श्रग झिपर्स पुलओव्हर्स
By admin | Published: December 3, 2015 10:17 PM2015-12-03T22:17:56+5:302015-12-03T22:17:56+5:30
दाटलेल्या धुक्यात ग्रुपबरोबर घोटा-घोटाने घेतलेला मस्त टपरीवरचा वाफाळता चहा, सकाळी कॉलेजला जाताना रस्त्याच्या कडेला पेटलेल्या शेकोटीजवळ थांबून
Next
- सारिका पूरकर-गुजराथी
दाटलेल्या धुक्यात ग्रुपबरोबर घोटा-घोटाने घेतलेला मस्त टपरीवरचा वाफाळता चहा, सकाळी कॉलेजला जाताना रस्त्याच्या कडेला पेटलेल्या शेकोटीजवळ थांबून, चेहऱ्यावर हात चोळून घेतलेली ऊब, घरचे ‘नको नको’ म्हणत असतानाही कडाक्याच्या थंडीत मित्रांबरोबर हाणलेले गारेगार आइस्क्रीम असे थंडीतले प्रत्येकाचे एक ना अनेक फंडे!
आता तर काय आपल्या पंतप्रधानांनीही सांगितलंय की, चांगला ऋतू येतोय, तंदुरुस्तीसाठी त्याचा उपयोग करून घ्या! तसाही अनेकांना फिटनेसचा झटका येतोच हिवाळा जवळ आल्यावर आणि त्याच्यासोबत मस्त हिवाळी उबदार कपड्यांचीही फॅशन रंगात येतेच. मोसम कोणताही असो, तरुणाईसाठी ‘हटके लूक’ मस्टच असतो. मग कडाक्याच्या थंडीत पेहराव झाकून टाकणारी स्वेटर्स त्यात मागे कशी राहतील? या स्वेटर्सनाच स्टाइल स्टेटमेंट करण्यासाठी कॉलेजियन्सच्या उबदार कपड्यांच्या विश्वात एकाहून एक हटके पर्याय उपलब्ध आहेत.
यंदाच्या सीझनमध्ये तरुणाईला काय ट्राय करता येईल?
त्याचीच ही एक लिस्ट!
‘लेडीज फर्स्ट’ या नियमानुसार (आणि असंही मुलांच्या कपड्यांमध्ये ठेवलंय तरी काय असं?) आधी गर्ली विंटर वेअर्सकडे वळूयात...
श्रग
यंदाच्या सीझनसाठी ‘श्रग’ हा प्रकार इन आहे. ‘बेस्ट फॅशन आॅप्शन’ म्हणून विंटर कलेक्शनमध्ये याचा बोलबाला आहे. चायनीज फर, वूल, होजिअरी या फॅब्रिकमध्ये असंख्य डिझाइन्स श्रगमध्ये दिसून येताहेत. अॅनिमल प्रिंट, प्लेन, प्रिंटेड अशा कित्येक प्रकारांतील श्रग कॉलेजगोइंग गर्ल्सची ‘फर्स्ट चॉइस’ ठरत आहेत. क्रीम, पिंक, रेड, ग्रे, डार्क ग्रे या रंगांमधील श्रग कोणत्याही ड्रेसकोडला सूट होतातच.
लॉँग श्रग
हा श्रगचाच आणखी एक प्रकार; पण थोडा वेगळा लूक देणारा. लॉँग श्रग असं त्याला म्हणता येईल. दोन बाजूंना तिरके कट आणि लॉँग स्लीव्हज असलेला हा श्रग उबदार पर्याय ठरेल. हे श्रग शक्यतो प्लेन असतात.
कुर्ती पॅटर्न
लॉँग स्वेटर्समध्ये कुर्ती पॅटर्न तर जबरदस्त भाव खाऊन आहेत. जीन्सवर जी कुर्ती घालतो, त्याच पॅटर्नचे हे स्वेटर. कुर्ती स्वेटरचा शॉर्ट पॅटर्नही सुंदर दिसतो. कुर्ती स्वेटर्समध्ये भरपूर व्हरायटी, अनेक रंगसंगती उपलब्ध आहेत. नाजूक फुला-पानांचे डिझाइन, अॅबस्ट्रॅक्ट डिझाइन्स, पोलका डॉट्स या डिझाइन्स ट्राय करायला हरकत नाही.
टॉप पॅॅटर्न
कुर्ती पॅटर्नप्रमाणेच जीन्सवर कॅॅरी करण्यासाठी स्वेटर्समधील हा बेस्ट आॅप्शन आहे. क्रोशिया वर्क, प्रिंटेड, प्लेन, लॉँग, शॉर्ट अशा प्रकारांतील हे टॉप पॅॅटर्न स्वेटर्स तुम्हाला नक्कीच मोहात पाडतील. थ्री फोर्थ स्लीव्हज्, लॉँग स्लीव्हज्, शॉर्ट स्लीव्हज्, हायनेक, कॉलर, राउंड नेक, व्ही नेक, पॅक नेक असे प्रकारही यात मिळतात.
