रूंजी..! बिनधास्त उत्सफूर्त मनमौजी!

By admin | Published: October 9, 2014 06:13 PM2014-10-09T18:13:04+5:302014-10-09T18:13:04+5:30

सायंकाळची वेळ होती. ढग कधीही बरसतील इतक्या घाईवर आले होते अन् नेमका सिग्नल लागला. तितक्यात जाईच्या फुलांचा सुगंध दरवळला अन थोडसे वळून पाहिले तर एक मुलगा गजरे घेऊन सिग्नलवर धावत येत होता

Ruangi ..! Unconscious minded! | रूंजी..! बिनधास्त उत्सफूर्त मनमौजी!

रूंजी..! बिनधास्त उत्सफूर्त मनमौजी!

Next

 

 
सायंकाळची वेळ होती. ढग कधीही बरसतील इतक्या घाईवर आले होते अन् नेमका सिग्नल लागला. तितक्यात जाईच्या फुलांचा सुगंध दरवळला अन थोडसे वळून पाहिले तर एक मुलगा गजरे घेऊन सिग्नलवर धावत येत होता. क्षणात त्याने एका कारवाल्याच्या काचेवर  टकटक केले. गजरे विकले आणि कारवाल्यावर मुलगा खूष झाला आणि त्याला ‘फ्लाईंग किस’ दिले आणि पुन्हा धूम ठोकली. सिग्नल ही सुटला. आम्ही ही कॉलेजचा रस्ता धरला, पण कितीतरी वेळ तो मुलगा, त्याचे गजरे, त्याची उत्स्फुर्त दाद आणि जाईची फुले मनावर रूंजी घालत राहिले..!!
त्याच्या पाठोपाठच एक विचार आला की कधीकधी काहीही संबंध नसताना काही व्यक्ती, काही प्रसंग आणि काही विचार का सतत मनावर रूंजी घालत असतात? ते आपल्या मनाला भिडतात म्हणूनच ना!! आयुष्यात मग कधी कधी या रूंजीच्या भोवतीच विचारांची रूंजी सुरू होते आणि त्या कदाचित अपरिचित असणार्‍या विचारांशी ही  एक कथा जुळते.
खरतर इथे प्रत्येकाची एक कथा असते, आयुष्यात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी, विचाराशी, कधीकधी अप्रत्यक्षरित्या भेटणार्‍या प्रत्येकाशी..बिनधास्त, बेफिकिर,आत्मविश्‍वासू, मनमिळाऊ, लोभस, उत्कट व उत्स्फुर्त, आश्‍वासक,मार्गदर्शक, स्वच्छंदी अन सगळ्यांपेक्षा  हटके असणार्‍या व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि आयुष्याचा नकळत भाग होतात.. त्यांचे सोबत असणं आयुष्याला निरनिराळे आयाम आणि उभारी देत राहतात. त्यांच्याशी एक वेगळीच केमिस्ट्री जुळते.कथा जुळते..कधी ही कथा दोन ओळींची असते तर कधी दीर्घकथा होते.  या सगळ्याची रूंजी मनावर कायम राहते..इतकच खरं!!
कॉलेजचे मस्तमौला दिवस तर अशाच काही हटके असणार्‍या व्यक्तींमुळे परिपुर्ण होतात..रूंजी घालणारं कोणीतरी भेटतं आणि कॉलेजचे दिवस आहाहा ..काय बोलणार नुसती धमाल होऊन जातात. कॉलेजमधील लेर्सच्या मधल्या वेळातील गोंधळ, भटकंती, पिकनिक,  सिनेमा टाकणे या सगळ्यांना सोबत लागते ती अशाच कार्टुन मित्र मैत्रिणीची. भंकसपणा करायला जर कोणी भेटलचं नाहीतर कॉलेजच्या दिवसांमध्ये जानच येत नाही..पण फक्त बिनधास्तपणा आणि धिंगाणाच नाही तर काही उत्कट क्षणांना, हळुवार अनुभवांना आणि दुसर्‍यांवर आनंद लुटवून देताना ही अशाच चांगल्या माणसांची गरज लागते. कोण कुठून कुठून आलेले असतात..कॉलेजच्या छोट्याश्या जगात भेटतात..मैत्री होते आणि आठवणींचा पट निर्माण होतो. पण कॉलेजचे दिवस पाखरू होऊन भूर्रकन उडतात आणि रूंजीच्या आठवणी मनात सतत रूंजी घालत राहतात. 
