सेकंड सेक्स- हे पुस्तक वाचलंय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:53 PM2018-07-12T15:53:12+5:302018-07-12T15:53:23+5:30
मुलगी म्हणून आपण कसा विचार करतो, आपण तसा विचार करतो की ते करायला आपल्याला भाग पाडलं जातं?
- प्रज्ञा शिदोरे
सिमॉन द बोव्हूआ. या कोण असं विचारू नका. सिमॉन द बोव्हूआ यांनी स्त्निवादावर म्हणजेच फेमिनिझमवर बरचं लिखाण केलं. फ्रान्समध्ये अत्यंत सधन घरात जन्माला आलेल्या सिमॉन यांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं.
सिमॉन द बोव्हूआ त्यांचं सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारण पुस्तक म्हणजे ‘द सेकंड सेक्स’. पुरुषसत्ताक जगात ‘स्त्नी’ असणं म्हणजे काय, स्त्नित्वाची परिभाषा काय, यावर शोध घेत त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. 1949 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला लगेचच प्रसिद्धी मिळाली. मूळ फ्रेंचमध्ये लिहिलं गेलेलं हे पुस्तक 1953 साली इंग्रजीमध्ये उपलब्ध झालं. स्त्रियांना दिला जाणारा दुय्यम दर्जा याविषयी वाचताना आपल्या मानसिकतेलाही अनेक धक्के बसत जातात.
आपला समाज पुरुषसत्ताक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी घडवत असतो. पुरुषावर स्त्रीचं अस्तित्व अवलंबून नाही, ती परावलंबी नाही. तिला स्वतंत्न अस्तित्वदेखील आहे असं बोव्हूआ मांडतात. मूळ फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या पहिल्याच आठवडय़ात 22 हजार प्रती विकल्या गेल्या. व्हॅटिकनने या पुस्तकावर बंदी घातली होती. हे पुस्तक समजायला थोडं जड असलं तरी हा स्त्निवादाचा विचार सर्वानी समजून घ्यावा असा आहे.
सिमॉन द बोव्हूआ यांच्या आयुष्यावर बीबीसी रेडिओने एक चर्चासत्न आयोजित केलं होतं ते नक्की ऐका.
‘सेकंड सेक्स’ या पुस्तकाचं मराठीत अनुवाद करुणा गोखले यांनी केले आहे.
गुगल करून पाहा, या विषयावर अनेक व्हिडीओही पहायला मिळतील.