सुंदर दिसण्याची घसरगुंडी

By admin | Published: January 15, 2015 06:36 PM2015-01-15T18:36:42+5:302015-01-15T18:36:42+5:30

‘डोण्ट वरी, वील फिक्स इट सून !’ असं म्हणत सुंदर दिसण्याची मलमपट्टी आणि रंगरंगोटी करणार्‍या नव्या जगात नक्की घडतंय काय?

Sloppy look | सुंदर दिसण्याची घसरगुंडी

सुंदर दिसण्याची घसरगुंडी

Next
>‘दिसणंबिसणं’ तसं काही फार महत्त्वाचं नसतं, असं वरकरणी ‘ते’ कितीही म्हणत असले तरी तरुण मुलींच्याच नाही तर मुलग्यांच्याही जगण्याला वेढा पडलाय एका नव्या आजाराचा..
त्याचं नाव आहे ‘क्विक फिक्स’.
म्हणजे झटकेपट मलमपट्टी करून, वरवर डागडुजी करून, जे वेडंवंगाळ आहे असं वाटतं ते चिकण्याचुपड्या वेस्टनाखाली दडवून ‘सुंदर’ करून टाकण्याचं!
तसाही नव्या तरुण जगण्याचा मंत्रच आहे, ‘डोण्ट वरी, वील फिक्स इट सून’!
म्हणजे काय तर प्रॉब्लम कोणताही असो, आपण चुटकीसरशी तो ‘फिक्स’ करू शकतो, म्हणजे पटकन त्यावर इलाज करू शकतो असा आत्मविश्‍वास. ‘फिक्स करणं’ म्हणजे तो प्रश्न मुळापासून सोडवणं अभिप्रेत नसतं. आहे तिथल्या तिथं उत्तर शोधून वेळ मारून नेणं असतं.
हे वेळ मारून नेण्याचं तंत्र जमलं की, मग आपल्या ‘दिसण्याच्या’ अस्वस्थ प्रश्नावरही तसाच ‘मलम’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
आणि या हावर्‍या मानसिकतेवर इलाज करणारी एक बाजारपेठही म्हणून आज जोरदार फोफावते आहे.
‘स्वस्तातले इलाज’ करणारी.
ट्रेन-बस-कॉलेज कॅम्पसच्या भिंती-ऑनलाइन जाहिराती ते व्हॉट्सअँपवरून होणारं कॅम्पेनिंग.
झटकेपट सुंदर बनवण्याचं प्रॉमिस करताहेत. त्यासाठी गल्लोगल्ली मेडीस्पा सुरू झालेत. म्हणजे काय तर ब्यूटी ट्रिटमेण्टपेक्षा जास्त आणि वैद्यकीय उपचारांपेक्षा कमी प्रक्रिया करणारी जागा.
तरुण मुलींनाच इतके दिवस जे प्रश्न सतावत होते, ते प्रश्न आता मुलग्यांच्याही अस्तित्वाचे प्रश्न होत आहेत.
डोक्यावरचे विरळ केस, टक्कल, हाडकुळी शरीरयष्टी, वाढतं वजन, सुटलेली ढेरी, काळवंडलेला रंग हे सारे प्रश्न घेऊन तरुण मुलंही या नव्या ‘स्पा’मध्ये जात आहेत.
स्वत:ला बदलवण्याचे इन्स्टण्ट मार्ग शोधत आहेत.
मार्ग या वाटा निसरड्या आहेत आणि फसव्याही.
त्यातले ट्रॅप दिसले नाहीत तर आहे ते रंगरूपही आपण पणाला लावून बसतो, याचं भान ‘बदलण्याच्या’ आकर्षक पॅकेजेसमध्ये हरवू लागतं.
आणि पाय घसरतो तो याच टप्प्यावर.
त्या घसरगुंड्या कुठल्या?
नेमकं काय घडतंय या जगात?
काय चुकतंय?
आणि काय दुरुस्त केलं तर खरंच सुंदर दिसण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं.
याची ही विशेष चर्चा.
उलटा पान.
आणि विचारा स्वत:ला.
खरंच आपल्याला नक्की कशाची घाई आहे.
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Sloppy look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.