‘टीपी’वाली सिरिअस गोष्ट
By admin | Published: February 11, 2016 08:25 PM2016-02-11T20:25:35+5:302016-02-11T20:25:35+5:30
‘अरे, अम्याने नवीन पोस्ट टाकली आहे, निला त्याची नवीन व्हॅलेंटाइन आहे.’ ‘काय सांगतोस, पण अरे त्याची तर प्रिया होती ना?’
Next
>
- विनायक पाचलग
vinayakpachalag@gmail.com
प्लीज नोट,
रिलेशनशिप आणि प्रेम
या दोन भिन्न गोष्टी आहेत.
प्रेमात पडलेले रिलेशनशिपमध्ये सहसा असतात,
पण रिलेशनशिपमध्ये असलेल्यांचे
एकमेकांवर प्रेम असेलच असे नाही.
या दोन्हीतला फरक शहरी मुलामुलींनी
समजून उमजून आपल्या आयुष्यात
मान्य केला आहे.
त्याची कारणं कुणी शोधायची?
‘अरे, अम्याने नवीन पोस्ट टाकली आहे, निला त्याची नवीन व्हॅलेंटाइन आहे.’
‘काय सांगतोस, पण अरे त्याची तर प्रिया होती ना?’
‘अरे हो, ते गेल्या वर्षी, यावर्षी दुसरी रे. चिल.’
पुण्यातल्या दुर्गा कॅफेवर मित्नांसोबत कॉफी पीत असताना ऐकलेला हा संवाद. यातून जे काही अर्थ लावायचे ते जो तो लावू शकतो. पण मला यातून कळलेल्या दोन गोष्टी म्हणजे या की रिलेशनशिपवाल्यांचा सण जवळ आलेला आहे आणि आपण खरोखरच खूप प्रॅक्टिकल झालेलो आहोत.
प्लीज नोट की रिलेशनशिप आणि प्रेम या दोन भिन्न गोष्टी आहेत. प्रेमात पडलेले रिलेशनशिपमध्ये सहसा असतात, पण रिलेशनशिपमध्ये असलेल्यांचे एकमेकांवर प्रेम असेलच असे नाही. या दोन्हीतला फरक शहरी मुलामुलींना आता कळतो, त्यांचे त्याबाबतचे फंडे क्लिअर आहेत.
रिलेशनशिप म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर मी टिनेजमध्ये होतो तेव्हापासून शोधतो आहे. आणि हे उत्तर शोधताना मला माङया पिढीने खूप काही शिकवलं आहे. एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की माणसाला कंपनी लागते, माणूस नाही एकटा राहू शकत. आपल्याला कोणीतरी पॅम्पर करावं, आपल्या आजूबाजूला असावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं गाव, कुटुंब सोडून करिअर आणि शिक्षणासाठी बाहेर पडल्यावर तर ही इच्छा प्रचंड प्रमाणात वाढते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याच वयाचा पण विरूद्ध लिंगाचा माणूस सोबत असणं म्हणजे रिलेशनशिप. आमच्या प्रॅक्टिकल पिढीनं ही आमची गरज खुल्या दिलानं आणि धाडसानं मान्य केली आहे आणि म्हणूनच ही गरज पूर्ण करणा-या टिंडरसारख्या अॅेप्सची सध्या चलती आहे. जवळपास 5 कोटी तरूण ही सुविधा वापरतात. याचा काय अर्थ? तरुण आतून एकटे आहेत आणि आम्हाला पार्टनरची किती गरज आहे याचाच पुरावा आहे.
या रिलेशनशिपमध्ये एकत्न फिरणं, आपल्या एकत्न असण्याचे सोहळे साजरे करणं, एकमेकांच्या गरजा विशेषत: शारीरिक भागवणं हे सगळंच आलं. ब्लाईंड डेटला जाताना किंवा ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीला भेटायला जाताना माङया गरजा पूर्ण होतील का एवढाच विचार करणारेही काहीजण आहेत. आणि समोरच्यानेही तेवढीच अपेक्षा ठेवावी असं त्यांना वाटत असतं. म्हणूनच मग ‘टाइमपास सुरू आहे रे’ असं खुलेआम मित्रंना सांगितलं जातं. ब:याचदा काही दिवसांनी एकमेकांची इमोशनल गरज संपते किंवा ती गरज अधिक उत्तम प्रकारे भागवणारा तो/ती आयुष्यात येते आणि रिलेशनशिप संपते. किंबहुना बहुतांश रिलेशन्स या संपण्यासाठीच असतात, कारण सगळ्याच नात्यांची गरज आयुष्यभरासाठी नसतेच मुळी.
