शिव्या आणि पोष्टी

By admin | Published: May 12, 2016 02:52 PM2016-05-12T14:52:57+5:302016-05-12T15:05:24+5:30

ऑनलाइन तरुणींच्या वाटय़ाला काय येतं? टोमणो, गलिच्छ टिप्पण्या, शिवीगाळ, अत्यंत ओंगळ शेरे. आणि हे सारं का, तर रस्त्यावर उभं राहून छेड नाही ना काढता येत, मग सभ्य बुरखा बाजूला ठेवून ती विकृत हौस ऑनलाइन जिरवायची!

Shiva and poem | शिव्या आणि पोष्टी

शिव्या आणि पोष्टी

Next
>- ऑनलाइन अपमान सहन करणा:या तरुणी खंबीरपणो कधी उभ्या राहणार?
 
सेल्फी विथ डॉटर ही योजना आणि त्यावर झालेली टीका आठवते?
अलीकडे कुठलीही योजना आली की काय होतं? - एकतर प्रचंड स्वागत, कौतुकसोहळे नाहीतर प्रचंड टीका. किंवा सर्वसाधारणपणो घनघोर टीका आणि मतभेद.
आणि हे सारं कुठं तर सोशल मीडियावर!
अशाच एका संदर्भात दोन बायकांना सोशल मीडियावर लैंगिक छळाला, अपमानाला, अश्लील आणि अर्वाच्य वर्तणुकीला सामोरे जावे लागले. त्या दोघी होत्या, अभिनेत्री श्रुती सेठ आणि ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वूमन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन. लोक इतके पातळी सोडून बोलत होते की वाचणा:यालाही लाज वाटावी. 
अर्थात हे उदाहरण काही अपवाद नाही. अगदी सामान्य कमेण्टपासून ते एखाद्या घटना, व्यक्ती किंवा योजनेविषयी आपलं मत मांडणा:या अनेक महिलांना सोशल मीडियावर सर्रास लक्ष्य केलं जातं आहे.
आणि हे फक्त भारतातच घडतं आहे असं नव्हे, तर हे जगभरातच सध्या सर्रास सुरू आहे. सोशल मीडिया आणि महिलांविषयी होणा:या अपमानास्पद टिप्पण्या यासंदर्भातल्या काही सर्वेक्षणानुसार जगभरात सोशल नेटवर्किग वापरणा:या स्त्रियांपैकी 5क् टक्क्यांहून अधिक स्त्रियांना सोशल मीडियातल्या लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं. 
 इंटरनेट डेमोक्र सी प्रोजेक्टच्या वतीनं यासंदर्भात एक सर्वेक्षण भारतातही  करण्यात आलं होतं. त्यात असं दिसून आलं की, सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून स्त्रियांवर लैंगिक ताशेरे मारणं, त्यांना त्रस देणं, धमकावणं, त्यांचा शाब्दिक छळ करणं असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. एखाद्या नाक्यावरून किंवा चौकातून जाणा:या तरुणीची काही टवाळ लोक जशी छेड काढतात, अश्लील बोलतात, हातवारे करतात किंवा गर्दीत जवळ येऊन काहीतरी घाणोरडं पुटपुटतात त्यातलाच हा एक प्रकार, फक्त सोशल साइटवर चालणारा! वरकरणी सभ्य दिसणारे पुरुष चेहरेही या टवाळकीत अग्रेसर असतात. 
इंटरनेट डेमोक्र सी प्रोजेक्टच्या डायरेक्टर अन्जा कोव्हक्स म्हणतात, ‘बायकांना गप्प करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिक्रि या पुरु षांकडून दिल्या जातात. भारतात ऑनलाइन अब्युजचा म्हणजेच शिवीगाळचा प्रकार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातही लैंगिक पातळीवरील कमेंट्स आणि त्याद्वारे स्त्रियांचा अपमान करणं हे तर प्रचंड प्रमाणात होतं. बहुतेकदा असे अनुभव वाटय़ाला येणा:या महिला त्या शिवीगाळ करणा:या व्यक्तीला अनफ्रेंड करतात पण यापलीकडे पोलिसांकडे जात नाहीत, तक्रार करत नाहीत कारण पुन्हा पोलिसांच्या तपासात सा:या प्रकाराची जाहीर चर्चा होण्याची आणि त्यासह आपलीच बदनामी होण्याची धास्ती असतेच.’ 
