समुद्र सफाईला निघालेला स्लॅट

By Admin | Published: May 12, 2016 03:01 PM2016-05-12T15:01:08+5:302016-05-12T15:01:08+5:30

जगभरातले समुद्र प्लॅस्टिकने प्रदूषित होत आहेत, त्यावर उपाय म्हणून एका वीस वर्षाच्या तरुणानं ठरवलं की हे सगळे समुद्रच स्वच्छ करून टाकू.

Sea slat | समुद्र सफाईला निघालेला स्लॅट

समुद्र सफाईला निघालेला स्लॅट

googlenewsNext
>प्लॅस्टिकच्या बॅगा, चपला, अगदी निरुपयोगी झालेल्या वस्तू यासा:याचं आपण काय करतो? कधी उकिरडय़ावर, कधी कच:याच्या ठिकाणी, तर ब:याचवेळा रस्त्यावर फेकतो.  जे नष्ट होण्यासारखे असतं,  ते संपतं. पण प्लॅस्टिकचं काय? पाऊस पडला की वाहत-वाहत ते ओढय़ा-नाल्यातून नदीत आणि पुढे समुद्रात पोहचतं. आणि जिथं गावातला ओढा साफ करणं कठीण तिथं समुद्र कोण स्वच्छ करायला जाणार?
पण आपण समुद्रच स्वच्छ करायला पाहिजे असं एका तरुणाला वाटलं आणि त्यानं अशक्य वाटणारं हे काम हाती घेतलं.   
बोयान स्लॅट, वय वर्षे 21. जगभरातील समुद्रात पसरलेल्या प्लॅस्टिक सफाई मोहिमेचा म्हणजेच ‘ओशियन क्लीनअप’चा संस्थापक आणि सीईओ. नेदरलँडमधील डेफ्ट शहरात तो राहतो. स्लॅटनं ध्यासच घेतलाय अशक्य वाटणा:या समुद्र सफाईचा. 2क्11मधील समरमध्ये तो ग्रीसला जात होता. त्यावेळी त्याचं वय अवघं 16 वर्षे होतं. त्याला समुद्रात मासे कमी आणि प्लॅस्टिकच्या बॅगाच जास्त दिसल्या. त्यालाही इतरांसारखी हळहळ वाटली. पण हळहळ व्यक्त करून तो थांबला नाही. समुद्रातलं हे प्लॅस्टिक बाहेर कसं काढायचं या विचारानं त्याला झपाटलं. मग त्याला कळलं की, 4क्-45 वर्षापासून असं लाखो टन प्लॅस्टिक समुद्रात ओतलं जात आहे. सध्या जगभरात वर्षाला तब्बल 28क् दशलक्ष टन प्लॅस्टिक निर्माण केलं जातं, त्यातील 1क् टक्के प्लॅस्टिकचा शेवट हा समुद्रात होतो. आणि 8क् टक्के प्लॅस्टिक रस्ता, नाले, नदीच्या माध्यमातून समुद्रातच येतं आणि लाखो चौरस कि.मी. परिसरात वाहत राहतं. त्यामुळेच ते समुद्रातून बाहेर काढणं अवघड असतं. हे अवघड काम आपण करायचं असं स्लॅटनं ठरवलं.
खरंतर स्लॅटला वयाच्या 13व्या वर्षीच क्षेपणास्त्र निर्मितीने झपाटले. याच वयात त्यानं पाण्यातलं क्षेपणास्त्र तयार करून गिनीज रेकॉर्ड  बनविले. डेफ्ट विद्यापीठात एरोस्पेस इंजिनिअरिंग करीत असताना फेब्रुवारी 2क्13 मध्ये ‘ओशियन क्लीनअप’ मोहीम जन्माला घातली. सहा महिन्यांनंतर स्लॅटने विद्यापीठातील शिक्षण थांबवून या मोहिमेसाठी स्वत:ला वाहून घेतलं. आणि हे करायला पॉकेटमनीतून वाचविलेले 2क्क् युरो त्याच्याकडे होते. ते काहीच महिने पुरले. या कामासाठी प्रायोजक मिळविण्याचा त्यानं प्रयत्न केला. एकाच दिवशी तब्बल 3क्क् कंपन्यांशी संपर्क साधला. केवळ एकाने प्रतिसाद दिला. पण तरी स्लॅटने हिंमत हारली नाही. 
आणि मग उजाडला 26 मार्च 2क्13. 
 ‘ओशियन क्लीनअप’च्या वेबसाइटवर अचानक प्रतिसाद वाढला. मदतीसाठी दिवसभरात दीड हजारावर मेल आले. केवळ 15 दिवसांत तब्बल 8क् हजार डॉलर्सचा निधी जमला. या मोहिमेसाठी स्लॅटने 19  ते 24 वयोगटातले जगभरातील 1क्क् स्वयंसेवक एकत्र केले. 7क् अभियंते-संशोधकांच्या मदतीतून स्लॅटने 53क् पानांचा अहवाल तयार केला. समुद्रात 1क्क् कि.मी.र्पयत वाहते बॅरिअर्स  टाकायचे. ते प्लॅस्टिकला स्वत:कडे खेचून घेतील. या बॅरिअर्समध्ये एका विशिष्ट ठिकाणी ते जमा होईल. नंतर हे प्लॅस्टिक किना:याला आणून टाकले जाईल. यात समुद्री जिवांना कुठलाही धोका असणार नाही. नेदरलँडमध्ये नोव्हेंबरच्या दुस:या आठवडय़ात या बॅरिअर्सची यशस्वी चाचणी झाली. उत्तर पॅसिफिकच्या गतिचक्रात 1क्क् कि.मी.र्पयत  हे बॅरिअर्स टाकल्यास सुमारे 1क् वर्षात जवळपास 42 टक्के प्लॅस्टिक जमा होईल, असा दावा स्लॅट करतो.  आता हे बॅरिअर्स निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात आहे. ठरल्याप्रमाणो सर्व  झालं तर जगभरातील सर्वात मोठी समुद्र स्वच्छतेची मोहीम 2क्2क्मध्ये सुरू होईल. 
समुद्रात सापडणारं हे प्लॅस्टिक उत्तम प्रतीचं असल्याचं स्लॅट सांगतो. त्यामुळे या प्लॅस्टिकपासून काही निर्मिती  करता येईल काय, यावर विचार सुरू आहे. यासाठी दहा कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. यामुळे किनारी आणलेल्या प्लॅस्टिकचा प्रश्न मार्गी  लागेल आणि पैसाही उभा राहील, अशी आशा स्लॅटला वाटते आहे.
गजानन दिवाण
 