झीपर्स
जॅकेटचा लूक देणारे झीपर्स सध्या तमाम तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत. चेन झीपर्स, चेन आणि बटन झीपर्स हे दोन प्रकार वूल, होजिअरी या फॅब्रिक्समध्ये अनेक आकर्षक डिझाइन्स व रंगांनी भुरळ घालत आहेत. अॅपल, फ्लॉवर, स्टार्स, डॉट्स प्रिंट असलेले होजिअरी झीपर्स आणि नाजूक डिझाइन्सचे, चेक्स, स्ट्रिप्स असलेले वूलन झीपर्स हे पर्यायही भन्नाटच.. याचा ‘प्लस पॉइंट’ म्हणजे याला कॅप अॅटॅच्ड असल्याने वेगळी टोपी कॅरी करावी लागत नाही. पिवळा, गुलाबी, निळा, काळा, लाल, जांभळा, तपकिरी, कॉफी, गडद मेंदी या रंगांचे आणि राखाडी रंगाबरोबर या रंगांचे कॉम्बिनेशन असलेले झीपर्स सॉलिड हिट आहेत. त्याच्या पुढच्या दोन खिशांत हात टाकले की झालात तुम्ही ऐटबाज!
पोंचू, क्रोशिया पॅटर्न
पारंपरिक विणकामाचा आविष्कार असलेले हे प्रकार आजची तरुणाईही आवडीने मिरवत आहे. स्किन कलर, क्रीम कलर, गुलाबी, बेबी पिंक, लेमन कलर, इंग्लिश कलरमध्ये हे पोंचू शोभून दिसतात.
ब्लेझर कोट
लॉँग कोटचा हा प्रकार कडाक्याच्या थंडीत उपयोगी पडतो. ट्विट वूल आणि वेल्वेट मटेरिअलमधला हा लॉँग ब्लेझर कोट तुम्हाला थेट शिमला, काश्मीरमध्ये गेल्याचा फील मिळवून देऊ शकतो!
फॅन्सी स्वेटर्स
बेबी सॉफ्ट, रेन्बो, डॅफोडील, ओसवाल लोकरीपासून बनवलेल्या फॅन्सी स्वेटर्सचा पर्यायही तुमच्या हाताशी आहेच. यात शॉर्ट पॅटर्न, विथ फर, विदाउट फर, विथ बेल्ट, फ्रॉक स्टाइल, कॉलर असलेले प्लेन, प्रिंटेड स्वेटर्स उपलब्ध आहेत. काही स्वेटर्सवर स्टोनवर्क, एम्ब्रॉयडरी करून डिझायनर लूक दिलेला आहे. मोजकेच पण काही स्टायलिश उबदार पर्याय यंदा तरुण मुलांसाठीही बाजारात उपलब्ध आहेत.
स्वेटशर्ट्स
यंदाच्या सीझनसाठी हा बेस्ट आॅप्शन ठरला आहे. होजिअरी आणि लोकरमध्ये हे स्वेटशर्ट्स असंख्य डिझाइन्समध्ये तुमच्या दिमतीला हजर आहेत. त्यातही प्लेन आणि त्यातल्या त्यात राखाडी, काळ्या रंगातील स्वेटशर्ट्सचा ट्रेण्ड आहे. काही ब्रॅण्डेड स्वेटशर्ट्सही तुम्ही घेऊ शकता.
लेदर लूक जॅकेट
लेदरचा लूक देणारे जॅकेट्स हादेखील जेण्ट्स विंटर कलेक्शनमधला हिट प्रकार. सिंगल साइड आणि डबल सायडेड म्हणजे दोन्ही बाजूंनी घालता येतील, असे जॅकेट्स लोकप्रिय आहेत. काळा, तपकिरी, मरुन, कॉफी, कॉपर, मस्टर्ड या रंगांमध्ये हे जॅकेट्स शोभून दिसतात.
पुलोव्हर झीपर्स
पुलोव्हर हा तसा पुरुषांच्या स्वेटर्सचा पारंपरिक प्रकार; पण झीपर्समुळे त्याचा लूकच बदलला आहे. हाफ बटन, हाफ चेन, प्रिंटेड, प्लेन, विथ फर, विदाउट फर, चेक्स, स्ट्रिप्स अशा प्रकारांत व डिझाइन्समध्ये पुलोव्हर झीपर्स बाजारात दाखल झाले आहेत.
मफलर
यंदाच्या हिवाळ्यात पुरुषांसाठी मफलर्समध्ये अनेक नवीन डिझाइन्स उपलब्ध झाल्या आहेत.
याशिवाय
विंटर अॅक्सेसरीत राउण्ड कॅप, मंकी कॅप, कानपट्टी, इअर पफ असे प्रकार आहेतच. मग फ्रेण्ड्स, शॉपिंगला निघा अन् हिवाळा एन्जॉय करा!