ऑनलाइन जगात तरुणींवर अशा अश्लील टिप्पण्या होतात, वाईटसाईट अपमानकारक खुलेआम पोस्ट केलं जातं. हा विषय निघाला की एक तर्क काहीजण हिरीरीनं मांडतात. एक बाजू असं म्हणते की, सोशल मीडियात या तरु णी उत्तान कपडे घातलेले फोटो टाकतात, बिन्धास्त लैंगिकतेबद्दल वाट्टेल ते लिहित सुटतात म्हणून मग त्या टार्गेट होतात. मुलींनी आपल्या लिमिटमध्ये राहावं म्हणजे कुणी काही बोलायला धजावणार नाही, असा युक्तिवाद केला जातो.
पण हा युक्तिवादच खोटा, तकलादू, हास्यास्पद आहे. मला या आणि अशा कमेंट्सची भारी गंमत वाटते. म्हणजे एखाद्या बाईने आकर्षक फोटो टाकले किंवा छोटे कपडे घातले म्हणून तिच्या चारित्र्यावर घसरून, तिच्यावर लैंगिक ताशेरे मारणा:यांना स्वत:चा, स्वत:च्या भाषेचा काही दर्जाच नसतो का? कुणालाही बघून पाघळण्याइतके ते स्वत: चरित्रहीन असतात? की स्वत:च्या लैंगिक गरजा अशा प्रकारे ते पूर्ण करू पाहतात?
 प्रत्यक्ष एखाद्या बाईची छेड काढली आणि तिने पोलिसांत तक्र ार केली तर त्या व्यक्तीचे वाभाडे निघाल्याशिवाय राहत नाहीत. त्यामानाने हे माध्यम अशा विचित्र वृत्तींना सुरक्षित वाटत असावे. कारण, कसेही आणि काहीही बोलले तरी तरुणी पोलिसांत तक्र ार क्वचितच करतात. त्यामुळे पोलिसांनी पकडून नेण्याची, वाभाडे निघण्याची, घरी आई, बायको किंवा इतर स्त्रियांना समजण्याची शक्यता खूपच कमी असते. शिवाय सामाजिक प्रतिष्ठा आहे तशी राहते. छळ सहन करणा:या स्त्रिया गप्प राहून फक्त अनफ्रेंड करत असल्यानं बाकी सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागत नाही. 
 मानसोपचारतज्ज्ञ यालाही एक प्रकारचं व्यसनच मानतात. प्रत्यक्ष आयुष्यातही जे स्त्रियांकडे उपभोगाच्याच नजरेतून बघत असतील ते आभासी जगात असे उघड महिला-मुलींना छळायला लागतात. त्यातून आनंद मिळवतात. म्हणून खरंतर या प्रकारच्या ऑनलाइन अब्युजच्या विरोधात मुलींनीच नाही तर तरुणांनीही बोलायला हवे. कारण हा विषय म्हणजे स्त्री विरु द्ध पुरु ष असा नाही, तर चुकीच्या पद्धतीनं वागणा:या वृत्ती आणि व्यक्तींना वेळीच धडा शिकवण्याचा आहे.
प्रत्यक्ष जगताना आपण अनेकदा नुस्ते बघे असतोच, निदान सोशल मीडियात तरी बघेपणा सोडला पाहिजे. 
 
 
श्रुती सेठ  आणि  कविता कृष्णन या सेलिब्रिटी असल्यानं त्यांना झालेल्या अश्लील शिवीगाळ प्रकरणाची चर्चा तरी झाली. पण असा त्रस सहन करणा:या सामान्य तरुणींचं काय? इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने 2013 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात इंटरनेट वापरणा:या 52 टक्के महिला नोकरदार आहेत, तर 55 टक्के गृहिणी आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात महिला आता सोशल मीडिया वापरत असल्या, तरी यापैकी बहुतेक प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी या आभासी जगातल्या शाब्दिक लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागतं. 
 
- मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com
 
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
 
 

Web Title: Shiva and poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.