शिल्पा शेट्टीची डेनिम साडी, आपल्याला शोभेल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:33 PM2018-02-07T15:33:59+5:302018-02-08T08:44:24+5:30
मुळात ते आउट ऑफ ट्रेण्ड कधी झालंच नव्हतं!
- श्रुती साठे
डेनिम ट्रेण्ड मध्ये आलंय?
मुळात ते आउट ऑफ ट्रेण्ड कधी झालंच नव्हतं! जागतिक पातळीवरची एव्हरग्रीन फॅशन किंवा कधी कालबाह्य न होणारा ट्रेण्ड म्हणजे डेनिमचा! अलीकडे शिल्पा शेट्टीने तर डेनिमची साडीच नेसली. त्यातून ती चर्चेत होती. आणि डेनिमची चर्चाही नव्यानं सुरू झाली. वर्षानुवर्षे डेनिम जीन्सबरोबर कॉन्ट्रास्ट टॉप, शर्ट किंवा अॅक्सेसरी वापरणाºया तरुण-तरुणींसाठी अजून एक सहज पर्याय ट्रेण्डमध्ये आलाय. यासाठी कदाचित तुम्हाला शॉपिंगला जायची, खूप पैसे खर्च करायची गरजसुद्धा नाहीये! तुमच्याच कपाटात असलेले डेनिम शर्ट आणि टॉप, डेनिम जॅकेट, डेनिम जीन्स, शॉर्ट्स हे सगळे एकत्र आणून ३-४ वेगळे लूक्स बनवता येतील. ते कसं करता येईल पाहा..
डेनिम टॉप्स, जॅकेट, शर्ट
लाइट वेट डेनिमच्या कापडात मिळत असलेले प्लेन आणि प्रिंटेड डेनिम शर्ट, टॉप्स हे तरुणी वापरतातच. सध्या कलर ब्लॉकचा ट्रेण्ड आहे, म्हणजे शर्ट किंवा जॅकेटची एक बाजू गडद आणि एक बाजू फिकी. असे शर्ट ट्रिपसाठी, आउटिंगसाठी मस्त दिसतात.
डेनिम ड्रेस
नेहमीच वापरत आलेले शिफॉन, रेयॉन मधला ड्रेस बाजूला ठेवून डेनिम ड्रेसचा वापर एक फ्रेश आणि वेगळा लूक देईल. यामध्ये शर्ट ड्रेस, म्हणजे शर्टची कॉलर आणि पुढे बटण असलेला ड्रेस जास्त पाहायला मिळतो.
डेनिम जीन्स
नेहमीच्या वापरातल्या जीन्सला पर्याय म्हणून डबल वेस्ट जीन्स, बूट कट, फ्लेअर जीन्स, रिप्प्ड, कलर ब्लॉक इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
क्यूलॉट
ज्या मुली शॉर्ट्स किंवा स्कर्टमध्ये कम्फर्टेबल नसतील त्याच्यासाठी क्यूलॉट हा चांगला पर्याय ठरू शकतो. गुढग्यापर्यंत किंवा लांबीने अजून जास्त असलेले क्यूलॉट सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.
डेनिम साडी
शिल्पा शेट्टीच्या डेनिम साडी आणि ब्लॉउजमधला लूक या कपड्याकडे बघायचा जगाचा दृष्टिकोनच बदलवून गेला! लाइट वेट प्रिंटेड डेनिम ब्लाउज आणि काठाला लेस लावलेली डेनिम साडी सगळ्यांची वाहवाह मिळवून गेली.
काळजी काय घ्याल?
* डेनिम टॉप आणि बॉटम एकत्र वापरताना त्यांच्या शेड्स वेगळ्या असूद्या. लाइट वेट डेनिम किंवा शाम्बरे कापडाचे फिक्या निळ्या रंगाचे शर्ट, टॉप्स हे डार्कडेनिम जीन्सबरोबर खूप क्लासी दिसतात.
* डेनिम-ऑन-डेनिम लूक करताना क्लीन वॉश जीन्सपेक्षा रिप्प्ड जीन्स उठून दिसतात.
* हा लूक कपड्यापुरताच मर्यादित राहुद्यात. कपड्यांबरोबरच डेनिम सॅण्डल्स, पर्स खूप अती होतं. ते करू नये.