प्रत्येकाच्या आयुष्यात-मनात रूंजी घालणारी अशी एक व्यक्ती असतेच. उत्स्फुर्त, बेधडक, बिनधास्त, मस्तमौल व्यक्तीची रूंजी.!! काही वेळा त्यांची साथ आयुष्यभर लाभते तर काहीजण या प्रवाहात निसटून जातात पण आठवणी कधीच कोमेजत  नाहीत. माझ्य एका मित्राचे पत्रव्यवहारातून असचं एक नातं उलगडलं होतं. वर्तमानपत्रातील एक पत्र छापून आले होते. त्यावरच्या पत्त्यावर मित्रानेही तिला एक पत्र पाठविले. पत्रातून मैत्री आणि मैत्रीतून प्रेमाच्या जाणीवा फुलल्या. प्रत्यक्षातील भेट अजून बाकी होती. तो तिला भेटायलाही गेला. मनाचे गुज एकमेकांकडे उलगडले. पण मित्राच्या मनावर रूंजी घालणारी ती मात्र आयुष्यात लाभली नाही. त्यांचा शेवट गोड नाही होऊ शकला खरा पण ती न लाभताही आयुष्यातून कुठे गायब झाली. बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावाची आणि स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मनाने जगणारी ती मैत्रीण त्याच्या आठवणींत कायमचे घर करून गेली. 
आजही तिच्याविषयी बोलताना तो हळूवार होतो आणि तिच्या आठवणीने त्याच्या चेहर्‍यावर आजही आनंद विलसते.! आणखी एक प्रसंग तो म्हणजे ऑफिसमध्ये आनंद अन चेैतन्य पसरविणार्‍या मैत्रिणीचा. कायम हसतमुखाने वावरणार्‍या या अनोख्या मैत्रिणीमुळे ऑफिसमध्ये कधीही कोणालाही कामाचा ताण जाणवायचा नाही. हुशार तर ती होतीच पण सगळ्यांच्या मदतीला आणि अडचणीला ही तयारच..आजारपणामुळे तिने ८ दिवस बुट्टी मारली तर ऑफिसचे वातावरणच आजारी झाले होते..ती जेव्हा पुन्हा हसतमुखाने परतली तेव्हा सगळ्यांनी आनंदाने तिचा पुष्पगुच्छ देऊन चक्क स्वागतच केले. तर ती एकदम भारावून गेली अन तिने सहकार्‍यांना मस्त मिठी मारली. 
तर अशा या आठवणींच्या रूंजी.  अन रूंजीच्या आठवणी. मनात घर केलं की जायचं नावच घेत नाही. कितीतरी आठवणी आणि व्यक्तींनी आपलं आयुष्य फुलून जात असतं ते केवळ निरनिराळ्या रूंजीमुळे..त्याच जोरावर तर सगळे दु:खाचे कड मागे ढकलले जातात अन संघर्षाची पाने आनंदाने पलटवता येतात. आपल्या आयुष्याच्या छोट्या छोट्या भागांतून त्या डोकावत राहतात आणि जगणं भानावर ठेवून बेभान करतात..!
- हिना कौसर-खान
 
 
अशीच एक रूंजी..जीवन नव्याने जगायला शिकवणारी रूंजी..ती बिनधास्त आहे, मजेशीर आहे अन त्याच वेळी  खूप मोठय़ा मनाची अन सुहृदयी देखील..तिच्या आयुष्यातील कोणाच्याही दु:खाने ती दु:खी होते अन एखाद्याच्या कठीण प्रसंगी ती जीव द्यायलाही तत्पर..प्रचंड उर्जा असलेली रूंजी.आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्या आनंदासह व प्रसन्नपणे  पाहायचे असेल तर या रूंजीला भेटायलाच हवं. स्टार प्रवाहवर १३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता..!!

Web Title: Ruangi ..! Unconscious minded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.