ऋतू हिरवा, ऋतू बरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 05:12 PM2020-06-11T17:12:10+5:302020-06-11T17:19:28+5:30
शांताबाईंची कविता प्रशांत सरोवरात अलगद एकापाठोपाठ एक कमळं उमलत जावीत तशी आपल्यासमोर उलगडत जाते.. त्यांच्या कवितेने आपलं भणंग आयुष्य सुजाण, शहाणं, निग्रही केलं आहे..
लीना पांढरे
टाळेबंदीचा बंदिस्त, विषण्ण करून टाकणारा काळ. तशात चक्रीवादळाच्या थडकणा:या बातम्या.
रात्नभर मुसळधार पाऊस कोसळत होता. शेजारच्या कंपाउंडमधील काळी मांजरी केविलवाणी ओरडत होती. पहाटे पहाटे ती व्यायली. नुकतीच जन्मलेली, डोळे मिटलेली पिल्लं तोंडात धरून ती इकडे-तिकडे आसरा शोधू लागली आणि मला शांताबाईंची कविता अचानक आठवली.
‘नुकतीच कोठे मांजर व्याली, सांन जीव कोवळे,
काचेवरती कसे दाटले अवेळचे कावळे.’
जन्म आणि लगेच त्या कोवळ्या जिवांवरील मरणाचं सावट किती नेमकेपणाने मांडले शांताबाईंनी. शांता शेळके यांना या इहलोकाचा निरोप घेऊन उणीपुरी 18 वर्षे उलटली. 6 जून 2002 रोजी अशाच पावसाळी कुंद, दाटून आलेल्या वेळी त्यांनी आपला निरोप घेतला. शांताबाईंचं व्यक्तिमत्त्व भारदस्त खानदानी आणि आदबशीर होतं. डोक्यावरून घेतलेला पदर, भाळावरील ठसठशीत कुंकू, कानात टपो:या मोत्यांच्या कुडय़ा, सस्मित चेहरा आणि आश्वस्त करणारी शांत नजर.
शांताबाईंसारखीच त्यांची कविताही आहे. चांदण्या रात्नी उंच देठावर उमललेल्या निशिगंधासारखी. शालीन, तालेवार आणि खानदानी कविता उंची अत्तरासारखी. जन्मभर आपल्यात खोलवर परिमळत राहाणारी.
कविता हा शब्दसुद्धा परक्या लिपीसारख्या असणा:या कितीतरी मराठी माणसांना शांताबाईंची गीतं अगदी बालवाडीच्या वर्गापासूनच भेटायला लागतात.
किलबिल किलबिल पक्षी बोलती, पप्पा सांगा कुणाचे, आणि नंतर शाळेतला कुठलाही कार्यक्रम ‘जय शारदे वागिश्वरी’ या सरस्वतीस्तवनानेच सुरू व्हायचा. त्यानंतर ‘गणराज रंगी नाचतो’पासून ‘शूर आम्ही सरदार’ अशी वीरश्री अंगात संचार करणारी गाणी त्याच वयात भेटली.
थोडसं मोठं झाल्यानंतर शाळेच्या रंगमंचावर गुडघ्यार्पयत जरीची साडी नेसून ‘वादळ वारं सुटलं गो’, ‘माङया सारंगा राजा ’ किंवा ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’ यावर ठेका धरला. नंतर स्वत:बद्दल खुळचट घमेंड बाळगण्याची कॉलेजची स्वप्नाळू वर्षे. ‘शालू हिरवा पाचू नी मरवा’ अशा भावगीतांपासून ‘जाईन विचारत रानफुला, भेटेल तिथे गं सजण मला’
किंवा ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माङया मनातला का तेथे असेल रावा’ अशा तारुण्यसुलभ गीतांबरोबर धुंद मदीर करून टाकणा:या शृंगारिक लावण्याही शांताबाईंनी लिहिलेल्या आहेत.
आशाबाईंनी गायलेली लावणी आठवते?
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी,
कर्नाटकी कशिदा मी काढीला,
हात नगा लावू माङया साडीला.
त्यांची गीतं ऐकताना कायमच ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ वाटत राहिला.‘घर रानी साजणा’ असला तरीसुद्धा.
पण त्याच लेखणीतून जिवाची तार छेडणा:या माणिक वर्मा यांच्या स्वरात शांताबाई यांनी विनवले होते.
‘मी तुझी होते कधी हे सर्व तू विसरून जा,
चांदण्या रात्नीतले ते स्वप्न तू विसरून जा .’
आशाच्या व्याकूळ सुरातून म्हटलेले गीत,
जिवलगा राहिले रे दूर घर माङो.
जितेंद्र अभिषेकी यांनी मांडलेली शांताबाईंची फिर्याद.
काटा रु ते कुणाला आक्रं दतात कोणी.
मज फूल ही रु तावे हा दैवयोग आहे.’
-अशी किती उदाहरणं सांगता येतील.
शांताबाईंची कविता ही अस्सल स्त्नीत्व व्यक्त करणारी आत्मनिष्ठ आणि रोमॅटिक कविता आहे. ती कुठेही सामाजिक, वैचारिक, राजकीय क्षितिजांना गवसणी घालायला गेलेली नाही आणि ती अजिबात दुबरेध नाही. शांताबाईंची कविता प्रशांत सरोवरात अलगद एकापाठोपाठ एक कमळं उमलत जावीत तशी आपल्यासमोर उलगडत जाते. बाईंची सर्व सांस्कृतिक संचितं, त्यांची संस्कृतप्रचुर भाषा, लोकगीतं, स्त्नीगीतं, जात्यावरच्या ओव्या, संतांचे अभंग, मेघदूत, उत्तररामचरित सारख्या महाकाव्यच्या गडद खुणा हे सर्व संस्कारधन त्यांच्या कवितेतून प्रगट होते.
शांताबाईंच्या कवितेने आमचं भणंग आयुष्य सुजाण, शहाणं, निग्रही केलं आहे आणि सहजपणो जगण्याला भिडणा:या साध्यासुध्या निर्मळ स्वीकारशीलतेच्या व्रताचा वसा त्यांच्या कवितेने आम्हाला दिला आहे.
( लेखिका प्राध्यापक आहेत.)