कंधा

By admin | Published: July 2, 2015 03:27 PM2015-07-02T15:27:50+5:302015-07-02T15:27:50+5:30

मी आहे कोण तुझा? कंधा रडण्यासाठी फक्त एक हक्काचा खांदा, जेव्हा कुणीच नाही तेव्हा मी, एरवी मी कुणीच नाही, हे असं कसं?

Shoulder | कंधा

कंधा

Next
‘तनू वेड्स मनू’ नावाच्या सिनेमात तनूसाठी वाट्टेल ते करू पाहणारा आणि वकील होऊ घातलेला ‘तो’ एकदा वैतागून सांगतो, ‘वो बिरादरी होती है ना लौंडों की, जो सिर्फ कंधा बनते है कन्या का, तो हूं मै!’म्हणजे काय तर, ना मित्र, ना प्रियकर अशा अवस्थेतल्या आणि ती कधीही आपली होणार नाही हे माहिती असलेल्या तरुणांचं हे एक रूप, कंधा नावाचं! त्या ‘कंध्यांचंच’ जग सांगणारा हा एक लेख.. 
------------

टॉप्स की रिंग्ज, हाय हिल्स की सँडल्स, लेगीन्स  की सलवार, हॅवसॅक की हॅण्डबॅग, शिवनेरी की एशियाड, लॅपटॉप की नोटबुक, सायको की इकॉनॉमिक्स, त्याच्याविषयी आईशी बोलू की बाबांशी?  ब्रेकअप करू की आणखी एक चान्स देऊ? या तुझया सा-या प्रश्नांची उत्तरं द्यायला, तुला हवं तिथं न्यायला, तुला कंपनी द्यायला, रडायचं असेल तर ‘अॅव्हेलेबल’ रहायला आणि तुझ्यासाठी वाट्टेल ते करायला मी कायमच हजर! मी आहे कोण तुझा? कंधा रडण्यासाठी फक्त एक हक्काचा खांदा, जेव्हा कुणीच नाही तेव्हा मी, एरवी मी कुणीच नाही, हे असं कसं?

 
 
