पळा बिंधास्त अनवाणी

By Admin | Published: August 6, 2015 05:26 PM2015-08-06T17:26:11+5:302015-08-06T17:26:11+5:30

पायात बूटही न घालता पळणा:या मिलिंद सोमणसारख्या मस्तमौला माणसाचं म्हणणं तरी नेमकं काय आहे?

Run barefoot barefoot | पळा बिंधास्त अनवाणी

पळा बिंधास्त अनवाणी

googlenewsNext
>मॉडर्न जगानंही यू टर्न मारला आहे. 
महागडे, ब्रॅण्डेड शूज कशाला, 
पळू की अनवाणीच म्हणत हे जग पळत सुटलंय!
त्या पळत्या ट्रेण्डचं नाव आहे
बेअरफूट रनिंग!
पायातले बूट टाकून अनवाणीच
धावणं बरं असं
सांगणारा हा नवा ट्रेण्ड नक्की आहे काय?
 
वयाच्या पन्नासाव्या वर्षी तेजतर्रार तरुण आणि प्रचंड हॅण्डसम दिसणा:या ‘आयर्नमॅन’
मिलिंद सोमणला पाहिलंय?
- पाहतच राहावंसं वाटतं हे खरंय!!
पण त्याच्या चेह:याकडे आणि बॉडीकडेच तोंडाचा ‘आ’ करून पाहत बसू नका, जरा त्याच्या पायाकडे पाहा..
एवढा फेमस सुपरमॉडेल पैसे नसतील त्याच्याकडे महागडय़ातले महागडे स्पोर्ट्स शूज घ्यायला?
मग तो असा अनवाणी का पळतो?
त्याचे कुठलेही फोटो पाहा, सकाळी व्यायाम करत पळतानाचे किंवा मॅरेथॉनचेही, तो कायम अनवाणीच दिसतो!
म्हणजे ‘बेअरफूट’!
- असं का?
हाच तर नवीन ट्रेण्ड आहे आणि मिलिंद सोमणसारखे अनेकजण हे त्यातले ट्रेण्डसेटर आहेत.
जगभरातच सध्या ‘पळणा:या’ हौशी माणसांमधे एक नवीन ट्रेण्ड रुजतो आहे, त्याचं नाव आहे,
बेअरफूट रनिंग अर्थात अनवाणी पळणं!
पायात स्पोर्ट शूज किंवा रनिंगसाठीच वापरतात असे महागडे बूट घालून किंवा चालण्यासाठीही वॉकिंग शूज घालण्याची पद्धत आहेच. अनवाणीच पळण्याची सवय असलेले आपले भारतीय अॅथलिट कोणो एकेकाळी ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धात कसे मागे पडत याच्या असंख्य कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत. आणि आता मात्र काळाची चक्र उलटी फिरावीत तसा हा ट्रेण्ड काहीतरी वेगळंच म्हणतोय, अनवाणीच पळा असा हा नवीन नारा कानावर पडतोय!
आपल्याकडेच नाही तर जगभर सध्या ‘बेअरफूट रनिंग’ या विषयाची चर्चा आहे. टोकाची मतं आहेत, वाद आहेत.
मात्र तरीही अनवाणीच चाललं-पळालं पाहिजे असं सांगणारे आता ऑलिम्पिकमधेही अनवाणी पळायची मागणी लावून धरत बेअरफूट मॅरेथॉनही भरवू लागले आहेत.
बेअरफूट रनिंगचा
हा आग्रह नक्की आहे काय?
यामागचं लॉजिक सिंपल आहे.
अनवाणी म्हणजेच पायात बूट न घालता चालणं, हेच नैसर्गिक आहे. अजूनतरी कुणी पायात बूट घालून जन्माला येत नाही. पायात चपला-बूट घालणं ही माणसानं स्वत:साठी निर्माण केलेली एक सोय आहे. ते घातल्यानं पायाला दगडगोटे-काटेकुटे टोचत नाही हे खरं, पण ते घातले नाही म्हणून पायाला काही इजा तर होत नाही.
त्यामुळे पळतानाही बूट घातलेच पाहिजेत असा आग्रह नाही. उलट बूट न घालता पळालं तर मेंदू आणि पाय यांचं संदेशवहन जास्त चांगलं होतं आणि जास्त चांगलं पळता येतं. पळण्याचा आनंदही जास्त मिळतो.
त्यामुळे बरेच रनर्स आता अनवाणीच पळत सुटताहेत.
आणि जगभरात हा ट्रेण्ड वाढीस लागतो आहे,
जो म्हणतोय.
पळा अनवाणी!
पळायचं ट्रेनिंग घ्यायची गरज नाही, पळायला पैसे लागत नाहीत, महागडे बूटही नकोत, फक्त इच्छा पाहिजे पळायची, खरंतर भरपूर पळायची!!
 
