ऑफिसात डेस्कवर बसून जेवताय? मग तुमचा परफॉर्मन्स बिघडू शकतो!

By admin | Published: April 25, 2017 05:37 PM2017-04-25T17:37:24+5:302017-04-25T17:37:24+5:30

काम करता करता डेस्कवरच बुफे मांडल्यागत पदार्थ मांडून जेवता?परिणाम?

Sitting at the desk at the office? Then your performance can worsen! | ऑफिसात डेस्कवर बसून जेवताय? मग तुमचा परफॉर्मन्स बिघडू शकतो!

ऑफिसात डेस्कवर बसून जेवताय? मग तुमचा परफॉर्मन्स बिघडू शकतो!

Next
>- चिन्मय लेले
 
ऑफिसमध्ये लंच ब्रेक होतो, काही सहकारी उठतात आपापल्या ग्रूपसोबत लंच रुममध्ये जेवायला जातात. जिथं लंच रुम नसतात ते सगळे कुणा एकाच्या टेबलाभोवती जेवतात. मात्र काही जण, नव्यानं क्यूबिकल किंवा छोटं केबिन मिळालेले मात्र आपल्या जागेवर अर्थात डेस्कवरच जेवतात. काही ज्युनिअर लेव्हलचे तरुण पण डेस्कवरच जेवतात. आणि आता नवीन फॅशनवाले तर काम करता करता डेस्कवरच बुफे मांडल्यागत पदार्थ मांडून जेवतात.
परिणाम?
त्यांचा कामावरचा फोकस तर हलतोच, त्यांचा परफॉर्मन्सही घसरतो आणि त्यांचं आपल्या सहकार्‍यांशी असलेल नातंही बिघडतं. या सगळ्याची मुळं शोधत गेली तर ती सतत डेस्कवर जेवण्यात सापडू शकतात.
अलिकडेच डेली मेल या वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार डेस्कवर जेवणं हे आपल्या मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठीही हानीकारक असू शकतं.
त्याची काही कारणंही या सव्र्हेत दिसतात.
ती वाचली तर लक्षात येईल की, आपणही हमखास अशाच चूका करतो.
 
1) वास
तेलकट-तुपकट भाज्यांचे वास, अंबूस वास, तेलकट डाग, लोणच्याचे डाग, मसाल्यांचे वास आणि एकुणच एसीत साचून राहिलेले पदार्थाचे वास यानं डोकं भणभणतं. कुबट वासात कसं काय कुणाला बरं काम सुचेल?
 
2) जागा बदलत नाहीत, विचारही
जरा जागा बदल झाला, डोळ्यासमोरची चित्र बदलली की मेंदूलही ताजंतवानं वाटतं. ते होत नाही. त्यामुळे जेवणानंतर अनेकदा फटिग येतो.
 
3) उदास, कंटाळवाणं वाटतं
अनेकांना जेवणानंतर किमान चहार्पयत तरी ऑफिसात खूप बोअर होतं, कंटाळवाणं वाटतं. त्याचं कारण हेच. एकाच जागेवर बसून सतत खाणं आणि त्याच वासात बसून राहणं.
 
4) टिममधून आऊट
काहीजण एकेकटे खात बसतात. त्यांना इतरांसोबत काही वाटून घेता येत नाही. जेवतानाची चेष्टा मस्करी सहन होत नाही. किंवा त्यांची ऑफिसात कुणाशीही मैत्री होत नाही. परिणाम काय तर ते टिममधून आऊट होतात. अनेकदा त्यांच्याविषयी ऑफिसात गैरसमज पसरतात.
 
5) वजन वाढतंच.
काहीजण टेबलावर सतत खात असतात. बसती खुर्ची पुरत नाही इतकं त्यांचं वजन वाढतं. आणि मग नकोत या तक्रारी सुरु होतात. 
 
6) हे खोटं वाटेल पण काहीजण जेवण झाल्यावर हात धुवत नाहीत, तसेच कामाला लागतात. त्यामुळे त्यांना तर आजार होतातच पण त्यांचे की बोर्डही फार घाणेरडे दिसतात.

Web Title: Sitting at the desk at the office? Then your performance can worsen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.