स्मार्ट फोन - लहान मुलांपासून कसा वाचवाल?
By admin | Published: June 16, 2016 12:53 PM2016-06-16T12:53:31+5:302016-06-16T13:03:56+5:30
हल्ली बाळाचा जन्म झाला आणि काही वेळाने हॉस्पिटल मधील नर्सने बाळ आणून नातेवाईकांंच्या हवाली केले कि आजकालचे स्मार्ट नातेवाईक त्या नवजात बाळाला
Next
>- अनिल भापकर
हल्ली बाळाचा जन्म झाला आणि काही वेळाने हॉस्पिटल मधील नर्सने बाळ आणून नातेवाईकांंच्या हवाली केले कि आजकालचे स्मार्ट नातेवाईक त्या नवजात बाळाला त्याच्या आईचा चेहरा पाहाण्याच्या अगोदर त्याच्या समोर स्मार्टफोन धरुन त्या बाळाचा फोटो काढुन व्हॉट्सअॅप करतात. म्हणजेच आजकालच्या पिढितील स्मार्ट बाळांना त्याच्या आईची ओळख होण्या अगोदर स्मार्टफोन ची ओळख झालेली असते.
मात्र बाळ मोठं होतं तसं फोनशी खेळत उद्योग करू लागतो. त्यात आपले भाच्चे-पुतणे तर मामा/काका/मावशी आत्याचा फोन म्हणजे खेळणंच समजतात. ते स्मार्ट बाळ कधी कोणाला फोन लावतं, कोणाला काहीबाही मेसेज पाठवतं,कोणाचा व्हॉट्सअॅप कोणाला फॉरवर्ड करतं (अर्थात चुकुन) त्यामुळे तुम्हाला समोरच्याला सांंगावं लागतं कि कॉल चुकुन लागला कारण स्मार्टफोन बाळाच्या हातात होता!
काही वेळा कॉल किंवा मेसेज किंवा व्हॉट्सअॅप चुकुन तुमच्या बाळाकडुन अशा व्यक्तीला जातो ज्यांना तो जायला नको होता किंवा काही व्हॉट्सअॅप मेसेज चुकुन अशा ग्रुपवर फॉरवर्ड होतो जेथे व्हायला नको होता. तसेच स्मार्टफोनवर इंटरनेट चालू असल्यामुळे कधी काय डाऊनलोड होईल आणि त्याचा आर्थिक फटका तुम्हाला बसेल याचा नेम नाही. मग मात्र चिडचिड होते आणि त्या बाळाचा राग यायला लागतो आणि तुम्ही बाळाला स्मार्टफोन देत नाही. मात्र त्याच्या हट्टापुढे काही चालत नाही.
आता मात्र असे काही अॅप उपलब्ध आहेत जे वापरुन तुम्ही लहान मुलाच्या हातातही बिंधास्त स्मार्टफोन देऊ शकाल!
किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल
किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अॅप. यात असे फिचर्स आहेत्, ज्यानं चुकीनं मेसेज फोन जाणार नाही, किंवा इंटरनेट वरुन चुकून काहीही डाऊनलोड होणार नाही. विशेष म्हणजे हे अॅप काही फिचर्ससह मोफत उपलब्ध आहे.
फिचर्स:-
१.किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अॅप चालु केल्यानंतर स्क्रीनवर फक़्त पालकांनी मुलांसाठी परवानगी दिलेले अॅपच दिसतात.त्यामुळे मुलांना ह्या अॅप व्यतिरिक्त दुसरे काही करता येत नाही.
२.यामध्ये इंटरनेट डिसेबल करण्याची सुविधा असल्यामुळे मुलांना चुकुन काही आॅनलाईन खरेदी किंवा काही डाऊनलोड करता येत नाही.
३.यामध्ये टाईमर हे आणखी एक चांगले फिचर्स असल्यामुळे किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अॅप काही वेळानंतर लॉक करण्याची सुविधा यामध्ये आहे.
४.किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अँप चालु असताना इनकमिंग कॉंल ब्लॉक करण्याची सुविधा सुद्धा या मध्ये आहे.
५.किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल चालु असताना सर्व वायरलेस सिग्नल डिसेबल होतात.
६.या अॅप मधुन बाहेर यायचे असल्यास पासवर्ड द्यावा लागतो जो अॅप इंस्टॉल झाल्यावर सेट करता येतो व तो पासवर्ड फक़्त पालकांकडे असतो.त्यामुळे मुले या अॅप मधुन बाहेर येऊन काही गडबड करु शकत नाही.
अॅपलॉक
अॅपलॉक तुमच्या अण्ड्राईड स्मार्टफोनवर एक तरी अॅपलॉक अँप असणे आवश्यक आहे. अनेक चांगले अॅपलॉक अँप गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहेत.