपेल असा तिला विश्वासही आहे.
अँटी एस्टाब्लिशमेंट पार्टी म्हणून ओळखल्या जाणाºया फाइव्ह स्टार मुव्हमेंट जिला ट5र या नावानंही ओळखलं जातं त्या पार्टीची व्हर्जिनियाा सदस्य होती. २०११ मध्ये अँन्ड्रिआ सेव्हरिनी या रेडिओ डायरेक्टर असलेल्या आपल्या नवºयाच्या निमित्तानं तिची या पक्षाक्षी ओळख झाली. तिचा नवरा या पक्षाचा खंदा समर्थक. नंतर ती स्वत: या पक्षाची सदस्यही झाली. आणि पक्षानं महापौरपदाची उमेदवार म्हणून तिलाच उभं केलं.
दृढ, निश्चयी आणि तपशीलाबाबत अत्यंत आग्रही असलेल्या व्हर्जिनियानं प्रतिस्पर्धी पक्षाच्या तुलनेत तब्बल ६७.२ मते घेतली. सध्याच्या रोमबद्दल विचार केला तर तिला चांगलं वाटत नाही. रोम कधीही ठरवून केलेल्या आणि संघटित गुन्ह्यांसाठी प्रसिध्द नव्हतं. पण गेल्या दोन तीन वर्षांपासून रोमचा सुसंस्कृत चेहेºयाला गुन्हेगारीचा, भ्रष्टाचाराचा लागलेला डाग इतर लागला आहे. त्याचा व्हर्जिनियालाही छळतो आहे. आणि आपल्या महापौरपदाच्या काळात रोमला लागलेला हाच डाग तिला पुसायचा आहे.
महापौर म्हणून आपल्या उमेदवारीचा प्रचार करताना तिच्या तोंडी फक्त एकच वाक्य होतं. ‘ हे रोम मला राहण्यासाठी आणि जगण्यासाठी योग्य शहर बनवायचं आहे.’
रोममधली स्वच्छता टिकून राहण्यासाठी घरापासून शहरापर्यंतच्या स्वच्छतेचा तिला विचार करायचा आहे. कचºयाचं व्यवस्थापन ते वाहतुकीचा प्रश्न अशा सर्वच प्रश्नांशी तिला दोन हात करायचे आहे. ट्राफिक हा रोममधला गंभीर होत गेलेला प्रश्न तो सोडवताना तिच्या डोळ्यासमोर जास्तीत जास्त रस्त्यांवर सायकल लेन बनवण्याचं उद्दिष्ट आहे. आणि या सर्वांसोबतच व्हर्जिनियाला शहरात प्रत्येक क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचारही निपटून काढायचा आहे.
टीकाकारांच्या, विरोधकांच्या मते व्हर्जिनियाकडे राजकारणातला अनुभव खूपच कमी आहे. पण या टीकेकडे लक्ष न देता तिनं रोम शहराची महापौर म्हणून काम करण्याचं आव्हान स्वीकारालं आहे.