म्हणावं, मला फोन करा!
By admin | Published: September 3, 2015 08:35 PM2015-09-03T20:35:23+5:302015-09-03T20:35:23+5:30
अगदी साधी गोष्ट असते. ऑफिसमधे एखाद्या सहका:याला आपण फोन करतो. तो जागेवर नसतो, विशेषत: वरिष्ठ सहकारी. मग आपण सांगतो एखाद्या सहका:याला
Next
>- मृण्मयी सावंत
अगदी साधी गोष्ट असते. ऑफिसमधे एखाद्या सहका:याला आपण फोन करतो. तो जागेवर नसतो, विशेषत: वरिष्ठ सहकारी. मग आपण सांगतो एखाद्या सहका:याला की, सरांना/ मॅडमना फोन करायला सांग.
तोही हुशार किंवा कारस्थानी. तो साहेबाला जाऊन सांगतो की, तमक्याचा फोन होता, तुम्हाला फोन करायला सांगितला आहे.
तो साहेब चांगला असेल तर काही बोलत नाही. पण त्याला वाटतंच की, हा कोण आपल्याला आदेश सोडणारा! पॉलिटिक्स करू पाहणारा सहकारी त्याचाच आधार घेतो आणि खुशाल सांगतो की, तुम्हाला फोन करा म्हणालेत, मी चारपाचदा केला, ते भेटतच नाहीत. त्यांना अमुक काम आहे असं सांग!
घोळ याच टप्प्यावर होतो.
आणि मग त्यातून निर्माण होणा:या गैरसमजांचा आपल्याला सामना करावा लागतो.
त्यापेक्षा ही परिस्थिती वेगळ्या रीतीनं हाताळून पहा!
1) फोन करून साहेब भेटले नाहीत तर त्यांना एसएमएस करा. तुम्हाला उलटा फोन करायला सांगू नका.
2) त्यापेक्षा सहका:याकडे निरोप ठेवा की, मी पुन्हा फोन करीन!
3) यापेक्षा दुसरा काहीही निरोप, काहीही चर्चा करू नका.
4) मला पुन्हा फोन करायला जमणार नाही, असं तर मुळीच सांगू नका.
5) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी तुमच्याकडे जर असा निरोप ठेवला तर त्याचा उपयोग राजकारण करण्यासाठी करू नका.