झाडूवाले दोस्त

By admin | Published: June 9, 2016 04:55 PM2016-06-09T16:55:52+5:302016-06-09T16:55:52+5:30

फेसबुकच्या आकर्षक पोस्ट अन् व्हॉट्स अॅपचे रंगेल विनोद त्याच्या हातातल्या स्मार्टफोनमध्येही दिसायचेच; पण हा पठ्ठा इंटरनेटवर गाडगेबाबा शोधत बसायचा.

Shower friends | झाडूवाले दोस्त

झाडूवाले दोस्त

Next
- शफी पठाण
 
एक उच्चशिक्षित तरुण 
झाडू घेऊन झपाटल्यागत 
गाव झाडत सुटला, 
आणि आता पाच, दहा नव्हे 
तर आसपासच्या
तब्बल पंचेचाळीस गावात 
त्याचा हा झाडू अखंड चालतो आहे. 
त्याच्या दोन हातांना
आता त्याच्यासारख्याच
ध्येयवेडय़ा हातांची साथ लाभते आहे.
 
फेसबुकच्या आकर्षक पोस्ट अन् व्हॉट्स अॅपचे रंगेल विनोद त्याच्या हातातल्या स्मार्टफोनमध्येही दिसायचेच; पण हा पठ्ठा इंटरनेटवर गाडगेबाबा शोधत बसायचा.  निष्काम कर्म, मानवसेवा अशा त्याच्या वयाला न ङोपणा:या शब्दांचा अर्थ लावत बसायचा. अखेर या शोधप्रक्रियेचे वतरुळ पूर्ण झाले आणि हा उच्चशिक्षित तरुण झाडू घेऊन झपाटल्यागत गाव झाडत सुटला, तो अजून झाडतोच आहे. पाच, दहा, वीस-पंचवीस नव्हे तब्बल पंचेचाळीस गावात त्याचा हा झाडू अखंड चालतो आहे. त्याच्या दोन हातांना आता त्याच्यासारख्याच ध्येयवेडय़ा इतर हातांची साथ लाभली आहे. असे गाव झाडण्यामागचा या तरुणांचा स्वार्थ शून्य अन् आदर्श एकच, गाडगेबाबा. 
बाबा म्हणायचे, नुसते गाव झाडून उपयोग नाही, मनंही स्वच्छ झाली पाहिजेत. पण, गावात दारूचा दर्प रोजचाच. येथेही गाडगेबाबा धावून आले. मनाच्या स्वच्छतेसाठी त्यांनी कीर्तनाचा पर्याय दिला होता तोच पर्याय या तरुणांनी स्वीकारला अन् अखंड हरिनाम भागवत सप्ताहात जळणा:या भक्तीच्या धुपानं दारूचा दर्पही पार हद्दपार झाला. गावाच्या हितासाठी ही अशी विधायक जुळवाजुळव करणा:या त्या तरुणाचं नाव आहे सचिन घोडे.
 मुक्काम पोस्ट हुडकेश्वर (खुर्द),
 जिल्हा नागपूर. अन् त्याच्या टीमचे नाव ‘नि:स्वार्थी अखंड सेवा फाउंडेशन’.
सचिन तसा व्यावसायिक आहे. पण त्याच्यावर गाडगेबाबांच्या कार्याचा खूपच प्रभाव आहे. राजकारणाशिवाय गावात काही काम करायचं म्हणून त्यानं आणि त्याच्या दोस्तांनी झाडू अन् हरिनामाचा आधार घेतलाय. 45 गावे झालीत. शंभरचं टार्गेट आहे. जातील त्या गावात त्यांना चार-दोन तरुण असे हमखास सापडतात जे स्वयंप्रेरणोने त्यांच्यासोबत झाडू हातात घेतात. कुठल्याही गाजावाजाशिवाय हे स्वच्छतादूत कामाला भिडतात.
 झाडूसोबतच कीर्तनाचा वाटाही मोठा आहे. गावातली आधीची संध्याकाळ जरा ‘वेगळी’ असायची. आता सूर्य मावळतीला निघाला की सारे गाव देवळात पोहोचते. गाभा:यात तेवणा:या नंदादीपाच्या साक्षीने हरिनामाचा नाद चौफेर निनादू लागतो. या सा:या माहौलमुळे गावातील भरकटलेली युवा मंडळी निव्र्यसनी होत आहेत. एकाचवेळी 7क् लोकांनी व्यसन सोडल्याची इथली घटना अलीकडची आहे. प्रत्येक रविवारी पहाटे उठून गावातील मंदिर, विहार, संपूर्ण देवालये, शाळा, रस्ते स्वच्छ केले जातात. आपल्याच नाही शेजारच्या गावातही हा ताफा पोहोचतो अन् पाहता-पाहता अख्खे गाव आरशासारखे चकाकू लागते. 
 लोकांना भजनाच्या, घोषणाच्या माध्यमातून झाडता-झाडता जागृत करायचे. नंतर  स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचे. त्यांच्याकडून स्वच्छतेसाठी शपथ घ्यायची. गावातील 10 युवकांची टीम बनवून द्यायची, जेणोकरून त्यानंतरही स्वच्छतेचं हे काम सुरू राहील.
हातांनी स्वच्छतेचं व्रत घेतलं की सारं कसं बदलू शकतं, याची ही एक साधीशी पण अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे.
 
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
shafi000p@gmail.com

 

Web Title: Shower friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.