शाहरूख म्हणाला, माझ्या लव्ह अफेअरवर टांगती तलवार!

By admin | Published: April 11, 2017 06:33 PM2017-04-11T18:33:28+5:302017-04-11T18:33:28+5:30

अमेरिकेतल्या येल या जगप्रसिध्द विद्यापीठाने शाहरूख खानला अतिशय प्रतिष्ठेच्या चब फेलोशीपने सन्मानित केलं.

Shahrukh said, my love affair hanging sword! | शाहरूख म्हणाला, माझ्या लव्ह अफेअरवर टांगती तलवार!

शाहरूख म्हणाला, माझ्या लव्ह अफेअरवर टांगती तलवार!

Next

अमेरिकेतल्या येल या जगप्रसिध्द विद्यापीठाने शाहरूख खानला अतिशय प्रतिष्ठेच्या चब फेलोशीपने सन्मानित केलं. या फेलोशीपचा गौरव मिळालेला तो पहिला बॉलीवूड स्टार! हा सन्मान स्वीकारताना येलचे विध्यार्थी आणि प्राध्यापकांसमोर शाहरूखने यश-अपयश-संघर्ष आणि कष्ट या विषयावर स्वत:चे अनुभव सांगणारं फार सुंदर भाषण केलं होतं... शाहरुख जे जे म्हणाला त्याचं हे संकलन : आज भाग- तीन ..............................................................................

 स्वत:च्याच मेलोड्रामामध्ये मी हरवून जायला लागतो. कळत नकळत मी कसा असलो पाहिजे याबद्दल लोकांच्या अपेक्षांच्या चष्म्यातून मी जगायला सुरु वात करतो आणि तरीही लोक असंतुष्टच राहिले तर मात्र मग माझ्या आणि मला पाहणाऱ्या या माणसांच्या मध्ये चालू असलेल्या लव्ह अफेअरवर टांगती तलवार! पुन्हा तारेवरची कसरत... मग जे येतं ते अधिकाधिक उत्तम करत राहायचं नि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे काही करतोय त्यावर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रि यांनी परेशान व्हायचं नाही. मला माझ्या दोरावर धड नाचता येत नाही. कोलांटउड्या हव्या तितक्या मारता येतात, पण गिरकी घेता येत नाही. माझे पाय आखडलेले व जड झालेले असतात. मी कोसळू नये याचा प्रयत्न करतो, घसरतो, पण कधीच पडत नाही आणि हे सगळं घडत असताना माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य वगैरे नि करत काय असतो मी त्यावेळी, तर आॅटोग्राफ देत असतो. मी बनलेलो आहे सगळ्यांचे मनोरंजन करणारा डोंबारी! संतुलन साधण्याची माझी कृती आणि बाह्य प्रतिक्रि या हा सगळा उघडावाघडा खेळ ‘मी अंतर्यामी कोण आहे?’ या प्रश्नादेखत चालू आहे. मला अचानक रस्त्यावर खेळ करणाऱ्या कलाकारासारखं वाटायला लागतं. आजूबाजूनं जाणारी गर्दी किंचित थांबून संमिश्र उत्सुकतेनं पाहते, टाळ्या पिटते, चुकचुकते किंवा उपेक्षा करते. खऱ्या जगण्यातलं हे कल्पनाविश्व भोगत असताना किंवा बरेचदा नसताना, माझ्या आतला खरा मी प्रेक्षकांच्या जागी बसलेला असतो. स्वत:चा परफॉर्मन्स पाहून दाद देत असतो नि मूर्खपणावर दिलखुलास हसतही असतो. तर माझ्या मित्रांनो, स्वत:वर हसायलाही शिकायला हवं! स्वत:विषयी नि स्वत:च्या जगण्याविषयी विषाद वाटून घेऊ नका. चिडू नका. आयुष्यात स्वत:चा रागराग करणं किंवा स्वत:ला नाकारणं ही एक भयंकर घातक गोष्ट असते. लक्षात ठेवा, तुमची सर्जनशीलता हे तुम्ही जगाला दिलेलं बक्षीस असतं. सर्जनशीलता कशाचीच मौताद नाही, अगदी कौतुकाचीही! स्वत:ला खोल खणत न्या. वोडकाचे एकापाठोपाठ एक ग्लास रिचवताना मी स्वत:वर दया यावंसं काही ऐकून घेतो, वैफल्याची गाणी ऐकतो ... मला सांगायचंय काय की आपल्याला स्वत:बाबतीत कमी विध्वंसक मार्ग निवडता येऊ शकतो. आपण हे करू शकतो, मात्र विश्वास हवा! विश्वास हवा की मी जगाला माझ्या निर्मितीची एक सुंदर भेट देऊ शकतो, आणि तीच सर्वोच्च भेट आहे. अशाच लाईनवर विचार केला तर कदाचित देवही केवढा मोठा निर्मिक आहे असं म्हणू शकतो आपण! घरं नि गाड्यांविषयी नाही बोलत मी. कधीच नाही. ही केवळ साधनं आहेत. तुमच्या बुद्धीमत्तेमुळं किंवा सर्जनाच्या वर्षावामुळं हे सगळं नाहीये. तुमच्या भवताली असणाऱ्या माणसांच्या बिझनेसमुळं ते आहे. ही माणसं बार्टर बिझनेसमध्ये आहेत. तुम्ही नाही. ही देवघेव त्यांचा भाग. तुमचं काम आहे देणं नि शिकत राहाणं. कलेविषयी तुम्ही हाती घेतलेलं काम एका जन्मात संपणारं नव्हे. त्याची परिपूर्णता ही तुमच्या कलात्मक अभिव्यक्तीत दडलेली आहे, वस्तूंमध्ये नव्हे. - आॅक्सिजन टीम भाग एकची लिंक- ँhttp://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=4922 

Web Title: Shahrukh said, my love affair hanging sword!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.