स्मार्ट टिवे...
By admin | Published: August 27, 2015 06:04 PM2015-08-27T18:04:09+5:302015-08-27T18:04:09+5:30
आपल्या आजूबाजूला सगळ्याच गोष्टी स्मार्ट वगैरे होताना आपल्या घरातल्या इडियट बॉक्सनं तरी का मागं राहावं? तुमचा टीव्ही अर्थात या इडियट
Next
>आपल्या आजूबाजूला सगळ्याच गोष्टी स्मार्ट वगैरे होताना आपल्या घरातल्या इडियट बॉक्सनं तरी का मागं राहावं? तुमचा टीव्ही अर्थात या इडियट बॉक्सला स्मार्ट करण्याचे अनेक मार्ग आता उपलब्ध होत आहेत त्याचा आढावा घेऊ या.
स्मार्ट टीव्ही
एक 4-5 वर्षापूर्वी सगळं बरं होतं. घडय़ाळ वेगळं, टीव्ही वेगळा, फोनचा डब्बा वेगळा, डेस्कटॉप वेगळा. सगळं कसं आपआपल्या जागी नीट आणि व्यवस्थित. आता मात्र स्मार्टफोनमध्ये सगळंच उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक जुने गॅजेट बाद झालेत. पण तरी या सगळ्यात टीव्ही मात्र आपला किल्ला दमदारपणो लढवत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची स्मार्टफोन-टॅब इत्यादिंच्या तुलनेतली अगडबंब स्क्र ीन साईझ. त्यामुळे क्रिकेट मॅचची मजा ख:या अर्थानं घ्यायची असेल तर स्मार्टफोनपेक्षा टीव्हीच बरा.
आता मात्र अनेक स्मार्ट टीव्ही बाजारात उपलब्ध झालेत. उदाहरणार्थ काही नवीन मॉडेलमधे असलेली टाइम मशीनची सुविधा. यात तुमचा आवडता एपिसोड हुकला तर तो टीव्हीमधेच रेकॉर्ड करून नंतर बघण्याची सोय आहे. याशिवाय एक महत्त्वाचं म्हणजे या बहुतेक स्मार्ट टीव्हींमध्ये इंटरनेटला कनेक्ट करण्याची सोय असते. त्यासाठी कसल्याही प्रकारच्या वेगळ्या डिव्हाईसची गरज नाही. मायक्रोमॅक्सच्या स्मार्ट टीव्हीमध्ये अॅण्ड्रॉईड किटकॅट आहे. म्हणजे हा टीव्हीच एक 42 इंची अॅण्ड्रॉईड फोन असल्यासारखा वागतो! याशिवाय या ब:याच स्मार्ट टीव्हींना आपण आपला फोन कनेक्ट करून फोनवरचे फोटो किंवा व्हिडीओ बघू शकतो. सॅमसंगच्या काही नवीन मॉडेलमध्ये रिवर्स स्क्र ीन मिररिंगची एक भन्नाट सोय आहे. यात सॅमसंगचे काही विशिष्ट स्मार्टफोन या टीव्ही सेटला वायफायद्वारे कनेक्ट करून टीव्हीची स्क्र ीन फोनवर मिरर करता येते. म्हणजे टीव्हीवरचे कार्यक्रम टीव्हीसमोर बसूनच बघायची गरज नाही. विशेष म्हणजे, हे सगळे स्मार्ट टीव्ही आता भारतातदेखील 3क्-35 हजारांपासून उपलब्ध आहेत.
सध्याच्या टीव्हीला स्मार्ट कसं बनवायचं?
तुमच्याकडे सध्या एलईडी टीव्ही असला तर या इडियट बॉक्सला स्मार्ट बनवायचा आणखी एक स्वस्त आणि स्मार्ट पर्याय आहे, तो म्हणजे मीडिया स्ट्रिमिंग डिव्हाईसचा. हे डिव्हाईस बहुतेक सगळ्या एचडी टीव्हीला कम्पॅटेबल आहे. याची फक्त एक अट आहे, ती म्हणजे तुमच्या टीव्हीला एचडीएमआय पोर्ट पाहिजे आणि घरी वायफाय पाहिजे. यात सगळ्यात स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे गुगल क्रोमकास्ट आणि शुद्ध देशी बनावटीचा टिवे 2. केवळ दोन ते अडीच हजार रुपयांच्या रेंजमध्ये ही दोन्ही डिव्हाईसेस ऑनलाइन उपलब्ध आहेत. दिसायला यूएसी पेनड्राइव्हसारख्या दिसणा:या या स्टिक्स टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टमध्ये खोचल्या की वायफाय सेटअपचे ऑप्शन टीव्हीवर दिसतात. वायफाय सेटअप झाला की आपल्या स्मार्टफोनवर टिवे अॅप इन्स्टॉल करायचं. क्रोमकास्टसाठी मात्र अॅण्ड्रॉईड फोन्सवर वेगळे अॅप लागत नाही. या दोन्हीसाठी क्र ोम एक्स्टेंशन्स उपलब्ध आहेत. ते वापरून तुम्ही ब्राऊज विंडो थेट टीव्हीवर बघू शकता. फोनवरून यूटय़ूब व्हिडीओ टीव्हीवर बघणो किंवा कम्पॅटेबल अॅप्स किंवा गेम्स टीव्हीवर बघणो हे अतिशय सहजपणो होते. ब:याच बाबतीत क्रोमकास्ट 2 पेक्षाही अॅडवान्स्ड आहे. उदा. स्क्र ीन मिररिंग हे फीचर टिवेमधे सध्यातरी उपलब्ध नाही. क्र ोमकास्ट वापरून मात्र फोनला कनेक्ट केलेला मोठा मॉनिटर असा टीव्हीचा वापर तुम्ही करू शकता.