स्लॅटची यंग ब्रिगेड
या मोहिमेत चार्टर्ड अकाउंटंट असलेला 2क् वर्षीय मायकेल हार्टनॅक चिफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम पाहतो. लुरेन्स बूट हा इंजिनिअरिंग मॅनेजर आहे. जुलिया रेसर ही प्रमुख ओशियनग्राफर आहे. याशिवाय ऑपरेशन टीममध्ये आठ जण, संशोधन पथकात नऊ जण, विशेष प्रकल्पात सहा जण, प्रकल्प अंमलबजावणी, मार्केटिंगमध्ये दोघे जण आणि सव्र्हिसिंग सेंटरमध्ये चौघे जण काम पाहतात. एचआर, आयटी विभागात 11 जण, भाषांतर विभागात 12 जण आहेत.  
 
(फोटो-एल्बाट्रोस)
समुद्री पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर
संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार समुद्रात प्रत्येक चौरस किलोमीटरवर प्लॅस्टिकचे 13 हजार तुकडे वाहत असतात. यातील अनेक तुकडे समुद्री जिवाच्या पोटात जात असतात. पुढे या समुद्री जिवांचा मृत्यू होतो. एल्बोट्रोस हा समुद्री पक्षी याच कारणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 
 
टूथब्रशपासून लायटर्पयत.. 
नेदरलँडमधील इन्स्टिटय़ूट फॉर मरिन रिसोर्सेस अॅण्ड इकोसिस्टम स्टडिजचे डॉ. अॅण्ड्रय़ू व्हॅन फ्रँकर यांनी समुद्रात आढळणा:या वेगवेगळ्या वस्तू आपल्या कार्यालयातच एका दर्शनी भागात ठेवल्या आहेत. यात टूथब्रश, लायटर, गोल्फ बॉल आदि वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तू कुठे आढळल्या, तर एल्बोट्रोस पक्ष्याच्या पोटात !  
 
समुद्रातील अन्नसाखळीच 
नष्ट होण्याची भीती 
समुद्रातील प्लॅस्टिक स्पंजसारखे काम करते. पाण्यातील विविध रसायन ते शोषून घेते. पुढे हे प्लॅस्टिक मासे किंवा समुद्री पक्ष्याच्या पोटात जाते. यामुळे ते मरण पावतात. परिणामी समुद्रातील अन्नसाखळीच नष्ट होण्याची भीती यूएस नॅशनल ओशिअॅनिक अॅण्ड अॅटमॉसफियरिक अॅडमिनिस्ट्रेशनचे मरिन डेब्रिस व्यक्त करतात. 
 
 
(लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपवृत्त संपादक आहेत.)
gajanan.diwan@lokmat.com

Web Title: Sea slat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.