सिंगल्स डे आला कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:37 PM2018-11-15T16:37:44+5:302018-11-15T16:37:52+5:30
जगभर बाजारपेठेनं व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करायला सुरुवात केली. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली म्हणून मग चीनमधल्या अत्यंत परंपरागत समाजात हे ‘एकटं’ असणं साजरं होऊ लागलं.
- निशांत महाजन
सिंगल्स डे, त्याला ‘बेअर स्टिक्स हॉलिडे’ असंही म्हणतात. 1993 साली चिनच्या नानजिंग विद्यापीठात तरुण विद्याथ्र्यानी आपलं ‘सिंगल’ असणं साजरं करावं म्हणून हा दिवस साजरा होऊन लागला. 11/11 असं म्हणत 11 नोव्हेंबर हा दिवस निवडला गेला कारण चिनी पद्धतीनं लिहिलं तर ही लिखावट ‘अनअॅटॅच्ड’ या अर्थाच्या ‘न गुंतलेल्या’ भावना दर्शवते. खरं तर जगभर बाजारपेठेनं व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करायला सुरुवात केली. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली म्हणून मग चीनमधल्या अत्यंत परंपरागत समाजात हे ‘एकटं’ असणं साजरं होऊ लागलं. चीनमधल्या मध्यमवर्गीय आणि मध्यममार्गी तारुण्यानं हा दिवस सहज स्वीकारला आणि साजरा करणं सुरू केलं.
सिंगल्स डे आणि शॉपिंग
मुळातच हा डे बाजारपेठेभोवती गुंफण्यात आला. त्यात अलीबाबा या कंपनीचे सहसंस्थापक जॅक मा यांना ही आयडिया आवडली. त्यांनी 2009 मध्ये हा सिंगल्स डे त्यासाठी स्वीकारला आणि सिंगल असलेल्या मुलामुलींना खरेदीच्या ऑफर देत हा दिवस साजरं करण्याला बाजारपेठेशी जोडून टाकलं. पुढे सगळ्याच ऑनलाइन-ऑफलाइन कंपन्यांनी या डेशी स्वतर्ला जोडून घेण्याचा प्रय} केला.
सिंगल असण्याचं सेलिब्रेशन
मुळात जगभर प्रेमात पडणं, परस्परांना भेटी देणं, फिरायला जाणं, शॉपिंग करणंच सेलिब्रेट होतं. त्यावेळी आपण सिंगल आहोत, एकेकटे आहोत म्हणत तरुण मुलंमुली झुरतात. त्यांनाही साजरं करण्याचं आणि आपलं सिंगलपण अभिमानानं मिरवण्याचं, मित्रमैत्रिणींसह मस्त सेलिब्रेशन करण्याचं निमित्त या डेनं दिलं. आता चीनसह अनेक देशांत सिंगल असलेले तरुण हा दिवस साजरा करू लागलेत. बाजारपेठ तरुण मुलांना नवीन सण देते आणि नव्या तरुण चेहर्यानं हे दिवस साजरे होतात याचं हा दिवस एक उत्तम उदाहरण आहे.