नंगे पैर सोमण
हा ट्रेण्ड भारतात वाढत असताना त्याचा खरा म्होरक्या म्हणायला हवा मिलिंद सोमण. तो नेहमीच अनवाणी पळतो. बेअरफूट रनर्सची हिंमत त्याला पाहून वाढतेच, पण तो तसा पळतो म्हणून आपणही ट्राय करावा असं म्हणणा:यांची संख्याही वाढू लागली आहे.
मिलिंद सोमण म्हणतो, ‘‘मला वाटतं अनवाणी पळणं हाच पळण्याचा सगळ्यात नैसर्गिक प्रकार म्हणायला हवा. मला त्यातलं सायन्स कळत नाही. पण एक नक्की, तुम्ही पळता तेव्हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जाही एकत्रित येते. ही एक प्रकारची ध्यानधारणाच असते. सगळी एनर्जी एकत्र येते आणि एकाच क्रियेवर केंद्रित होते. संपूर्ण शरीराच्या तुलनेत आपल्या हातात, पायात आणि चेह:यात सर्वाधिक नसा असतात. कुठलीही क्रिया करताना कसा प्रतिसाद द्यायचा याचे सिगAल या नसा मेंदूला  पाठवतात. आपण बोटानं टचस्क्रीन फोनला स्पर्श केला की पुढं काय करायचं हे मेंदू सांगतो. त्यालाही ते स्पर्शज्ञान चटकन होतं. पण हातात ग्लोव्हज घालून जर आपण हे काम केलं तर मेंदूला चटकन कळत नाही की आपण नक्की कशाला स्पर्श करतो आहोत.
तेच पायांचंही होतं. आपण बूट घालतो, चपला घालतो तेव्हा मेंदूला हे चटकन कळत नाही की आपल्या पायाखाली नक्की कशी जमीन आहे, कसा पृष्टभाग आहे. त्यामुळे पायांना मिळणा:या आदेशाचं गणितही चुकतंच.
मी म्हणत नाही की बूट घालून पळणं चूकच, पण अनवाणी पळणं हे जास्त चांगलं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे शरीराचा बॅलन्स, को-ऑर्डिनेशन, पावलातला जोर, वेग या सा:याची काळजी मेंदूच घेतो.  आपल्या शरीराला स्वत:ची अशी काळजी घेण्याची सवय आपण लावायला हवी!’’
मिलिंद सोमणने तर नुकत्याच जिंकलेल्या ट्रायथलॉनमधेही त्या स्पर्धेच्या आयोजकांना विनंती केली होती की मला बेअरफूट पळू द्या. 
***
मुद्दा काय, मॉडर्न जगानंही यू टर्न मारला आहे. महागडे, ब्रॅण्डेड शूज कशाला, पळू की अनवाणीच म्हणत हे जग पळत सुटलंय!
अनवाणी चाला. अनवाणीच बिंधास्त पळा म्हणतंय!!

Web Title: Run barefoot barefoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.