आणि हे ज्यांना कळते असे स्मार्ट लोक मग आपल्या आजूबाजूच्या लोकांचे ‘बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड मटेरियल’ आणि ‘लग्नाचं मटेरिअल’ अशी विभागणी करतात. याचाच अर्थ येत्या रविवारी ते ज्याच्यासोबत पार्टी करत असतील ती व्यक्ती त्यांना आयुष्यभरासाठी हवीच असेल असं काही नाही !
हे ऐकायला विचित्न वाटेल कदाचित पण आहे हे खरं ! याला कारणंही आहेत. पहिलं कारण म्हणजे ‘थिअरी ऑफ अर्लीनेस’. तंत्नज्ञानाच्या विस्फोटामुळे आम्हाला सगळ्याच गोष्टी अपेक्षित वयाच्या खूप आधी मिळत आहेत. लोक आज 15-15 व्या वर्षी कमिटेड असतात, पण लग्नाचे वय आजही 25 प्लसच आहे. अशावेळी वर्षे अडनिडय़ा वयात एकाच माणसासमवेत घालवणं, तेही वाढत्या वयात. हे अनेकांना शक्य होत नाही ब:याचदा. शिवाय एकटेपणा हा सगळ्यांनाच असल्यानं तो घालवण्यासाठी मी सिंगल नाही हे दाखवणं हाही एक सोशल स्टिग्मा बनतो.
प्रेम ही खासगी गोष्ट असली तरी रिलेशनशिप ही नक्कीच सार्वजनिकरीत्या सांगितली जायची गोष्ट बनत आहे. शिवाय शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाणा:यांची संख्या प्रचंड वेगात वाढते आहे. अशावेळी या सगळ्याच नात्यांचा पूर्ण संदर्भच बदलतो. स्काइप, आयएमओ अशा सोयी असल्या तरी त्या आभासीच ! अशावेळी एकमेकांना झुलवण्यापेक्षा सहमतीने वेगळे होतात अनेकजण ! म्हणतात, नंतरच्या त्नासापेक्षा हे बरं ना !
या गुंतागुंतीत भर पडते ती शारीरिक मोकळीक आणि नैतिकतेच्या संकल्पनांची. मी दीडएक वर्षापूर्वी कोल्हापूरहून पुण्याला स्थायिक झालो. त्याआधीही मेट्रो संस्कृतीशी संपर्क होताच. पण तरीही इथली मोकळीक समजून घ्यायला आणि ते धक्के पचवून इथे रु ळायला मला सहाएक महिने गेले. माङयासारखीच अवस्था अनेकांची होत असणार. अशावेळी काय करावं काय नाही याचं भान असतेच असं नाही. आणि मग कॅज्युअल, रिलेशनशिपचा मार्ग पत्करला जातो.
थोडक्यात काय, तर आजच्या जगाशी समरस होण्यासाठी आमच्या पिढीने निर्माण केलेली नवी अवस्था म्हणजे रिलेशनशिप. मैत्नीच्या पलीकडची आणि प्रेमाच्या अलीकडची. आणि या स्थितीचे सेलिब्रेशन म्हणजे 14 फेब्रुवारीचा दिवस. हे चांगले का वाईट ते ठरवण्यात मला स्वारस्य नाही. कारण तसं केल्यानं फायदा काहीच नाही. फक्त उघडपणो जे आहे ते पाहणं, आणि प्रसंगी मान्य करून त्यावर चर्चा करून निर्माण झालेच असतील तर प्रश्न सोडवणं हे आता जास्त महत्त्वाचं बनतं आहे.
रिलेशनशिप हवीच म्हणत ठरवून प्रेमात पडणा:यांना कधीकधी एकदम साक्षात्कार होतो की, ‘आता बास, हाच/हीच माझी जीवनाची साथीदार’ या व्यक्तीसोबत आपण आनंदानं आयुष्य एकत्न काढू शकू. एकत्न मोठे होऊ असंही वाटू लागतं. आणि अचानक ‘टीपी’ म्हणून सुरू झालेली गोष्ट सीरियस होते. रिलेशनशिप प्रेमात बदलते आणि त्या एका क्षणानं आयुष्याचा आनंद सोहळाही होतो. त्या क्षणासाठी बाकी सबकुछ माफ मग..!
असा साक्षात्कारी क्षण लाभेल तो ख:या अर्थानं उत्सव, व्हॅलेण्टाईन डे असो नसो, त्यादिवशी मग!