साशा ओबामा आणि आपण!
By admin | Published: August 18, 2016 03:54 PM2016-08-18T15:54:48+5:302016-08-18T15:54:48+5:30
मुक्काम अमेरिका. मार्थाज् विनयार्ड येथील प्रसिद्ध ‘नॅन्सीज्’ रेस्ट्रा.. तिथे निळी टोपी घातलेली एक तरुण मुलगी आॅर्डर घेतेय.. कॅश काउंटर सांभाळतेय.. आलेल्या लोकांशी बोलतेय... आणि सगळे आश्चर्याने थक्क होऊन पाहाताहेत!
मुक्काम अमेरिका. मार्थाज् विनयार्ड येथील प्रसिद्ध ‘नॅन्सीज्’ रेस्ट्रा.. तिथे निळी टोपी घातलेली एक तरुण मुलगी आॅर्डर घेतेय.. कॅश काउंटर सांभाळतेय.. आलेल्या लोकांशी बोलतेय... आणि सगळे आश्चर्याने थक्क होऊन पाहाताहेत!
- आता यात कसलं एवढं आश्चर्य? अमेरिकेत असे समर जॉब्ज करतातच की मुलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करून पैसे कमावतात. त्यातून आपलं शिक्षण चालू ठेवतात. य निळ्या टोपीवाल्या मुलीत काय असं वेगळं असावं की ‘ती’ समर जॉब करतेय याच्या बातम्या जगभरातल्या माध्यमांनी छापाव्यात?
- एक साधी गोष्ट!
या मुलीचं नाव. साशा ओबामा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची धाकटी मुलगी!
इतर अमेरिकन मुलामुलींप्रमाणेच तिनेही यंदाच्या सुट्टीत समर जॉब सुरू केला आहे. बघा शेजारच्या फोटोत. वाटतंय का, कामात गढलेली ही मुलगी चक्क ओबामांची मुलगी आहे!
पण हो. ती या जगातल्या सर्वात शक्तीमान व्यक्तीची मुलगी आहे आणि समर जॉब करतेय!
शिकताशिकता बाहेरच्या जगाचा अनुभव यावा याकरता करायचे समर जॉब्ज ही पश्चिमी संस्कृती. उन्हाळ्याच्या सुट्यांत घरीच वेळ दडवण्यापेक्षा अमेरिका आणि युरोपमध्ये कित्येक विद्यार्थी हॉटेल, रिसॉर्ट्स, टेकअवे सेंटर्स अशा अनेक ठिकाणी डिलिव्हरी बॉय/गर्ल म्हणून काम करतात. कॅश काउंटर्स सांभाळतात. इंटर्नशीप म्हणा किंवा समर जॉब, दोन पैसे मिळवण्या बरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असते आणि या अनुभवाचा हिशेब या मुलांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेतसुध्दा केला जातो.
अर्थात ‘समर जॉब’ असलं स्पेशल नावबिव नसलं तरी ‘कमवा आणि शिका’ ही योजना आपल्याकडेही रुजवली ती भाऊराव पाटील यांच्यासारख्या कर्मवीरांनी! आपल्याकडेही मुलांनी कमवून आपल्या शिक्षणाला, कुटुंबाला हातभार लावला... पण हे झालं / होतं ते प्रामुख्याने गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये. बहुदा नाईलाज म्हणून!
- पण आता आपल्याकडेही शिकताशिकता कमवायला, जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडण्याची संस्कृती रुजते आहे. अपरिहार्यतेशी झुंजणार्या तरुणांबरोबरच सुखवस्तू कुटुंबातील ‘लाडले’ही घाम गाळू लागले आहेत.
भेटा अशाच दोन मित्रांना...