‘तू वेडाएस का?.. वी आर जस्ट फ्रे ण्ड्स.’
‘हे बघ, उगाच कॉम्प्लिकेट करू नकोस गोष्टी.. फ्रेण्डशिपसुद्धा स्पॉईल करतोय तू यात आपली..’
‘आय नेव्हर थॉट ऑफ यू दॅट वे..’
‘आय डोण्ट फील लाईक टॉकिंग टू यू एनीमोअर!’
***
‘क्लिक टू लोड अर्लीअर मेसेजेस’ व्हॉट्स अॅप मला सांगतयं. मी जवळपास ठरवलेलं असतं की नाही करायचं क्लिक. काहीही अर्थ नाहीये याला आता. उगाच प्रेमभंग झालेल्या नायकाचं आयुष्य जगण्याचा अट्टहास कशाला? मी दाढी पण करणारे उद्याच. फार वाढली नसली तरी. सिगारेट दोनच ओढल्या आहेत आजही. एक क्वार्टर मारूनही मी फार बडबड केली नसावी असा माझा अंदाज आहे. नीरज म्हणाला, ‘लाव सेटिंग’! आणि रोहितने ग्लास हवेत उंचावून तनू वेड्स मनूचा डायलॉग टाकला- ‘‘अरे वो बिरादरी होती है ना लौंडों की, जो सिर्फ कंधा बनते है कन्या का, तो वो है तू!’’ तरीही मी काहीच बोललो नाही. मला नाही माहीत काय असतं ते. असं काही असतं का मुळात हेच मला नाही माहीत. तरीही मी काही बोललो नाही. काल फक्त एक मेसेज पाठवला तुला, आय अॅम सॉरी. त्याच्याखाली आत्ताच दोन निळ्या बरोबरच्या खुणा आल्यात. तू मला ऑनलाइन दिसतीयेस. मी तरीही काहीच बोलत नाहीये. तुला त्रस होत असताना आजवर किती त्रस करून घेतला आणि तुला आनंद झाला की माझा आनंद गगनात मावायचा नाही आजवर!
 टॉप्स की रिंग्ज, हाय हिल्स की सँडल्स, लेगीन्स की सलवार, हॅवसॅक की हॅण्डबॅग, शिवनेरी की एशियाड, डॉगी की मनीमाऊ, ऑनलाइन पे की कॅश ऑन डिलीव्हरी, लॅपटॉप की नोटबुक, सॅमसंग की आयफोन, ब्रिझर की व्हाइट वाइन, सायको की इकॉनॉमिक्स, त्याच्याविषयी आईशी बोलू की बाबांशी? ब्रेकअप करू की आणखी एक चान्स देऊ त्याला?  - असं बरंच काही, कधीही, केव्हाही, कसेही येऊन आदळलेले तुङो प्रश्न, तुङया सिच्युएशन्स, तुङो प्रॉब्लेम्स, सगळे तुङो आणि मी कायमच हजर!
‘ऐक ना, अरे एक हेल्प हवी होती..’ असं तू फक्त म्हणालीस की मग मी गाडी चालवत असो, झोपलेला असो, अंघोळ करत असो, काहीही करत असो वा नसो. मी तुला मिनिटभरात रिप्लाय द्यायचा किंवा तू मिस्ड कॉल दिलास की लगेच तुला कॉल बॅक करायचं. पूर्ण चाज्र्ड बॅटरी पूर्ण मरेर्पयत किंवा सकाळीच टाकलेला टॉपप पूर्ण संपेर्पयत तुङयाशी फोनवर बोलायचं. आणि फोन ठेवताना तू म्हणणार, ‘खरंच कसला भारीयेस अरे तू. माझा डोरेमन आहेस. त्याच्याकडे कशी सगळ्यांसाठी गॅजेट्स असतात, तशी तुङयाकडे माङयासाठी नेहमीच वेआऊट असतो, कसलं भारी न?’ -यावर मी हसणार कालच्यासारखंच..
‘ता ना पी ही नी पा जा’ (इंग्रजीत तुला सांगायचं तर श्कुॅ81) यात सात रंगांपलीकडे मला सगळेच रंग सारखे वाटतात माहितीये का तुला? तरीही मी तुला सांगायचं की तुङयावर सी ग्रीन चांगला दिसेल की कोबाल्ट ब्ल्यू. 
तो सूरज. डोक्यात जातो माङया, तरीही त्याच्यासाठी परफ्यूम्स हुंगत फिरायचं मी, तुङया शॉपिंगच्या पिशव्या सांभाळत. आणि त्याने ‘फारच जवळचा मित्र दिसतोय तुझा.. माङयाहून जवळ नाहीये ना?’ असं टोकलं तुला की अख्खा आठवडा मी तुला मेसेजही करायचा नाही. कॉलेजमध्येही तुङयाशी बोलायचं नाही. मग रोज फोन वाजला की मी त्यावर तुझं नाव दिसेल, तुझा एखादा तरी मेसेज दिसेल अशा अपेक्षेत दिवस काढायचे.
माझं तुङया आयुष्यात काय स्थान आहे? असे प्रश्न पडू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा. स्वत:ला सांगत राहायचं की, हे मी फक्त तुङयासाठी नाही तर माङयासाठीही करतोय. एकदा संण्ण फणफणत होतो तापाने. तेव्हा तुला मेसेज केलेला. त्यावर तू फक्त ‘ऑ.. टेक केअर हं’ असा रिप्लाय केलेला. बिझी असावीस तू. एकदा माझं बाबांशी कडाक्याचं भांडण झालेलं. तुला सांगितलं तर म्हणाली, ‘‘होतं रे असं. बोलते नंतर..’’ बिझीच असावीस तू. माङया प्रोजेक्टला माङया फस्र्ट अवॉर्ड मिळालेलं. तेव्हा ‘वॉव कॉँग्रेट्स’ इतकंच. तेव्हाही बिझी असावीस तू. आणि शिवाय इतकंच बोलता, सांगता, देता येत असावं तुला.. तितकंच पुरेसं वाटत असावं. कदाचित तुझी कुवत तेवढीच असावी किंवा इच्छाशक्ती?
पण तू आजारी असतेस तेव्हा मी दिवसभर तुङया उशाशी बसून राहिलोय. तुझं सायलीशी भांडण झालं तेव्हा मध्यस्थी केलीये. तुला कॉलेजच्या ट्रॅडिशनल डेला कन्सोलेशन प्राइज मिळाल्यावरही मी तुला ट्रिट दिली आहे. तरीही मला काहीच फार मिळत नाहीये. मे बी आय वॉण्ट टू मच. तुङया आवाक्यापलीकडचं?
आणि हे सगळं कळत असूनही, बोचत असूनही, माहीत असूनही त्या-त्या क्षणांना तुझा कंधा, तुझा डोरेमन होणं का आवडत होतं मला? का कोण जाणो? आपण कुणासाठी तरी मॅटर करणं हे इतकं मॅटर का करतं आपल्याला? आपली कुणालातरी कधीतरी गरज भासणं ही आपलीच गरज का होऊन बसते?
हे असंच चाललं असतं. पण आज झालं काहीतरी..! ‘लाइक यू.. मे बी आय लव्ह यू.. आय अॅम सॉरी, इफ धीस हर्ट्स यू बट काण्ट हेल्प सेइंग इट’ असा मेसेज टाकला मी तुला. पुढच्याच क्षणी दोन निळ्या बरोबरच्या खुणा. काही सेकंद पॉज. मग तुझं टायपिंग. मला काय होत होतं हे सांगता नाही येणार पण मी फक्त एकटक त्या हिरव्या रंगातल्या ‘टायपिंग’कडे बघत होतो एकाग्रपणो. आणि मेसेज आला.. मेसेज आले रॅदर.. 1. तू वेडाएस का? 2. वी आर जस्ट फ्रेण्ड्स. 3. आय नेव्हर थॉट ऑफ यू दॅट वे.. 3. आय डोण्ट फील लाइक टॉकिंग टू यू एनीमोअर..
त्यावर रिप्लाय म्हणून आय अॅम सॉरी एवढाच मेसेज केला मी तुला. त्याखाली निळ्या खुणा आल्या असतील. किंवा नसतीलही. मला नाही आता रिप्लायची वाट पाहायची.  सध्यातरी. मी तुझा आधी कोण होतो माहीत नाही. आत्ता कोण आहे हे तर अजूनच माहीत नाही. आणि माहीत करून घ्यायचंही नाही. तुङयाकडे आधीही डोरेमन होतेच.. कदाचित पुढेही असतील. पण मला आणखी कुणाचाच डोरेमन नाही व्हायचंय. सध्यातरी.
आणखी एक- तो चमन आणि बावळट डोरेमन मला कधीही क्यूट वाटलेले नाहीत, तुला वाटत असले तरीही! 
 
तुमचा स्वत:चाही असा कुणी कंधा केला असेल,
किंवा तुम्ही स्वत:हून कंधा झाला असाल तर,
नक्की लिहा. तुमची कहाणी.
पत्ता? - नेहमीचाच. शेवटच्या पानावर, तळाशी.
पाकिटावर - ‘कंधा’ असा उल्लेख करायला विसरू नका..
 

Web Title: Shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.