गात्या गिटारचा दोस्त

By admin | Published: February 19, 2016 02:53 PM2016-02-19T14:53:14+5:302016-02-19T15:18:19+5:30

कॅन्सरग्रस्तांसाठी तो गिटार वाजवून निधी जमवतोय, आता तेच त्याचं मिशन आहे.

Singer guitar friend | गात्या गिटारचा दोस्त

गात्या गिटारचा दोस्त

Next
>
प्रवीण दाभोळकर 
गिटार ही सौरभ निंबकरची खास मैत्रीण. कॉलेजला जाता-येतानाच्या प्रवासात गिटारच्या तारा छेडत सहप्रवाशांचं मनोरंजन करणं हे डोंबिवलीच्या या मुलाच्या रुटीनचा एक भाग होतं. पण पुढे जाऊन ही गिटार काही वेगळेच सूर छेडेल हे त्याला तरी कुठं माहिती होतं? 
2क्13 साली तो मुंबईत, माटुंग्याच्या खालसा महाविद्यालयातून एम.एस्सी. करत होता. त्याच काळात आईला कॅन्सर असल्याचं निदान झालं. केईएम रुग्णालयात आईवर उपचार सुरू झाले. तिथल्या वॉर्ड नंबर 42 मधल्या कॅन्सरग्रस्तांच्या वेदना सौरभनं त्याकाळी जवळून पाहिल्या. सहा महिनेच जेमतेम उपचार झाले आणि त्या आजारात त्याची आई देवाघरी गेली.
नेमकी त्याच काळात नोकरीही सुरू झाली. कामासाठी रोज डोंबिवली ते अंबरनाथ असा ट्रेनचा प्रवास; पण कॅन्सरग्रस्तांसाठी अंबरनाथ-दादर-डोंबिवली असा त्याचा वेगळा प्रवास सुरू झाला. रेल्वेच्या डब्यात गिटार वाजवून प्रवाशांचे मनोरंजन करायचं आणि कॅन्सरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करायचं, हा त्याचा दिनक्रमच झाला. आपल्या कलेच्या प्रतिसादाला मिळालेले पैसे कॅन्सरसाठी काम करणा:या संस्थेला देण्याचं त्यानं ठरविले. त्या वेळी आठवडय़ाला तीस हजार्पयतची रक्कम गोळा होत असे. संस्थेला दिलेले पैसे प्रत्यक्षात रुग्णांर्पयत पोहोचलेत का याचाही तो स्वत: पाठपुरावाही करत असे.
असाच एका दिवशीच्या प्रवासात कोणीतरी सौरभचा गिटार वाजवून कॅन्सरग्रस्तांसाठी पैसे गोळा करतानाची चित्रफीत सोशल मीडियावर अपलोड केली. तिथून एक वेगळा प्रवास सुरू झाला. रेडिओ चॅनलवर त्याला मुलाखतीसाठी आमंत्रण आलं आणि पुढे खुद्द अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमाचं आमंत्रणही त्याला मिळालं. त्यानंतर त्याला मदतीचे अनेक फोन येऊ लागले.
केईएमचा वॉर्ड नंबर 42 आणि तिथले डॉक्टर्स एव्हाना त्याच्या चांगल्या परिचयाचे झाले आहेत. कोणत्या गरजूंना मदतीची गरज आहे, याची माहिती त्याला तिथून मिळू लागली. एका फार्मा कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोलरच्या कनिष्ठ पदावर काम करत, नोकरी सांभाळत तो आता चॅरिटी शो करू लागला आहे. काही महिन्यांपूर्वी हजारांमध्ये जमा होणारा मदतनिधी आता लाखांच्या घरात जमा होतोय. ती मदत रुग्णांर्पयत प्रत्यक्षात पोहोचवण्याचं कामही तो करतो आहे. गिटारच्या सुरांनीच सौरभला हे वेगळं आयुष्य जगायला शिकवलं आणि आता हे सूरच त्याच्या जगण्याचं एक कारण बनत चालले आहेत.
सौरभ म्हणतो, ‘माङया कलेतून मिळणा:या निधीचा उपयोग मी गरजूंसाठी करतो. मी माङया मनाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटलं  तरी मी माङया कर्तव्याशी नेहमीच प्रामाणिक राहीन!’
 
 
 

Web Title: Singer guitar friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.