यंदा चालणार शॅकेटस्ची फॅशन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 07:52 AM2021-01-07T07:52:06+5:302021-01-07T07:55:06+5:30
फॅशन इंडस्ट्रीला त्यातही कपड्यांच्या फॅशन्स आणि उद्योगाला आशा आहे की, २०२१ या वर्षात तरी लोक कपडे खरेदी करतील, चांगलेचुंगले कपडे घालून बाहेर पडतील.
वर्क फ्रॉम होम असणाऱ्या आणि ऑनलाइन शिकणाऱ्या तमाम जनतेने गेल्या वर्षी फक्त ‘झूम फ्रेण्डली’ कपडे घातले. बाकी सगळा पैजामाछाप कारभार. मात्र, फॅशन इंडस्ट्रीला त्यातही कपड्यांच्या फॅशन्स आणि उद्योगाला आशा आहे की, २०२१ या वर्षात तरी लोक कपडे खरेदी करतील, चांगलेचुंगले कपडे घालून बाहेर पडतील. निदान घरबसल्या का होईना फॅशनेबल कपडे घालतील, तर फॅशन उद्योगाला महत्त्वाचे वाटणारे हे काही ट्रेण्डस्.
१. पफ स्लिव्हज
फुग्यांच्या या बाह्या ८० च्या दशकात भारी ट्रेण्डी होत्या. आता ८० ची फॅशन फिरून परत येत असतानाच्या काळात पुन्हा या पफ स्लिव्हज् २०२१ चा भाग होत आहेत.
२. बेसबॉल कॅप
ही कॅप युनिसेक्स म्हणजे मुले-मुली दोन्ही घालू शकतात आणि कॅपच्या जगात सध्या या कॅपला अच्छे दिन आलेत.
३. फुलांची जादू
फ्लॉवर प्रिन्ट सध्या चर्चेत आहेत आणि मुलींच्याच नाही, तर मुलांच्याही कपड्यांत ही फ्लॉवर पॉवर दिसू शकते.
४. हाय वेस्टेड पॅन्टस्
लो वेस्टची फॅशन गेली, आता पुरुषांच्या हाय वेस्ट पॅन्टस्ची फॅशन येते आहे.
५. पिंक ॲण्ड यलो
हे दोन्ही रंग २०२१ चे कलर ऑफ द ईअर म्हणून सर्व फॅशन ट्रेण्डमध्ये दिसू शकतात.
६. शॅकेटस्
हा नवा वस्त्र प्रकार ही २०२१ ची ओळख व्हावी. शर्ट आणि जाकीट यांचे मिळून एक रूप झालेले हे शॅकेटस् असतील.